Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hyundai Car sales: ग्रामीण बाजारपेठेवर ह्युंदाई मोटर्सची नजर; मारुती सुझुकीला टक्कर देण्यास सज्ज

Hyundai Car sales

ह्युंदाई मोटर्सच्या गाड्या शहरांमध्ये सर्वाधिक विक्री होतात. मात्र, आता कंपनीने ग्रामीण भागावर देखील लक्ष्य केंद्रित केले आहे. मागील वर्षभरात कंपनीने ग्रामीण भागात 1 लाखांपेक्षा जास्त कारची विक्री केली. क्रेटा कारची ग्रामीण भागातील मागणीही वाढत आहे.

ह्युंदाई मोटर्सच्या गाड्या शहरांमध्ये सर्वाधिक विक्री होतात. मात्र, आता कंपनीने ग्रामीण भागावर देखील लक्ष्य केंद्रित केले आहे. मागील वर्षभरात कंपनीने ग्रामीण भागात 1 लाखांपेक्षा जास्त कारची विक्री केली. क्रेटा कारची ग्रामीण भागातील मागणीही वाढत आहे. (Rural car market) ह्युंदाईने वितरक आणि सर्व्हिस सेंटर्सचे जाळे ग्रामीण भागात उभे करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याला यश येताना दिसत आहे.

मारुती सुझुकी मुख्य प्रतिस्पर्धी (Main competitor of Hyundai is Maruti Suzuki)

मागील अनेक वर्षांपासून मारुती सुझुकी, महिंद्रा आणि टाटा कंपनीने ग्रामीण बाजारपेठ काबीज केली आहे. परवडणाऱ्या किंमतीतील आणि मजबूत गाड्यांना ग्रामीण भागात जास्त मागणी असते. मात्र, हे चित्र आता पालटत आहे. आलिशान एसयुव्हीची डिमांड वाढत आहे. त्याचा फायदा ह्युंदाई कंपनीला मिळत आहे. ग्रामीण भागातील क्रेटा, I 20, I 10 या गाड्यांची विक्री 17% वाढल्याचे कंपनीचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर तरुण गर्ग यांनी सांगितले.

ग्रामीण भागात सर्व्हिस देण्यासाठी मोबाईल व्हॅन्स (Hyundai Mobile van service)

ह्युंदाई कंपनीने ग्रामीण भागातील विक्री वाढवण्यासाठी मोबाईल सर्व्हिस युनिट (MSV) सेवा सुरू केली आहे. त्याअंतर्गत 100 सर्व्हिस व्हॅन आत्तापर्यंत सुरू केल्या आहेत. तर 600 पेक्षा जास्त डिलर नेटवर्क उभारले आहे. येत्या काळात वितरकांची संख्या आणखी वाढवण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.

ह्युंदाई कंपनीकडून भविष्यात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर लक्ष्य केंद्रीत करण्यात येत आहे. ग्रामीण भागात EV कार विक्री करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यासाठी कंपनीकडून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत आहे. जागतिक पातळीवर आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या ह्युंदाय मोटर कंपनीने 8.5 बिलियन डॉलर्सची (भारतीय चलनात 70000 कोटी रुपये) गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची इलेक्ट्रिक कारला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे ह्युंदाईकडून इलेक्ट्रिक कार सेगमेंटवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. (Hyundai Motor unveils $8.5-billion spending plan amid EV push)