शाओमी (Xiaomi) सध्या दोन ईलेक्ट्रिक कार मॉडेल्सवर काम करत आहे. यापैकी एक इलेक्ट्रिक सेडान असेल. या कार्स प्रीमियम बॅटरी पॅकसह सुसज्ज असतील तसेच यात सुपरफास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात येईल .चीनी टेक कंपनी शाओमी दोन इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहे, त्यापैकी एका मॉडेलचा फोटो लीक झाला आहे. हा फोटो या इलेक्ट्रिक कारच्या रोड टेस्ट दरम्यान घेण्यात आला आहे, यात कार पूर्ण स्टीकर्सचा वापर करून झाकलेली दिसतं आहे. तथापि, ही ती एक सेडान असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की शाओमीची ही आगामी इलेक्ट्रिक कार अमेरिकन कंपनी टेस्लाच्या मॉडेल 3 इलेक्ट्रिक कारला टक्कर देईल.
लॉंचपूर्वीच डीजाइन झाली लिक
शाओमीच्या EV कारचे नाव MS11 हे असेल. 22 जानेवारी रोजी, बीजिंग मोल्डिंग टेक्नॉलॉजीने चुकून इलेक्ट्रिक कारच्या पुढील आणि मागील बंपरचे डिझाइन लीक केले. कंपनीचे म्हणणे आहे की उप-विक्रेत्यांकडून ड्राफ्ट लीक करण्यात आले होते आणि ते या घटनेला थेट जबाबदार नाही.
शाओमीने ठोठावला 1 मिलियन युआन इतका मोठा दंड
बीजिंग मोल्डिंग टेक्नॉलॉजी आणि शाओमी ऑटो यांच्यात एक करार झाला आहे. शाओमीच्या मते या घटनेसाठी बीजिंग मोल्डिंग टेक्नॉलॉजीला जबाबदार धरले जाईल. बीजिंग मोल्डिंगला या उल्लंघनासाठी 1 दशलक्ष युआनचा (रु. 1, 21, 58, 177) मोठा दंड भरावा लागेल आणि सुरक्षाविषयक धोरणांमध्ये सुधार करून ते कडक केले जातील.