आपल्या पुढील पिढ्यांनी जर प्रदूषण मुक्त आणि आरोग्यदायी जीवन जगावं असं वाटत असेल तर त्यावर उपाययोजना करण्याची हीच वेळ आहे. जागतिक स्तरावर प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक वर्ष काथ्याकूट झाला आहे. त्यातूनच वाहनांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. भारतामध्ये प्रदूषण रोखण्यासाठी भारत-6 ही नियमावली लागू झाली असून तिचा दुसरा टप्पा एप्रिल पासून लागू होत आहे. त्यामुळे वाहननिर्मिती कंपन्यांना अधिक कठोर निर्बंधांचे पालन करावे लागणार आहेत. फक्त कागदावरचे नियम नाही तर गाडी चालवताना नियमांचे पालन होत आहे की नाही यावर नियंत्रण येणार आहे.
काय आहे भारत-6 -2 नियमावली?
प्रोग्राम्ड फ्युअल इंजेक्टर -
प्रोग्राम्ड फ्युअर इंजेक्टर ही अत्याधुनिक तंत्रज्ञान असून याद्वारे वाहन सुरू असताना इंजिनला सम प्रमाणात योग्य इंधनाचा पुरवठा केला जातो. अतिरिक्त इंधन इंजिनला होऊन प्रदूषण टाळता येते. मात्र, हे तंत्रज्ञान गाड्यांमध्ये बसवण्यासाठी सेमिकंडक्टरची गरज पडते. त्याद्वारे इंधनाचा फ्लो नियमित ठेवला जातो. भारत-6 च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हे फ्युअल इंजेक्टर गाड्यांमध्ये बसवणे वाहन कंपन्यांना अनिवार्य होणार आहे.
1.गाडी चालवताना वेग कमी जास्त केला जातो, अशा परिस्थितीत इंधन किती वापरले जाते ते समजेल.
2.खराब, रस्ता, ट्रॅफिक, गाडीत हेवी लोड असताना इंधनाच्या गरजेत काही बदल होतो का? हे समजेल.
3.सेंसन्सरद्वारे इंजिनचे तापमान, ऑइल यांची गाडी चालवत असताना अचूक माहिती मिळेल.
4.यामुळे इंधनाचा कार्यक्षमतेने वापर होऊन प्रदूषण रोखण्यास मदत होईल.
सेल्फ डायग्नॉस्टिक डिव्हाइस अनिवार्य -OBD2
भारत 6 च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये वाहनांमध्ये OB2 हा डिव्हाइस बसवणे अनिवार्य असणार आहे. याद्वारे इंधनाचा वापर नियमानुसार होतो की नाही हे तपासता येणार आहे. जर वाहनांमधून अतिरिक्त प्रदूषण होत असेल तर कंपन्यांना दंड भरावा लागणार आहे. फक्त प्रयोगशाळेत नाही तर वाहन रस्त्यावर चालवताना या नियमांचे बंधन कंपन्यांना असणार आहे. Corporate Average Fuel Economy (CAFE 2) असे या नियमांना नाव देण्यात आले आहे.
वाहनांच्या किंमती वाढणार? (Vehicle prices bound to rise after BS-6 two norm)
1 एप्रिल पासून दुचाकी, चारचाकी आणि जड वाहनांनाही भारत 6 च्या दुसऱ्या टप्प्यातील नियम लागू होणार आहेत. त्यामुळे वाहनांच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कंपन्यांना प्रदूषण कमी करण्यासाठी इंजिनमध्ये अनेक बदल करावे लागतील. तसेच सेमिकंडक्टर आणि इतर डिव्हाईस गाडीमध्ये बसवावे लागतील. त्याचा खर्च वाढल्याने सहाजिकच गाड्यांच्या किंमतीही वाढतील.