जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलकडून एक मोठी तांत्रिक चूक झाली आहे. गुगलकडून पिक्सेल मोबाईलधारकांना आणि गुगलपे युजर्सना रिवार्ड्स म्हणून 1000 डॉलर्स (भारतीय चलनात 82000 रुपये) देण्यात आले. ही चूक लक्षात येईपर्यंत अमेरिकेतील हजारो युजर्सनी अचानक मिळालेल्या धनलाभाचा फायदा उचचला. ज्यांनी हे पैसे खर्च केले नाहीत त्यांच्याकडून ते लागलीच कंपनीने परत घेतले.
गुगल पिक्सेल फोन किंवा गुगलपेवर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर युजर्सला रिवार्ड म्हणून काही डॉलर्सचे कॅशबॅक मिळत असल्याचा अमेरिकेतील अनेक युजर्सने दावा केला होता. काहींना 16 ट्रान्झॅक्शननंतर तर काहींना 10 ट्रान्झॅक्शननंतर गुगलकडून अचानक कॅशबॅक मिळाला. पिक्सेलफोनधारकांना त्यांच्या गुगल पेवर 100 डॉलर्स, 240 डॉलर्स ते 1072 डॉलर्सपर्यंत छप्परफाड कॅशबॅक मिळाले आहेत.रेडिटवर (Reddit) यासंबधी वृत्त देण्यात आले आहे.
गुगल पेच्या माध्यमातून अनेकांना शेकडो डॉलर्सचा कॅशबॅक मिळाल्याने अमेरिकेतील युजर्समध्ये आनंदाचे वातावरण होते. सोशल मिडियावर याबाबत अनेकांनी पोस्ट टाकल्या. टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनीही गुगलच्या या अनपेक्षित धनलाभाबाबत ट्विटवरवर पोस्ट टाकली होती. जेव्हा गुगलपे युजर्सना काही ट्रान्झॅक्शननंतर कॅशबॅक जात असल्याचे गुगलच्या लक्षात आले तोवर अनेकांनी रिवार्डमनी खर्च केले होते. गुगलने तातडीने ज्या युजर्सना कॅशबॅक गेला आहे त्यांना मेल टाकला आणि पैसे परत घेतले. त्यामुळे काहींचा हिरमोड झाला.
कशामुळे झाली ही चूक
गुगल पेमधील अल्गोरिदम, इंटरफेस आणि वेंडर कम्पॅबिलिटी याबाबत अपडे्टस करत असताना तांत्रिक चूक झाल्याचे बोलेले जाते. यातून युजर्सला कॅशबॅक करण्याबाबत चाचणी सुरु होती, असे कंपनीने म्हटले आहे. एखाद्या सेवेबाबत तंत्रज्ञान कंपन्यांकडून वेगवेगळ्या चाचणी केल्या जातात. अशाच प्रकारची ही एक चाचणी होती. जी यशस्वीपणे पूर्ण झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र चाचणी करताना अनेक युजर्सला अनपेक्षित कॅशबॅकची लॉटरी लागली. अमेरिकेत हा सर्व प्रकार घडला. भारतात मात्र अशा प्रकारची कोणतीच घटना घडलेली नाही.
(Source: Times of India)
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            