Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Energy Week: हेवी लोड ट्रक हायड्रोजन इंधनावर चालणार; काळा धुर नाही तर पाणी, ऑक्सिजन येईल सायलेन्सरमधून बाहेर

India Energy Week

पेट्रोल-डिझेल आधारित इंजिनमधून इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि इतर अनेक विषारी वायू बाहेर पडतात. मात्र, हायड्रोजन इंजिनमधून इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर पाणी आणि ऑक्सिजन बाहेर पडेल. या नव्या तंत्रज्ञानामुळे झिरो प्रदूषण होईल.

India Energy Week: पेट्रोल डिझेल वाहनांना पर्याय इंधन शोधण्यासाठी वाहन निर्मिती कंपन्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. भारतात इलेक्ट्रिक कार आता वाढू लागल्या आहेत. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अशोक लेलँड कंपनीने पहिलीवहीली हायड्रोजन इंधनावर चालणारी अवजड ट्रक प्रदर्शित केली आहे. 'इंडिया एनर्जी विक' India Energy Week या कार्यक्रमात हायड्रोजन ट्रकचे उद्घाटन करण्यात आले. भविष्यात कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सरकारकडून पर्यायी इंधनाला प्रोत्साहन दिले जात आहे.

ट्रकला हायड्रोजन कंम्बशन इंजिन (Hydrogen Internal Combustion Engine- H2-ICE)

बंगळुरू शहरात इंडिया एनर्जी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या हायड्रोजन ट्रकचे उद्घाटन करण्यात आले. या ट्रकला पेट्रोल डिझेल इंधनासाठी वापरण्यात येते तसेच इंटरनल कंम्बशन इंजिन वापरण्यात आले आहे. मात्र, यामध्ये हायड्रोजन इंधन वापरण्यात येते. हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. अशोक लेलँड ही हिंदुजा ग्रुपमधील कंपनी असून अवजड वाहने बनवणारी प्रसिद्ध कंपनी आहे.

रिलायन्स आणि हिंदूजा कंपनी मिळून हायड्रोजन इंधनावर आधारित तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून यावर काम सुरू आहे. या ट्रकमध्ये 19 ते 35 टनाचा माल वाहून नेता येऊ शकतो. हायड्रोजन हा स्वच्छ आणि प्रदूषण न करणार इंधनाचा स्रोत आहे.

इंजिनमधून धूर निघण्याऐवजी बाहेर पडेल पाणी (emissions are only water and oxygen)

पेट्रोल-डिझेल इंजिनमधून इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि इतर अनेक विषारी वायू बाहेर पडतात. मात्र, हायड्रोजन इंजिनमधून पाणी आणि ऑक्सिजन इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर बाहेर पडेल. त्यामुळे या वाहनातून झिरो प्रदूषण होईल. अवजड कमर्शिअल वाहनश्रेणीमध्ये अशोक लेलँड कंपनी कायम नवीन तंत्रज्ञान आणते. रिलायन्स सोबत काम करून आम्ही क्लिन मोबिलिटी मिशनशी कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले, असे अशोक लेलँड कंपनीचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर एन. श्रावणन यांनी सांगितले.