Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter Launches Monetization Feature : एलॉन मस्क यांचा नवीन प्लान, ट्विटरमुळे लोकांना मिळणार पार्ट टाईम रोजगार

Twitter Launches Monetization Feature

Twitter Launches Monetization Feature Plan : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी आता ट्विटर यूजर्स करिता नवीन प्लान आणला आहे. आता ट्विटरचे पेड यूजर्स 10,000 कैरेक्टर पर्यंत लिहु शकतील. याआधी केवळ 280 शब्दांची लिमिट होती. सोबतच ट्विटरने नवीन मोनेटाइजेशन फीचर देखील आणले आहे. याअंतर्गत यूजर्स त्यांच्या फॉलोअर्सना सबस्क्रिप्शन प्लान देऊ शकतात.

ट्विटर यूजर्स करिता एक महत्वाची बातमी आहे. ट्विटरच्या ब्लू सबस्क्रिप्शनचे सशुल्क वापरकर्ते (Users) आता 10,000 अक्षरांपर्यंत ट्विट करू शकतील. यापूर्वी 280 शब्दांची मर्यादा होती. म्हणजेच आता ट्विटर यूजर आपला संपूर्ण लेख त्यावर लिहू शकतील. हा लेख लिहिताना ते मथळा देऊ शकतील आणि आवश्यक ती अक्षरे देखील ठळकपणे लिहू शकतील.

ट्विटरवरील कॉन्टेन्टवरून कमाई शक्य 

ट्विटरचा वापर करुन कॉन्टेन्ट क्रिएटर्सही त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून पैसे मिळवू शकतील. यासाठी ट्विटरने मोनेटायझेशन फिचर आणले आहे. याअंतर्गत वापरकर्ते त्यांच्या फॉलोअर्सना सबस्क्रिप्शन प्लान ऑफर करू शकतील तसेच त्यांच्या फॉलोअर्सना त्या कॉन्टेन्ट क्रिएटर्सचा लेख आणि व्हिडिओ पाहण्यासाठी शुल्क आकारु शकतील.

काय असणार शुल्क

भारतात ट्विटर ब्लूचे मोबाईल यूजर्ससाठी महिन्याला 900 रुपये द्यावे लागतील. आणि वेब यूजर्ससाठी 650 रुपये मोजावे लागतील. गेल्या वर्षभरापासून एलन मस्क यांना ट्विटर यूजर्स करीता ट्विटर व्यावसायिक (Commercial) करायचे होते. अखेरीस त्यांनी त्यांचा परफेक्ट प्लॅन सादर केला.

या बदलांबद्दल मस्क काय म्हणाले? 

यासगळ्या बदलांसह आपले मत सादर करत ट्विटरने देखील एक मेसेज टाकला आहे.तर मस्क म्हणाले की, ट्विटर 12 महिन्यांसाठी कंटेंट क्रिएटर्सच्या कमाईचा कोणताही भाग घेणार नाही. तथापि, Android आणि iOS 30 टक्के शुल्क आकारतात. हे शुल्क क्रिएटर्सच्या उत्पन्नातून वजा केले जाईल. हे शुल्क वेबवर सुमारे 8 टक्के आणि iOS-Android वर 30 टक्के आहे. तथापि, Google ने मस्कने केलेला हा दावा नाकारला आणि सांगितले की, आम्ही आधीच शुल्क 30 वरून 15 टक्के पर्यंत कमी केलेले आहे.

मस्क म्हणाले की व्हॉल्यूमच्या आधारावर ट्विटर लहान फी आकारणार आहे. ट्विटर तुमच्या कामाचा प्रचार करण्यासही मदत करेल.  कंटेंट क्रिएटर्स उत्पन्न वाढवणे हे आमचे ध्येय आहे. तुम्हाला जर का आमचे प्लॅटफॉर्म, आमचा प्लॅन योग्य वाटला नाही, तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता.

ट्विटरवरील महसूल वाढवण्यासाठी मस्कने हे बदल केले आहेत, हे बदल करण्याचा मस्कचा गेल्या अनेक महिण्यांपासुन प्लॅन होता. अखेरीस त्याने तो यशस्वी करुन दाखविला. त्याला त्याच्या प्लॅटफॉर्मवरून पैसे मिळविण्यासाठी फक्त जाहिरातदारांवर अवलंबून राहायचे नाही. यासाठी,मस्कने जगभरात ब्लू सबस्क्रिप्शन योजना सुरू केली आहे. मस्कने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले होते. त्यानंतर मस्क म्हणाले होते की, कंपनीला दररोज 32 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी मस्कने ट्विटरची संपूर्ण रणनीती बदलली आहे.