Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Auto sales: जानेवारीत वाहनविक्री 14 टक्क्यांनी वाढली; 18 लाखांपेक्षा जास्त गाड्या भारतीयांनी घरी आणल्या

Auto retail sales

वाहनांच्या किंमती वाढत असतानाही भारतीयांचे वाहनप्रेम तिळमात्रही कमी झाले नाही. जानेवारी महिन्यात भारतामध्ये विक्रमी प्रमाणात गाड्यांची विक्री झाली. तसेच बुकिंगही मोठ्या प्रमाणावर झाले. जानेवारी 2022 च्या तुलनेत भारतात वाहनांची विक्री 14% वाढली आहे.

Auto sales: वाहनांच्या किंमती वाढत असतानाही भारतीयांचे वाहनप्रेम तिळमात्रही कमी झाले नाही. जानेवारी महिन्यात भारतामध्ये विक्रमी गाड्यांची विक्री झाली. तसेच बुकिंगही मोठ्या प्रमाणावर झाली. जानेवारी 2022 च्या तुलनेत भारतात वाहनांची विक्री 14% वाढली आहे. मागील महिन्यात तब्बल 18 लाख 27 हजार वाहनांची विक्री झाली.

कार, दुचाकींसह तीनचाकी गाड्यांचीही मागणी वाढली (Two-wheeler, car demand)

मागील वर्षी जानेवारी 2022 मध्ये सुमारे 16 लाख वाहनांची व्रिक्री झाली होती. त्यातुलनेत आता वाहनांची विक्री वाढली आहे. पॅसेंजर वाहनांनी मागील वर्षाच्या तुलनेत 22% वाढ नोंदवली आहे. तर एकूण 3 लाख 40 हजार वाहने विकली गेली. तर दुचाकींची विक्री 10% वाढली. एकूण 12 लाख 65 हजार दुचाकी मागील महिन्यात विकल्या गेल्या. तर तीन चाकी गाड्यांची विक्री 59% वाढून 65 हजार 796 इतकी झाली. मागील वर्षी जानेवारी महिन्यात तीनचाकी गाड्यांची विक्री 41 हजार 487 इतकी झाली होती.

कमर्शियल वाहनांची मागणी वाढली (commercial vehicle demand increased)

कमर्शियल गाड्यांची विक्री जानेवारी 2022 मध्ये 70 हजार 853 इतकी झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन 82 हजार 428 इतकी झाली. तर ट्र्रॅक्टरची विक्रीही 8 हजाराने वाढली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने ही आकडेवारी जाहिर केली आहे. FADA चे अध्यक्ष मनिष सिंघानिया यांनी म्हटले की, 2022 ची तुलना करता वाहनविक्री नक्कीच वाढली आहे. मात्र, कोरोनापूर्व काळाच विचार करता 2020 च्या आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी 8 टक्क्यांनी कमी आहे. वाहनांची मागणी, बुकिंग आणि गाड्यांच्या पुरवठा साखळीतील अडथळे दूर झाल्याने विक्री वाढली".

ग्रामीण भागात वाहनविक्री रोडावली (Rural vehicle demand)

कोरोनानंतर ग्रामीण भागात वाहनांची विक्री रोडावली असून अजूनही पूर्णत: सुरळीत झाली नाही. वाहनांच्या किंमती तसेच सर्व्हिसिंगच्या वाढत्या खर्चामुळे विक्री रोडावली आहे. दरम्यान, नागरिकांच्या उत्पन्नात म्हणावी अशी वाढ न झाल्याने गाड्यांची खरेदी कमी होत आहे. तसेच पायाभूत सुविधांची वाढ, मालवाहतुकीत वाढ झाल्याने कमर्शियल वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.