Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car Sale In Rural Area: 'या' कंपनीच्या गाड्यांची गावोगावी विक्री; स्वस्त गाडी खरेदी करण्यास ग्राहकांचे प्राधान्य

Car Sale In Rural Area: 'या' कंपनीच्या गाड्यांची गावोगावी विक्री; स्वस्त गाडी खरेदी करण्यास ग्राहकांचे प्राधान्य

Hyundai Car Sale Rural area : मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या कारना शहरी भागात चांगली पसंती आहे. ग्रामीण भागात कायरो, स्कॉर्पिओ आणि थार या गाड्या उत्तम सस्पेन्शनमुळे सहज वापरता येतात. ह्युंदाई मोटर्स इंडिया (Hyundai Motors India) च्या ग्रामीण बाजारातील विक्रीने गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 1 लाख युनिट्सचा आकडा पार केला.

मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या कारना शहरी भागात चांगली पसंती आहे. ग्रामीण भागात कायरो, स्कॉर्पिओ आणि थार या गाड्या उत्तम सस्पेन्शनमुळे   सहज वापरता येतात. मात्र, दुसऱ्या एका कंपनीने सर्वत्र विक्रीचे आकडे जाहीर केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. ह्युंदाई मोटर्स इंडिया  (Hyundai Motors India) च्या ग्रामीण बाजारातील विक्रीने गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 1 लाख युनिट्सचा आकडा पार केला.

या मॉडेल्सच्या मागणीत वाढ

कंपनीने त्यांच्या मॉडेल्सचाही खुलासा केला ज्यांना सर्वाधिक पसंती मिळाली. कंपनीचे ह्युंदाई क्रेटा  (Hyundai Creta) आणि ह्युंदाई व्हेन्यू  (Hyundai Venue) हे व्हेरीयंट ग्राहकांना  सर्वाधिक आवडले आहे. तर ग्रामीण भागातून ग्रँड आयटेन (i10) निओसला चांगली मागणी आली आहे.

ह्युंदाई मोटर्स इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) तरुण गर्ग यांनी सांगितले की, 2019 च्या तुलनेत 2022 मध्ये ग्रामीण भागातील वाहन विक्री 17 टक्क्यांनी वाढली आहे. पुढे गर्ग म्हणाले की, ग्रामीण भागातील मागणीकडे कंपनीचे अधिक लक्ष असल्याने, या कंपनीने 2023 मध्ये ग्रामीण भागातील कामगारांची संख्या  5,000 पेक्षा जास्त वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ग्रामीण बेरोजगारी या अडचणीप्रती आपले कार्य अधिक बळकट करण्यासाठी, कंपनीने सिलीगुडी (पश्चिम बंगाल) येथे आपल्या 100 व्या मोबाईल सर्व्हिस व्हॅन (MSV) ला हिरवा झेंडा दाखवला.

EV उत्पादनासाठी ह्युंदाई कंपनीने केली मोठी गुंतवणुक

कंपनीने EV उत्पादनासाठी 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आगामी काळात 6 नवीन इलेक्ट्रिक कार बनवण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीने अलीकडेच ऑटो एक्सपोमध्ये आपली दुसरी इलेक्ट्रिक कार ह्युंदाई आयोनिक 5 ( Hyundai Ioniq 5) लॉन्च केली. या इलेक्ट्रिक कारची किंमत 44.95 लाख रुपये आहे. 72.6kWh बॅटरी पॅक आणि 217bhpसह हे इलेक्ट्रिक वाहन आहे. दुसरीकडे, आयोनिक 5, एका चार्जवर ARAI-प्रमाणित 631km इतके अंतर कापू शकते. ही गाडी सुपरफास्ट 800V चार्जिंगला सपोर्ट करते, जे फक्त 18 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत बॅटरी पॅक चार्ज करू शकते.