Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: बीएमडब्ल्यू, मर्सिडिज, लेक्सस गाड्यांच्या किमती वाढणार; आयात शुल्क वाढीचा परिणाम

car import duty

भारतात आयात होणाऱ्या आलिशान इलेक्ट्रिक कारवरील (Luxurious electric car import duty hike) आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आलिशान कार खरेदी महागणार आहे. पूर्ण तयार स्थितीतील इलेक्ट्रिक कार्सवर म्हणजेच completely built units (CBUs) ही अतिरिक्त शुल्क लागू असणार आहे.

Budget 2023: बजेटने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला असला तरी श्रीमंतांसाठी कार महाग झाल्या आहेत. आयात होणाऱ्या आलिशान इलेक्ट्रिक कारवरील (Luxurious electric car import duty hike) आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आलिशान कार खरेदी महागणार आहे. पूर्ण तयार स्थितीतील इलेक्ट्रिक कार्सवर म्हणजेच completely built units (CBUs) ही अतिरिक्त शुल्क लागू असणार आहे. देशांतर्गत तयार होणाऱ्या गाड्यांवर या शुल्कवाढीचा कोणताही परिणाम होणार नाही.

परदेशातून गाडी आयात करताना त्यामध्ये वाहतूक आणि विम्याचा खर्चही समाविष्ट असतो. त्यात आता आयात शुल्क वाढीची भर पडली आहे. 40 हजार डॉलरपेक्षा जास्त किंमतीच्या परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या गाड्यांवर आयात शुल्क 70% आकारण्यात येणार आहे. पूर्वी 60% शुल्क आकारण्यात येत होते. यामध्ये दहा टक्के वाढ केली आहे. तसेच 40 हजार डॉलरपेक्षा कमी किंमतीच्या मात्र, इंजिन क्षमता 3 आणि अडीच हजार असणाऱ्या गाड्यांवरील आयात शुल्क 60% वरून 70 टक्के करण्यात आले आहे. असेंबल करता येणाऱ्या गाड्यांवरील आयात शुल्क 30% वरून 35% करण्यात आले आहे.

आलिशान कारच्या किंमती वाढणार? (Luxurious electric car import duty hike)

बीएमडब्ल्यू, मर्सिडिज, लेक्सस कंपन्यांच्या महागड्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत. सोबतच ऑडी, एमजी या कंपन्या ज्या गाड्या परदेशातून आयात करतात, त्यांच्या किंमती वाढणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या भांडवली वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे. म्हणजेच वाहन निर्मिती कंपन्यांना जर भारतामध्ये प्रकल्प उभा करायचा असेल किंवा नवीन मशिन खरेदी करायचा असेल तर त्यासाठी आयात केलेल्या मालावर कर कमी द्यावा लागेल. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी तयार करण्यासाठी ज्या मशिनरी आयात करण्यात येतील, त्यावरील आयात शुल्कही कमी केले आहे. या गोष्टींमुळे वाहन निर्मितीसाठी जो खर्च लागतो तो कमी होईल, आणि त्याचा परिणाम गाड्यांच्या किंमती कमी होण्यात होईल.

इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी आणि जड वाहनांच्या भारतातील किंमती सद्यस्थितीत जास्त आहेत. कारण वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरी, सूटे पार्ट आणि मशिनरीचा मोठा खर्च आहे. भविष्यात बॅटरी निर्मिती भारतामध्येच मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या वस्तुंच्या आयात शुल्कात कपात केली आहे. सध्या अनेक ब्रँड्च्या इव्ही दुचाकी 1 लाखांपेक्षा किंमतीच्या आहेत. तसेच इव्ही कारच्या किंमतीही 15 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे ग्राहक इव्ही घेण्यास तयार नाहीत.