Elon Musk : जेव्हापासुन एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतलं आहे, तेव्हापासूनच त्यांनी ट्विटर मध्ये अनेक बदल करुन आश्चर्यचकित केले आहे. काहीच दिवसांपूर्वी ट्विटरचा बदललेला लोगो बघुन सगळ्यांना आश्चर्यचा धक्का बसला. आता तर, ट्विटरचे एक्स कॉर्प नावाच्या कंपनीत विलीनीकरण झाल्याची माहिती पूढे आलेली आहे. मात्र याबाबत मस्क यांनी अद्याप कुठलेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
सॅन फ्रान्सिस्कोची एक्स कॉर्प कंपनी
एक्स कॉर्प (X Corp) ही एक खाजगी कंपनी आहे, तिचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे आहे. 4 एप्रिल रोजी सर्व कायदेशीर कागद पत्रांची पूर्तता करुन Twitter एक्स कॉर्प नावाच्या कंपनीत विलिन केल्या गेले, अशी महिती पूढे आली आहे. परंतु ट्विटर युजर्स हे X Corp काय आहे, याबाबत संभ्रमात दिसुन येत आहे. मुख्य म्हणजे टरचे सीईओ एलन मस्क यांनी याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा न करता केवळ एक ट्विट केले आहे.
चाहते करणार खऱ्या ट्विटरला मिस
प्रयोगशील व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर देखील त्यावर विविध प्रयोग केले. तर शेवटचा प्रयोग अगदी ट्विटरची ओळख असलेला त्याचा लोगोच बदलविणे हा होता. मस्क यांनी एका पॉडकास्ट दरम्यान सांगितले की, अमेरिकेला एका अश्या सुपर अॅपची आवश्यक्ता आहे, जी चीनच्या WeChat ला टक्कर देऊ शकेल. त्यामुळे आता एक असे अॅप अस्तित्वात येण्याची शक्यता आहे, ज्यात सगळे काही असेल म्हणजेच एव्हरीथिंग अॅप. मात्र काहीही झाले तरी यूजर्स ट्विटरला प्रचंड मिस करणार, हे नक्की.
ब्लू टिक काढली जाणार (Blue Tick)
ज्या ब्लू टिक वरुन एवढी चर्चा झाली, तीच आता काढली जाणार आहे. मुख्य म्हणजे खुद्द एलन मस्क यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी Verified Twitter खात्यांवर ब्लू टिक्सची मर्यादा निश्चित केली आहे. आणि ती काढण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल असल्याचे देखील मस्क यांनी ट्विट करुन सांगितले. म्हणजे आता ब्लू टिक असलेल्या Verified Twitter खातेधारकांनाच चेकमार्कसाठी पैसे द्यावे लागतील.