Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iphone 12 : फ्लिपकार्टवरून फक्त 19 हजारात खरेदी करता येणार iphone 12, जाणून घ्या डिस्काउंट ऑफर्सबद्दल...

iphone 12 buying in cheap budget

Image Source : www.tech.hindustantimes.com

iphone 12 : ऑनलाइन रिटेल वेबसाइट फ्लिपकार्टवर iphone 12च्या खरेदीवर बक्कळ डिस्काउंट मिळत आहे. ज्यामुळे या फोनची खरेदी केवळ 19 हजारात करता येणे शक्य आहे. याबाबतच्या ऑफर्स जाणून घेऊयात.

आयफोनचा (iphone) एक भला मोठा चाहता वर्ग आहे. आपल्याकडे आयफोन असावा अशी अनेकांची इच्छा असते. मात्र त्याची किंमत ही सर्वसामान्य लोकांना परवडणारी नसल्याने लोकं तो खरेदी करू शकत नाही. सध्या मार्केटमध्ये आयफोन 12 (iphone 12) ची चांगलीच चर्चा आहे. हाच फोन ग्राहक ऑनलाइन रिटेल वेबसाइट फ्लिपकार्टवरून (Flipkart) खरेदी करू शकतात. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत 59,900 रुपये आहे. मात्र काही सवलतींचा लाभ घेतल्यानंतर केवळ 19 हजारात हा फोन ग्राहक खरेदी करू शकतात. तो कसा जाणून घेऊयात.

एक्सचेंज ऑफर्सचा घेता येईल लाभ

Apple कंपनीचा iphone 12, ग्राहक ऑनलाइन रिटेल वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात.  या वेबसाइटवर ग्राहकांना हा फोन 59,900 रुपयांना उपलब्ध आहे. ज्यावर 9 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट पकडल्यानंतर या फोनची किंमत 53,999 रुपये होते.

याशिवाय ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. जर ग्राहकांनी जुने आयफोन एक्सचेंज केले, तर त्यांना त्यावर डिस्काउंट मिळणार आहे. हा डिस्काउंट 33 हजार रुपये इतका असेल. परंतु हा डिस्काउंट घेण्यासाठी आयफोनची कंडिशन चांगली असणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक फोननुसार ही डिस्काउंट किंमत वेगवेगळी असू शकते. 33,000 रुपयांचा डिस्काउंट मिळाल्यानंतर iphone 12ची किंमत 21,000 रुपये होते.

बँक ऑफर्सचा घेता येईल लाभ

फ्लिपकार्टवरून iphone12 ची खरेदी केल्यावर ग्राहकांना अनेक बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (Flipkart Axis Bank Credit Card) ग्राहकांनी खरेदी केल्यावर त्वरित 5 टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Bank Credit Card) iphone 12 ची खरेदी केल्यावर 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच EMI Transaction वर 2,000 रुपयांची सवलत दिली जाणार आहे. यातील डिस्काउंटचा लाभ घेतल्यानंतर या फोनची किंमत 19,000 रुपये होणार आहे. या सर्व डिस्काउंटचा लाभ घेऊन ग्राहक फक्त 19,000 रुपयात हा फोन खरेदी करू शकतात.

फीचर्स बद्दल जाणून घ्या

Iphone 12मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले (Super Retina XDR display) देण्यात आला आहे. या फोनला ड्यूअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 12MP आहे. तर फ्रंट कॅमेरा 12MP देण्यात आला आहे. या फोनमध्ये A14 Bionic Chip देण्यात आली आहे. ज्यामुळे तुमचा फोन स्लो न होता कायम स्पीडमध्ये काम करेल. OLED डिस्प्लेमुळे स्क्रीन देखील मजबूत आणि सर्वोत्तम क्वालिटीची आहे.

Source: navbharattimes.indiatimes.com