Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahidra Electric Cars: जाणून घ्या, महिद्रांच्या कधी व कोणत्या इलेक्ट्रिक कार्स दिसणार भारतात

Mahidra Electric Cars Update

Image Source : http://www.cardekho.com/

Mahindra Company Latest News: महिंद्रा कंपनी लवकरच भारतात इलेक्ट्रिक कार्स सादर करणार आहे. 10 फ्रेबुवारीला या इलेक्ट्रिक कार्स सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या इलेक्ट्रिक कार्स कोणत्या आहेत ते जाणून घेवुयात.

Mahidra Electric Cars Update: भारतात महिंद्रा कंपनीच्या गाडयांचा चाहतावर्ग मोठा आहे. ग्राहक शक्यतो महिंद्राची गाडी घेण्यास प्राधान्य देतो. आता यंदाही ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक गाडयांची क्रेझ पाहता, महिंद्रा देखील काही इलेक्ट्रिक कार्स भारतात सादर करण्याच्या तयारीत आहे.

भारतात कुठे करणार सादर? (Where will it be Presented in India)

महिंद्रा पहिल्यांदाच भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्स सादर करीत असल्याची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. तसेच या कंपनीने याबाबत एक टीझरदेखील शेयर केला आहे. या इलेक्ट्रिक गाडया भारतात 10 फेब्रुवारी 2023 रोजी हैदराबाद येथील ‘ईव्ही फॅशन फेस्टिव्हल’ (EV Fashion Festival) मध्ये सादर करण्यात येणार आहे.

कुठे तयार केल्या या गाडया (Where are these Cars Made)

देशाची प्रमुख एसयूव्ही निर्माता कंपनी महिंद्रा कंपनी इलेक्ट्रिक कार्स पहिल्यांदा भारतात सादर करणार आहे. या कंपनीने ब्रिटनमध्ये या गाडयांची निर्मिती केली आहे. या गाडयांमध्ये फोक्सवेगन, ऑडी, फोर्ड आणि स्कोडा सारख्या काही कंपन्याचादेखील समावेश आहे.

भारतात कोणत्या कार दिसणार? (Which Cars will be seen in India)

महिंद्रा कंपनीकडून हैदराबाद मध्ये होणाऱ्या ईव्ही फॅशन फेस्टिव्हल मध्ये काही इलेक्ट्रिक कार पाहायला मिळणार आहेत. यात एक्सयूव्ही ई8 (XUV E8), एक्सयूव्ही ई9 (XUV E9), बीई 5 (BE 5), बीई 7 (BE 7), बीई 9 (BE 9) कोडनेमच्या इलेक्ट्रिक गाडयाचा समावेश आहे. तसेच एक्सयूव्ही ई8 ला एक्सयूव्ही 700 इलेक्ट्रिक व्हर्जन म्हणून सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एक्सयूवी 400 लाँच (XUV400 Launched)

महिंद्रा कंपनीने भारतीय बाजारात इलेक्ट्रिक एसयूव्हीला काही दिवसांपूर्वीच लाँच केले आहे. त्या गाडीचे नाव एक्सयूव्ही 400 असे आहे. ही कार इलेक्ट्रिक आहे. 26 जानेवारी या गाडीची बुकिंग सुरू केली आहे. अगदी कमी वेळेत ही कार दहा हजारपेक्षा अधिक ग्राहकांनी बुक केली आहे. कंपनी पहिल्या इलेक्ट्रिक गाडीची डिलिव्हरी मार्चपासून करणार असल्याची शक्यता आहे.