Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Smartwatches: महिलांसाठी ‘या’ आहेत सर्वोत्तम स्मार्टवॉच

Best Smartwatch

Image Source : https://www.freepik.com/

भारतीय बाजारात कमी किंमतीत येणाऱ्या अनेक शानदार स्मार्टवॉच उपलब्ध आहे. विशेषकरून महिलांसाठी हेल्थ फीचर्ससह येणाऱ्या अनेक चांगल्या स्मार्टवॉच उपलब्ध आहेत.

भारतात स्मार्टवॉचची लोकप्रियता वाढत चालली आहे. अनेक कंपन्या अगदी कमी किंमतीमध्ये शानदार स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच करत आहेत. अगदी 5 हजार रुपयांच्या बजेटमध्ये दमदार फीचर्ससह येणाऱ्या स्मार्टवॉच महिलांसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही जर नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या लिस्टचा नक्कीच फायदा होईल.

Fire-Boltt Phoenix

फायर-बोल्टच्या या स्मार्टवॉचची किंमत 2199 रुपये आहे. या वॉचमध्ये 1.43 इंच एमोलेड डिस्ल्पे देण्यात आला आहे. यात ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट दिला आहे. सोबतच, डाइल पॅड आणि कॉल हिस्ट्रीचे फीचर देखील मिळते. वॉच 110+ स्पोर्ट्स मोडसह येते. 

याशिवाय, यामध्ये महिलांसाठी हेल्थ ट्रॅकिंगसह अनेक शानदार फीचर्स यात मिळतात. यात 120 पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. याच्या मदतीने महिला कॅलरीज, स्टेप्स ट्रॅक करू शकतात. तसेच, ऑक्सिजन पातळी आणि हार्ट रेट मॉनिटरिंगची सुविधा देखील मिळेल. 

Samsung Galaxy Watch4

तुमचे बजेट थोडे जास्त असेल व चांगल्या कंपनीची स्मार्टवॉच खरेदी करायची असल्यास  Samsung Galaxy Watch 4 चा विचार करू शकतात. दमदार फीचर्ससह येणाऱ्या सॅमसंगच्या या स्मार्टवॉचची किंमत 12,990 रुपये आहे. यामध्ये 1.4 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉचला अँड्राइड स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता. तसेच, एकदा चार्ज केल्यावर 40 तास वापर करणे शक्य आहे. 

सॅमसंगच्या या स्मार्टवॉचमध्ये महिलांसाठी वर्कआउट ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग, रक्तदाब मोजण्याची सुविधा, ईसीजी फीचर, स्लिप ट्रॅकिंग व स्ट्रेस ट्रॅकिंगसारखे अनेक शानदार हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत.

Noise Diva

Noise Diva या स्मार्टवॉचची किंमत 3,499 रुपये आहे. यामध्ये 1.1 इंच एमोलेड डिस्प्लेसह 100+ वॉच फेसेसचा सपोर्ट मिळते. या वॉचचे वैशिष्ट्ये म्हणजे यात महिलांसाठी menstrual cycle ट्रॅकिंगची देखील सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, 24X7 हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्लिप ट्रॅकिंग सारखे हेल्थ फीचर्स देखील देण्यात आलेत. यामुळे आरोग्याशी संबंधित संपूर्ण डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. या वॉचला एकदा चार्ज केल्यावर 4 दिवस सहज वापरू शकता. तसेच, वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा देखील सपोर्ट मिळेल.

Garmin Venu 2 Plus

दमदार फीचर्ससह येणाऱ्या  Garmin Venu 2 Plus स्मार्टवॉचची किंमत 50,490 रुपये आहे. तुम्ही कंपनीची वेबसाइट अथवा इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून या वॉचला खरेदी करू शकता. या वॉचचे वैशिष्ट्ये म्हणजे यात महिलांसाठी देण्यात आलेले खास फीचर्स. वॉचमध्ये हार्ट रेट, स्ट्रेस, बॉडी एनर्जी लेव्हल्स, ऑक्सिजन पातळी, हायड्रेशन ट्रॅकिंग, स्लिप स्कोर सारखे अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. 

याशिवाय, महिलांसाठी  menstrual cycle आणि pregnancy trackingची सुविधा देण्यात आली आहे. तुम्ही स्मार्टफोनशी अ‍ॅप कनेक्ट करून संपूर्ण डेटा ट्रॅक करू शकता. 

Apple Watch Series 8

तुम्ही जर प्रीमियम फीचर्ससह येणारी स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार असल्यास   Apple Watch Series 8 एक चांगला पर्याय आहे. अ‍ॅपलच्या या वॉचची किंमत 43,900 रुपये आहे. वॉचला अ‍ॅपलच्या डिव्हाइससह वापरू शकता. 

तुम्हाला जर सर्वोत्तम हेल्थ फीचर्स हवे असल्यास अ‍ॅपलचा नक्कीच विचार करू शकता. यामध्ये महिलांसाठी अनेक चांगले हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये फिटनेस ट्रॅकर , ब्लड ऑक्सिजन आणि ईसीजी अ‍ॅप्स व सेफ्टी फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच , menstrual cycle ट्रॅकिंगचे फीचर देखील मिळते.   वॉच पाण्यात पडल्यावर देखील कोणतेही नुकसान होत नाही.