Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Twitter Update: ट्विटरचे मुंबई आणि दिल्लीतले ऑफिस बंद, एलन मस्क यांची कारवाई

Twitter closes offices in Delhi, Mumbai: दिल्ली आणि मुंबईतील कार्यालये बंद झाल्यामुळे ट्विटरचे बंगळुरूस्थित केवळ एकच कार्यालय सध्या सुरु राहणार आहे. भारतात ट्विटरचे करोडो वापरकर्ते आहेत, हा सोशल मिडिया मोठ्या प्रमाणात वापरला जातो, तरीही असा निर्णय का घेतला गेला असेल यावर तर्कवितर्क लावले जात आहेत

Read More

Samsung Galaxy S23 सीरिजच्या भारतातील विक्रीला सुरुवात

प्री-ऑर्डरविषयी सॅमसंगने दावा केला आहे की Galaxy s23 सीरीजची प्री-ऑर्डर गॅलेक्सी एस21 सीरीजच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. सॅमसंगने म्हटले आहे की ग्राहकांनी सर्वात जास्त Galaxy S23 Ultra प्री-ऑर्डर केली आहे. Samsung Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra मध्ये डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे.

Read More

Artificial Intelligence: ChatGPT मुळे मार्केटमधील बडे खिलाडी झाले सक्रीय, अमेरिका-चीनमध्ये स्पर्धा झाली आणखी तीव्र

Artificial Intelligence: ChatGPT ने गेल्या काही दिवसांत खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेसह जगातील अनेक भागात आघाडीवर असणारी गुगलही या शर्यतीत उतरली आहे. त्यांनी Bard AI चॅटबॉट सादर केला आहे. दुसरीकडे चिनी कंपन्याही मागे नाहीत. गेल्या आठवड्यातच अलीबाबा ग्रुप होल्डिंग्स, टेनसेंट होल्डिंग्स, Baidu, NetEase आणि JD.Com ने घोषणा केली की ते लवकरच त्यांचे चॅटबॉट्स बाजारात आणणार आहेत.

Read More

Meta broadcast Channel: मेटाकडून इन्स्टाग्रामवर 'ब्रॉडकास्ट चॅनल' फिचर लाँच; क्रिएटर्स आणि फॅन्सला 'असा' होईल फायदा

इन्स्टाग्रामवर अनेक इन्फ्ल्यूएन्सर्सला लाखो आणि कोटींमध्ये फॉलोवर्स आहेत. या फॅन्सशी एकाचवेळी संपर्क साधण्यासाठी तसेच कनेक्टेड राहण्यासाठी मेटाने हे फिचर लाँच केले आहे. याद्वारे टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ,GIF, व्हाईस नोट शेअर करता येणार आहे.

Read More

Noise TWS: 50 तासांपर्यंत चार्जिंगचं टेंशन नाही! Noise घेऊन आलेय VS404 एअरबड्स, किंमतही अगदी कमी

एअरबड्स वापरताना सर्वात मोठी अडचण म्हणजे चार्जिंग. एअरबड्सला चार्जिंग टिकत नाही, अशी अनेकांची ओरड असते. मात्र, यावर Noise कंपनीने अफलातून सोल्यूशन आणलं आहे. कंपनीने VS404 हे एअरबड्स लाँच केले असून याला तब्बल 50 तासांपर्यंत चार्जिंग करण्याची गरज नाही. किंमतीही तुमच्या खिशाला झेपेल इतकी आहे. तसेच अनेक नवे फिचर्स यात देण्यात आले आहेत.

Read More

Oppo Find N2 Flip: Samsung ला टक्कर देण्यासाठी Oppo चा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही...

