Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

India Energy Week: हेवी लोड ट्रक हायड्रोजन इंधनावर चालणार; काळा धुर नाही तर पाणी, ऑक्सिजन येईल सायलेन्सरमधून बाहेर

पेट्रोल-डिझेल आधारित इंजिनमधून इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि इतर अनेक विषारी वायू बाहेर पडतात. मात्र, हायड्रोजन इंजिनमधून इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर पाणी आणि ऑक्सिजन बाहेर पडेल. या नव्या तंत्रज्ञानामुळे झिरो प्रदूषण होईल.

Read More

Auto sales: जानेवारीत वाहनविक्री 14 टक्क्यांनी वाढली; 18 लाखांपेक्षा जास्त गाड्या भारतीयांनी घरी आणल्या

वाहनांच्या किंमती वाढत असतानाही भारतीयांचे वाहनप्रेम तिळमात्रही कमी झाले नाही. जानेवारी महिन्यात भारतामध्ये विक्रमी प्रमाणात गाड्यांची विक्री झाली. तसेच बुकिंगही मोठ्या प्रमाणावर झाले. जानेवारी 2022 च्या तुलनेत भारतात वाहनांची विक्री 14% वाढली आहे.

Read More

Car Testing in India: टेस्टिंगसाठी येणाऱ्या कार्सवरील आयात शुल्क माफ; भारत बनणार टेस्टिंग हब

अपघात सुरक्षा आणि इतर प्रकारच्या चाचण्यांसाठी भारतात येणाऱ्या गाड्यांवरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जागतिक वाहननिर्मिती कंपन्यांनी चाचण्यांसाठी जास्तीत जास्त गाड्या भारतात आणाव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Read More

Electric Vehicles Increased: देशात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढली, फक्त 6 वर्षात 20 लाख वाहनांची झाली विक्री

Electric Vehicles: सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेज वाढत चालली आहे. ग्राहक मोठया संख्येने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करताना दिसत आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांची निवड करताना दिसत आहे. मागील 6 वर्षात 20 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली असल्याचे सांगितले जात आहे.

Read More

Hyundai Car sales: ग्रामीण बाजारपेठेवर ह्युंदाई मोटर्सची नजर; मारुती सुझुकीला टक्कर देण्यास सज्ज

ह्युंदाई मोटर्सच्या गाड्या शहरांमध्ये सर्वाधिक विक्री होतात. मात्र, आता कंपनीने ग्रामीण भागावर देखील लक्ष्य केंद्रित केले आहे. मागील वर्षभरात कंपनीने ग्रामीण भागात 1 लाखांपेक्षा जास्त कारची विक्री केली. क्रेटा कारची ग्रामीण भागातील मागणीही वाढत आहे.

Read More

Car Sale In Rural Area: 'या' कंपनीच्या गाड्यांची गावोगावी विक्री; स्वस्त गाडी खरेदी करण्यास ग्राहकांचे प्राधान्य

Hyundai Car Sale Rural area : मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या कारना शहरी भागात चांगली पसंती आहे. ग्रामीण भागात कायरो, स्कॉर्पिओ आणि थार या गाड्या उत्तम सस्पेन्शनमुळे सहज वापरता येतात. ह्युंदाई मोटर्स इंडिया (Hyundai Motors India) च्या ग्रामीण बाजारातील विक्रीने गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 1 लाख युनिट्सचा आकडा पार केला.

Read More

BS-6 two Rules: भारत-6 च्या दुसऱ्या टप्प्यातील नियमांमुळे तुमच्या कारमध्ये कोणते बदल होतील?

भारतामध्ये प्रदूषण रोखण्यासाठी भारत-6 ही नियमावली लागू झाली असून तिचा दुसरा टप्पा एप्रिल-6 पासून लागू होत आहे. त्यामुळे वाहननिर्मिती कंपन्यांना अधिक कठोर निर्बंधांचे पालन करावे लागणार आहेत. फक्त कागदावरचे नाही तर गाडी चालवताना किती प्रदूषण होते, यावरही नियंत्रण येणार आहे.

Read More

Mahidra Electric Cars: जाणून घ्या, महिद्रांच्या कधी व कोणत्या इलेक्ट्रिक कार्स दिसणार भारतात

Mahindra Company Latest News: महिंद्रा कंपनी लवकरच भारतात इलेक्ट्रिक कार्स सादर करणार आहे. 10 फ्रेबुवारीला या इलेक्ट्रिक कार्स सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या इलेक्ट्रिक कार्स कोणत्या आहेत ते जाणून घेवुयात.

Read More

Xiaomi Electric Car: चिनी मोबाईल कंपनी शाओमी आता कारही बनवणार; पाहा कशी दिसते इलेक्ट्रिक कार

Xiaomi Electric Car: शाओमी ने स्मार्टफोन मार्केटमध्ये यश मिळवल्यानंतर कंपनी आता वाहन उद्योगात उतरणार आहे. ही चीनी कंपनी परवडणाऱ्या किमतीत उत्तम स्मार्टफोन तयार करण्यासाठी ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. स्मार्टफोन व्यतिरिक्त शाओमीच्या पोर्टफोलिओमध्ये टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉपसह इतर अनेक उत्पादने आहेत. रिपोर्ट्सनुसार, शाओमी आता इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेश करण्यासाठी मोठी तयारी करत आहे.

Read More

Budget 2023: बीएमडब्ल्यू, मर्सिडिज, लेक्सस गाड्यांच्या किमती वाढणार; आयात शुल्क वाढीचा परिणाम

भारतात आयात होणाऱ्या आलिशान इलेक्ट्रिक कारवरील (Luxurious electric car import duty hike) आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आलिशान कार खरेदी महागणार आहे. पूर्ण तयार स्थितीतील इलेक्ट्रिक कार्सवर म्हणजेच completely built units (CBUs) ही अतिरिक्त शुल्क लागू असणार आहे.

Read More

KIA Car sale: कियाच्या सेल्टोस आणि सोनेट गाड्यांची क्रेझ! जानेवारीमध्ये झाली सर्वाधिक विक्री

किया कंपनीच्या गाड्यांनी भारतीय ग्राहकांना भुरळ घातली आहे. मागील काही दिवसांत रस्त्यांवर कियाच्या सोनेट आणि सेल्टोस या गाड्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीतूनही हे स्पष्ट होत आहे. आकर्षक डिझाइन आणि फिचर्सने दोन्ही गाड्यांची मागणी वाढत आहे.

Read More

इलेक्ट्रिक दुचाकींची वाढ सुसाट! 2030 पर्यंत तब्बल 2 कोटी 20 लाख गाड्या दिसणार रस्त्यावर

भारतामध्ये येत्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेलचा वाढता खर्च तसेच वाहन देखभालीच्या खर्चामध्ये वाढ होत असल्याने ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिकल टु व्हिलरला राहील, असे या अहवालात म्हटले आहे.

Read More