Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Self Balancing E Scooter: जगातली पहिली तोल सांभाळणारी स्कूटर भारतात लाँच, खासियत आणि किंमत जाणून घेण्यासाठी वाचा

Self Standing E-scooter

Image Source : www.iamabiker.com

Self Balancing E Scooter: मुंबईमधील लीगर मोबिलिटी(Liger Mobility) या कंपनीने आपली पहिली सेल्फ बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर 'Auto Expo 2023' मध्ये प्रदर्शित केली आहे.

Liger X and Liger X Plus Electric Scooter: दिल्ली येथील ग्रेटर नोएडा येथे गेल्या काही दिवसापासून 'Auto Expo 2023' सुरू झाला आहे. यामध्ये देशातील आणि विदेशातील अनेक कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर लोकांना ऑटो एक्स्पो मोटर शो(Auto Expo Motor Show) पाहायला मिळत आहे. याच शोमध्ये अनेक लोकांचे लक्ष एका बॅलेन्सिंग टेक्नॉलॉजी(Balancing Technology) असणाऱ्या ई-स्कुटरने वेधले आहे. मुंबईमधील लीगर मोबिलिटी(Liger Mobility) या कंपनीने आपली पहिली सेल्फ बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर Auto Expo 2023 मध्ये प्रदर्शित केली आहे. रिपोर्ट्सनुसार ही स्कूटर आता उत्पादनासाठी तयार आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हिंग शिकणारे नवशिकाऊ ही इलेक्ट्रिक स्कूटर सहज चालवू शकणार आहेत. यावरून प्रवास करताना ई-स्कूटर थांबल्यास किंवा तिचा वेग कमी झाल्यास सेल्फ बॅलेन्सिंग टेक्नॉलॉजीमुळे चालक पडण्याची भीती नसेल असा दावा कंपनीने केला आहे. चला तर या ई-स्कुटरची नक्की  खासियत काय आहे जाणून घेऊयात.

Liger Mobility च्या इलेक्ट्रिक स्कुटरची खासियत काय?

या कंपनीने 'Liger X' आणि 'Liger X Plus' असे दोन नवीन फीचर्स सर्वांसमोर आणले आहे. Liger ने ऑटोबॅलेंसिंग(Auto Balancing) तंत्रज्ञानाचा वापर करून ई-स्कूटर डिझाईन केली आहे. या गाडीबाबत कंपनीने सांगितले आहे की, सेल्फ  बॅलेन्सिंग वैशिष्ट्यामुळे ई-स्कूटर कमी वेगाने किंवा थांबल्यावरही आपोआप  बॅलेन्स राखण्यासाठी मदत करते. साधारणपणे दुचाकी वाहनाचा बॅलन्स(Balance) जास्त वेगामध्ये सहज साधता येतो मात्र वेग कमी झाला की हाच बॅलन्स करणे अवघड जाते, म्हणूनच सेल्फ-बॅलन्स फीचरने(Self Balance Feature) सुसज्ज असलेली ई-स्कूटर गाडीचा वेग कमी झाल्यावरही किंवा थांबल्यावर देखील सहज बॅलन्स करेल. या ई-स्कूटरमध्ये ड्रायव्हरला सेल्फ बॅलन्स फीचर मॅन्युअली सेट करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे, त्यामुळे ड्रायव्हर त्याच्या वेगानुसार हे फीचर सेट करू शकणार आहे.

या एक्स्ट्रा सुविधाही मिळतील

Liger X आणि Liger X Plus अशा दोन्ही प्रकारांमध्ये स्मार्टफोनशी कनेक्ट(Smartphone Connect) होण्यासाठी 4G कनेक्टिव्हिटी आणि GPS कनेक्शन देण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने या स्कूटरचे लाईव्ह लोकेशन(Live Location), राईड हिस्ट्री(Ride History), बॅटरी पॅक एसओसी(Battery Pack SOC) आणि टेंपरेचरची(Temperature) माहिती चालकाला वेळोवेळी मिळणार आहे. नवीन मोबाईल अॅप कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असलेल्या या ई-स्कूटरमध्ये अपघात सेवा, देखभाल यासंबंधीच्या सर्व सूचनाही देण्यात आल्या आहेत. Liger X Plus मध्ये अतिरिक्त TFT डिस्प्ले देण्यात आलायं, ज्यामुळे  नेव्हिगेशन माहिती, फोन कॉल(Phone Call) आणि मेसेज अलर्ट(Message alert) यासारखी माहिती चालकाला मिळणार आहे.

सेल्फ-बॅलन्सिंग ई-स्कूटरची किंमत किती असेल?

Liger X आणि Liger X Plus या 5 रंगांमध्ये सध्या उपलब्ध करून देत आहेत , ज्यामध्ये ग्रे(Grey), पोलर व्हाइट(Polar White), ब्लू(Blue), टायटॅनियम(Titanium) आणि रेड(Red) या रंंगाचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग ग्राहकांना 2023 च्या मध्यापासून करता येईल व 2023 च्या शेवटी या गाड्यांची डिलिव्हरी मिळणार आहे असे कंपनीने सांगितले आहे. Liger X ची शोरूम किंमत सुमारे 1.7 लाख रुपये असून Liger X Plus ची सुमारे 1.9 लाख रुपये असणार आहे.