भारतात विवो स्मार्टफोनचे चाहते असंख्य आहेत. भारतात या मोबाईलचा चांगला खप होत असतो. भारतातील स्मार्टफोनचे मार्केट लक्षात घेता कंपनीने भारतात Vivo Y200 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. तुम्ही देखील एवढ्यात स्वस्तात मस्त आणि बेस्ट फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. चला तर या लेखात जाणून घेऊयात या स्मार्टफोनचे डीटेल्स आणि फीचर्स…
कॅमेरा आणि शुटिंगसाठी बेस्ट
भारतातील युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी कंपनीने या मोबाईलमध्ये बेस्ट फीचर्स देऊ केले आहेत. फोटोग्राफीसाठी आणि व्हिडियोग्राफीसाठी हा मोबाईल बेस्ट असून यात 64MP रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 2 MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. मोबाईल बॅटरीचा विचार केला असता याची बॅटरी दीर्घकाळ चालणारी असून 4800 mAh बॅटरी यात देण्यात आली आहे.
घ्या बेस्ट अनुभव
या मोबाईलमध्ये तुम्हाला 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळेल जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय 8/128GB वेरिएंट ददेखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची किंमत किती? असा प्रश्न तुम्हांला पडला असेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर या स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये इतकी आहे. तुम्ही जर फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी करत असाल आणि HDFC आणि ICICI बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डने खरेदी करत असाल तर तुम्हांला 2,000 रुपयांची इंस्टंट सवलत दिली जाणार आहे.
झटपट चार्जिंग
स्मार्टफोनचा वापर वाढल्याने अनेकदा बॅटरी दीर्घकाळ चालत नाही, अशावेळी युजर्सला अडचणींचा समाना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेता कंपनीने 44 वॉट फास्ट चार्जिंगसह 4800 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फक्त 19 मिनिटांत 50% चार्ज होतो असा कंपनीने दावा केला आहे. तुम्ही देखील दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीचा अनुभव घेण्याच्या विचारात असाल तर लवकरात लवकर हा फोन खरेदी करा.