Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tim Cook India Visit : Apple CEO टीम कुक मुकेश अंबानी, एन. चंद्रशेखरन यांच्या भेटीला, आज मुंबई स्टोअरचं ओपनिंग

Apple bkc Store

Apple CEO टीम कुक यांनी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची अँटिलिया निवासस्थानी भेट घेतली. (Tim cook India visit) तसेच टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखन यांनाही टीम कूक भेटले. आज (मंगळवार) मुंबईतील बीकेसी येथे ॲपलच्या पहिल्या स्टोअरचे अनावरण होणार आहे. अॅपलचे हे भारतातील पहिले स्वत:च्या मालकीचे स्टोअर असणार आहे.

Apple CEO टीम कुक यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज ते मुंबईतील बीकेसी (bkc apple store) परिसरातील जिओ वर्ल्ड मॉल मधील पहिल्यावहील्या Apple Store चे उद्घाटन करतील. काल (सोमवार) टीम कुक यांचे मुंबईत आगमन झाले. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित सोबत वडापावचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी भारतातील बड्या उद्योगपतींचीही भेट घेतली. ॲपल स्टोअरच्या उद्घाटनानंतर खरेदीला येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत खुद्द CEO करणार आहेत. या दिमाखदार सोहळ्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

मुकेश अंबानी आणि एन. चंद्रशेखरन यांची भेट

Apple CEO टीम कुक यांनी रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांची भेट घेतली. (Mukesh Ambani Tim Cook meet) ही भेट अंबानी यांच्या अँटिलिया निवास्थानी काल दुपारी झाली. या भेटीवेळी मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी, जिओचे कंपनीचे प्रमुख, ईशा अंबानी, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे कार्यकारी प्रमुख उपस्थित होते. अंबानी कुटुंबियांनी टीम कुक यांचे आदरातिथ्य केले. टीम कुक यांनी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांचीही भेट घेतली. भारतातील आणखी दिग्गज उद्योगपती आणि मंत्र्यांचीही टीम कुक भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही कुक भेट घेण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील साकेत येथे ॲपलच्या दुसऱ्या स्टोअरचे 20 एप्रिलला उद्घाटन होणार आहे. (BKC apple store inauguration) मुंबईतील ॲपलच्या पहिल्या स्टोअरचे नाव "Apple BKC" आणि दिल्लीतील पहिल्या स्टोअरचे नाव "Apple Saket" असे असेल. टीम कुक तब्बल सात वर्षांनी भारतात परत येत आहेत.

मुंबईतील ॲपलचे स्टोअर कसे असेल?

मुंबईतील ॲपलचे स्टोअर पर्यावरण पुरक असेल. हे स्टोअर कार्बन न्युट्रल म्हणजेच सस्टनेबल (शाश्वत) मॉडेलवर आधारित आहे. (apple store building Mumbai) 100 टक्के नवीकरणीय उर्जेवर हे स्टोअर चालेल. स्टोअरला सोलार एनर्जीचा पुरवठा असणार आहे. स्टोअरच्या इमारतीचा आकार त्रिकोणी असून 20 हजार स्केअर फूट जागेवर पसरले आहे. स्टोअरचे छत लाकडापासून बनवण्यात आलं आहे. तसेच ही इमारत दुमजली आहे. स्टोअरच्या छतावर लाकडी कोरीव काम करण्यात आले आहे. यासाठी खास दिल्लीहून लाकूड मागवण्यात आले होते.  

या स्टोअरमध्ये ॲपलची सर्व गॅझेट्स विक्रीला असतील. तसेच ग्राहकांना शॉपिंगचा चांगला अनुभव मिळावा याची काळजी स्टोअर बनवताना घेण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी अॅपल सज्ज झाली आहे. 

स्टोअरच्या उद्घाटनाला मोठी गर्दी होणार असल्याचे बोलले जात आहे. पहिल्याच दिवशी खरेदी करण्यासाठी ग्राहकांचीही रीघ लागू शकते. सर्वप्रथम येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत स्वत: टीम कुक करतील. उद्घाटनाआधी माध्यम प्रतिनिधींसाठी खास "मीडिया प्रिव्हू" ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियावर अॅपल स्टोअरच्या उद्घाटनावर चर्चा सुरू आहे. येत्या काळात अॅपलची आणखी काही शहरातही स्टोअर्स सुरू होऊ शकतात.