Oppo Find N2 Flip: डिसेंबर 2022 मध्ये चायना मार्केटमध्ये Oppo Find N2 Flip ने ग्राहकांची मनं जिंकल्यानंतर आता कंपनीने जागतिक बाजारपेठेत उडी घेतली आहे. या बाजारपेठेत Samsung Galaxy Z Flip 4 हा त्यांचा प्रतिस्पर्धी असल्याचं बोललं जातंय. नेमका या दोन फोनमध्ये फरक काय, Oppo च्या नवीन फोल्डेबल फोनची फीचर्स आणि किंमत असं बरंच काही जाणून घ्या.

Read More

URBAN ने लॉन्च केले कॉलिंगसह स्वस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या डिटेल्स

URBAN Fit Z मध्ये ऑलवेज ऑन फीचर्ससाठी सपोर्ट असलेला अल्ट्रा एचडी फ्लुइड एमोलेड डिस्प्ले आहे. URBAN Fit Z मध्ये ड्युअल सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय या घड्याळात इनबिल्ट स्पीकर आणि मायक्रोफोन देखील आहे.

Read More

Payment Aggregators: आरबीआयने नव्या 32 पेमेंट अॅग्रीगेटर्सना लायसन्स प्रदान केले, कोणते आहेत हे पेमेंट गेटवे?

Payment Aggregators: आरबीआयने 17 मार्च 2020 आणि 31 मार्च 2021 रोजी पेमेंट एग्रीगेटर्स आणि पेमेंट गेटवेच्या नियमनाबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक जारी केले होते. आरबीआयने म्हटले आहे की अतिरिक्त 18 विद्यमान पेमेंट एग्रीगेटर्ससाठी अर्ज प्रक्रियेत आहेत. पेमेंट एग्रीगेटर म्हणजे काय? ते जाणून घेऊयात.

Read More

Side income through AI: 10 लोकप्रिय ट्रान्सलेशन एआय टूल्स, ज्याद्वारे फ्रिलान्सर्सची होते 20 हजारांपर्यंत कमाई

Side income through AI: सध्या भाषांतर करण्यासाठी 10 एआय टूल्स भाषांतरकार फ्रिलान्सर्समध्ये प्रसिद्ध आहेत. या टूल्सचा वापर करून 20 हजारांपर्यंत कमाई केली जात आहे. कोणेत आहेत हे एआय टूल्स आणि कमाई कशी होते ते या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

Artificial Intelligence: ChatGPT शी स्पर्धा करणार GPTZero, कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून लिहिलेले लिखाण ओळखता येणार!

Artificial Intelligence च्या मदतीने कुठले लिखाण लिहिले गेले आहे आणि कुठले लिखाण स्वतः कोणत्या व्यक्तीने लिहिले आहे हे कसे शोधायचे हा मोठा प्रश्न लोकांसमोर होता. त्यावर जगभरात चर्चा देखील झाली. हे लक्षात घेऊन Edward Tian या तरुणाने GPTZero हे ऍप तयार केले असून जगभरात याची चर्चा होते आहे.

Read More

Fire-Boltt Apollo कमी किमतीत एमोलेड डिस्प्ले आणि ब्लूटूथ कॉलिंग, जाणून घ्या डिटेल्स

देशांतर्गत कंपनी फायर-बोल्टने आपले नवीन स्मार्टवॉच फायर-बोल्ट अपोलो भारतात लॉन्च केले आहे. फायर-बोल्ट अपोलो1.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले सपोर्टेड आहे.

Read More

Bard Chatbot Error: बार्ड चॅटबॉटकडून एक चुकीचं उत्तर... अन् गुगलला गमवावे लागले 100 बिलियन डॉलर

मागील आठवड्यात गुगलने ट्विटरवर प्रमोशनल जाहिरातीचे एक पोस्टर शेअर केले होते. या जाहिरातीमध्ये एक GIF इमेज शेअर करण्यात आली होती. त्यात Bard AI chat Bot कसे काम करतो हे दाखवण्यात आले होते. या शॉर्ट इमेजमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्याचे उत्तर चॅटबॉटकडून चुकीचे देण्यात आले होते.

Read More