YouTube Features : गूगलच्या मालकीच्या यूट्यूबने नुकतेच 5 नवीन फिचर्स जारी केले आहे. हे फिचर्स यूट्यूबच्या मुख्य प्लॅटफॉर्मवर दिसत आहे. YouTube आपल्या यूजर्सला यूट्यूब वापरत असतांना जाहिरातींमुळे कुठलाही अडथळा येऊ न देता, पाहिजे ती सेवा देण्यास कटिबध्द आहे. आता यूट्यूबने आपले 5 नवे फिचर्स आणून 80 कोटीहून अधिक यूजर्स असलेल्या वापरकर्त्यांना YouTube Premium चे सदस्यत्व दिले. काय आहेत यूट्यूबची नवीन वैशिष्टये जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
क्युइंग (Queuing)
Queuing हे फिचर्स वापरकर्त्याला पूढे कोणता व्हिडीओ प्ले करायचा हे सुचवण्यास मदत करते. फोन आणि टॅब्लेटमध्ये या फिचर्सचा विस्तार करण्यात येत असल्याचे यूट्यूबने म्हणटले आहे. ज्यामुळे यूजर्सला ते बघत असलेल्या व्हिडीओ वर पूर्णपणे फोकस करता येईल.
एकाधिक डिव्हाइसवर व्हिडिओ शेअर करणे (Video Sharing On Multiple Devices)
YouTube Premium सह यूजर्स Google Meet मध्ये व्हिडिओ शेअर करु शकतो. मुख्य म्हणजे ज्या लोकांना व्हिडीओ शेअर केला आहे, ते सर्व प्रीमियम सदस्य किंवा निशुल्क यूजर्स असले तरीही ते व्हिडीओ पाहू शकतात. येत्या आठवड्यात YouTube हे फिचर्स iOS वर देखील आणेल.
YouTube व्हिडिओंमध्ये परत जाणे (Jumping back into YouTube videos)
YouTube Premium सदस्यांनी व्हिडीओ बघतांना जिथे जिथे पॉज घेतला, तेथुन ते परत ईच्छा असेल तेव्हा व्हिडीओ पाहू शकतात. समजा यूजर्सने व्हिडीओ बघतांना मोबाईल बंद केला तरी देखील, त्यानंतर ईच्छा असेल तेव्हा ते परत जेथुन स्टॉप केले होते, तेथुनच पुन्हा व्हिडीओ बघण्यास सुरुवात करु शकतात.
ऑफलाइन असतांना व्हिडीओ पाहणे (Offline viewing)
'स्मार्ट डाउनलोड'च्या मदतीने YouTube प्रीमियम सदस्य इंटरनेटशिवाय व्हिडिओ पाहू शकतात. या फीचरमुळे प्रीमियम यूजर्स आता जास्त व्हिडिओ पाहू शकतात.
iOS वर देखील सुधारित व्हिडिओ क्वालिटी (Enhanced video quality on iOS too)
येत्या आठवड्यात YouTube iOS वर 1080p HD व्हिडिओ गुणवत्तेची bitrate व्हिडिओ क्वालिटी लाँच करणार आहे. ज्यामुळे प्रीमियम वापरकर्त्यांना उच्च गुणवत्तेत व्हिडिओ पाहण्यास मिळेल. या 1080p गुणवत्ता सेटिंग मुळे अतिशय स्पष्ट दिसणार. शिवाय, व्हिडीओ गतीने डाउनलोड होईल.
अश्यासगळ्या या प्रीमियम वैशिष्ट्यांसह, YouTube अपडेट्स आणण्यावर देखील काम करत आहे. जे यूजर्सचा अनुभव वाढवेल आणि त्यांच्यासाठी ते
अधिक मनोरंजक बनवेल.