टाटा समूहही देशभरात जवळपास 100 लहान ॲपल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे.आयफोन आणि आयपॅड सारखी लोकप्रिय ॲपल उत्पादनं या स्टोअरमध्ये विकली जातील.ॲपल रिटेल स्टोअर्स टाटा ॲपल स्टोअर्स पेक्षा खूप मोठे असणार आहेत. लहान स्टोअर्स मध्ये iPhones, iPads आणि Apple घड्याळे विकली जाणार आहेत. एकूणच याबाबत भारतातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुक्ता आहे.
स्टिव्ह जॉबची संकल्पना
Apple चे संस्थापक स्टिव्ह जॉब यांची ही संकल्पना आहे. कंपनीची स्थापना करतानाच त्यांनी ॲपल स्टोअर हा एक मुद्दा आपल्या सादरीकरणात मांडला होता. आपले प्रॉडक्ट मार्केटमधील इतर किरकोळ विक्रेत्यांकडे ठेऊन किंवा त्यांच्यावर अधिकाधिक अवलंबून राहुन त्याची विक्री करणे, ही गोष्ट स्टिव्ह यांना कंपनीच्या प्रगतीच्या दृष्टीकोणातून मान्य नव्हती. ॲपल कंपनीकडे उत्कृष्ट उत्पादने होती. मात्र ती उत्पादने विकण्याचा मार्ग नव्हता. तेव्हा ॲपल फक्त किरकोळ विक्रेत्यांप्रमाणे यशस्वी न होता, सदैव टॉपवर असावे, या दृष्टीकोनातून स्टिव्ह जॉबने ॲपल स्टोअरची कल्पना मांडली.
ॲपल स्टोअर कसे विकसित झाले?
मिकी ड्रेक्सलर यांनी जॉब्सना एक वेअरहाऊस भाड्याने घेण्याचा आणि Apple स्टोअरचा मॉकअप तयार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जॉब्स आणि ॲपल टीमने प्रयोग करायला सुरुवात केली. त्यानंतर 2001 मध्ये कॅलिफोर्निया येथील टायसन कॉर्नर,व्हर्जिनिया आणि ग्लेनडेल येथे ॲपल स्टोअर पहिल्यांदा लाँच झाले.
जगात ॲपल स्टोअर कुठे कुठे आहेत
2001 मध्ये कॅलिफोर्निया येथील टायसन कॉर्नर,व्हर्जिनिया आणि ग्लेनडेल येथे अॅपलचे लॉन्चिंग झाले. Appleकडे आता जगभरात 500 पेक्षा जास्त किरकोळ स्टोअर्स आहेत. त्याच्या स्टोअरमध्ये,ॲपलचे प्रथम आणि तृतीय-पक्ष अशा विस्तृत ऍक्सेसरीजसह ॲपलची उत्पादने विक्रीस ठेवली जातात. कोविड- 19 च्या आजारामुळे ॲपल स्टोअर लॉन्चिंगला भारतात विलंब झाला होता. आता मात्र मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये लवकरच ॲपलचं भारतातलं पहिलं स्टोअर सुरू होत आहे.
- ॲपल टॉवर थिएटर, लॉस एंजेलिस, यूएस
- ॲपल फिफ्थ अव्हेन्यू, न्यूयॉर्क, यूएस
- रीजेंट स्ट्रीट स्टोअर, लंडन, इंग्लंड
- ॲपल सॅनलिटुन स्टोअर, बीजिंग, चीन
- ॲपल पियाझा लिबर्टी, मिलान, इटली
- ॲपल ऑपेरा स्टोअर, पॅरिस, फ्रान्स
- ॲपल स्टोअर दुबई मॉल, दुबई