Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car Testing in India: टेस्टिंगसाठी येणाऱ्या कार्सवरील आयात शुल्क माफ; भारत बनणार टेस्टिंग हब

Car Testing in India

अपघात सुरक्षा आणि इतर प्रकारच्या चाचण्यांसाठी भारतात येणाऱ्या गाड्यांवरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जागतिक वाहननिर्मिती कंपन्यांनी चाचण्यांसाठी जास्तीत जास्त गाड्या भारतात आणाव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Car Testing in India: अपघात सुरक्षा आणि इतर प्रकारच्या चाचण्यांसाठी भारतात येणाऱ्या कार्सवरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जागतिक वाहननिर्मिती कंपन्यांनी चाचण्यांसाठी जास्तीत जास्त गाड्या भारतात आणाव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे. भविष्यात भारताला टेस्टिंग हब म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

कार चाचणी व्यवसायाची वाढ (India aiming to increase testing business)

इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (iCAT) आणि  Automotive Research Association of India (ARAI) या संस्थांमध्ये परदेशातून मोठ्या प्रमाणावर गाड्या भारतात येत असतात. त्यावर सुमारे 252% आयात शुल्क आकारण्यात येत होती. हे आयात शुल्क आता रद्द करण्यात येणार आहे. अवजड उद्योग खात्याचे मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे. भारतातील टेस्टिंग व्यवसाय या निर्णयामुळे अधिक स्पर्धात्मक होईल, असे ते म्हणाले.

"1 फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात आली होती. जगभरातील काही निवडक देशांमध्येच वाहन चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. जागतिक मानांकनानुसार चाचणी घेण्याची क्षमता भारतीय कंपन्यांमध्ये आहे. त्यामुळे जगभरातील वाहननिर्मिती कंपन्या टेस्टिंगसाठी कार भारतामध्ये विना शुल्क आणू शकतील, असे पांडे यांनी सांगितले.

वाहन चाचणीमधील आघाडीचे देश( Top countries for car testing)

सध्या ब्रिटन, जपान, कोरिया, चीन आणि तैवान या देशांमध्ये सर्वाधिक वाहनांची चाचणी घेण्यात येते. आयात शुल्क रद्द केल्यामुळे कार निर्मिती कंपन्यांनाही अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्मिती करण्यासाठी मदत होईल. भारतामध्ये सध्या चार ठिकाणी टेस्टिंग सेंटर्स आहेत. iCAT (मानेसर), ARAI (पुणे), National Automotive Test Tracks (NATRAX, पितमपूर), Global Automotive Research Center, ओरागडम, तमिळनाडू येथे आहेत. आयात शुल्क रद्द केल्यामुळे या संस्थांकडे येणाऱ्या गाड्यांची संख्या आणखी वाढेल.