किया कंपनीच्या गाड्यांनी भारतीय ग्राहकांना भुरळ घातली आहे. मागील काही दिवसांत रस्त्यांवर कियाच्या सोनेट आणि सेल्टोस या गाड्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीतूनही याच गोष्टी समोर येत आहेत. जानेवारी महिन्यात किया कंपनीने सर्वाधिक गाड्यांची विक्री केली. तसेच मागील वर्षी जानेवारी महिन्याच्या तुलनेत या वर्षी कंपनीने 48% वाढ नोंदवली आहे.
जानेवारी महिन्यात किया कंनपीच्या एकूण 28 हजार 634 गाड्यांची विक्री झाली. मागील वर्षी जानेवारी 2022 मध्ये कंपनीच्या फक्त 19 हजार गाड्यांची विक्री झाली होती. त्यात यावर्षी जानेवारीत मोठी वाढ झाली आहे. भारतामध्ये किया कंपनीने गाड्या लाँच केल्यापासून आतापर्यंत साडेसहा लाख गाड्यांची विक्री झाल्याचे कंपनीने सांगितले.
सेल्टोस आणि सोनेट गाड्यांना सर्वाधिक मागणी (High demand for Seltos and sonnet car)
जानेवारी महिन्यात देशात 10,470 सेल्टोस गाड्या तर 9, 261 सोनेट गाड्यांची विक्री झाली. तर Kia Carens या मॉडेल्सच्या सुमारे 8 हजार गाड्या विकल्या गेल्या. किया कार्निव्हल गाडीची सर्वात कमी विक्री झाली. या मॉडेल्सच्या फक्त 1 हजार गाड्यांची विक्री झाली.
2022 किया कंपनीने 3 लाख 36 हजार 619 गाड्यांची विक्री केली. 2021 साली कंपनीने 2 लाख 27 हजार 844 गाड्यांची विक्री केली होती. याकाळात स्थानिक बाजारातही कंपनीच्या गाड्यांची विक्री वाढली. भारतामध्ये 2021 च्या तुलनेत कंपनीचा सेल सुमारे 40 टक्क्यांनी वाढला. 2021 साली कंपनीने 1 लाख 81 हजार 583 गाड्यांची विक्री केली होती. त्यात 2022 साली वाढ झाली.