Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electric Vehicles Increased: देशात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढली, फक्त 6 वर्षात 20 लाख वाहनांची झाली विक्री

Purchase of Electric Vehicles Increased in The Country

Electric Vehicles: सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेज वाढत चालली आहे. ग्राहक मोठया संख्येने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करताना दिसत आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांची निवड करताना दिसत आहे. मागील 6 वर्षात 20 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली असल्याचे सांगितले जात आहे.

Purchase of Electric Vehicles Increased in The Country: देशात सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात ग्राहकांनी मागील 6 वर्षात 20 लाख इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केली आहे.

काय आहे कारण? (What is the Reason)

भारतातील ग्राहक हा मोठया प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करीत आहे. देशात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतीदेखील याला कारणीभुत आहे. तसेच केंद्रीय रस्ता परिवहन मंत्रालयाकडून विविध प्रकारच्या सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित केले जाते. देशात 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 200 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ही वाढ मागील वर्षी 1 लाख युनिट्सच्या इलेक्ट्रिकल वाहन खरेदीमध्ये पाहायला मिळत असल्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी सांगितले आहे.

कोणत्या वाहनांमध्ये वाढ? (Increase in which Vehicles)

सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये थ्री व्हीलर खरेदी करण्याची संख्या मोठी आहे. 2018 मध्ये 1.08 लाख युनिट्सवरून 2022 मध्ये 3.38 लाख युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. दुचाकी खरेदी करण्याचेदेखील प्रमाण वाढले आहे. 2023 मध्ये इलेक्ट्रिक गाडया खरेदी करण्याचे प्रमाण वाढणार आहे. कारण वर्षाच्या सुरूवातीलच म्हणजे जानेवारीमध्ये आधीच नोंदणीकृत 57447 वाहने आहेत.  

2030 पर्यंत शहरांमध्ये 46397 पब्लिक चार्जिंग स्टेशनचे लक्ष्य (Target 46397 Public Charging Stations in Cities by 2030)

इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. पब्लिक चार्जिंग स्टेशन तयार करण्यासाठी ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी ने 9 प्रमुख शहरांसाठीचा कृती आराखडादेखील तयार केला आहे. 2030 पर्यंत शहरांमध्ये 46397 पब्लिक चार्जिंग स्टेशनची निर्मिती करण्याचे लक्ष्य असल्याचे  केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी स्पष्ट केले.