Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Pay Daily Limit: Google Pay वरुन दररोज किती रुपयांचे पेमेंट करु शकता, जाणून घ्या नियम

Google Pay

Image Source : www.stickpng.com

Google Pay Daily Limit: गुगल पे हे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला सपोर्ट करणारे पेमेंट सोल्युशन आहे. इतर सर्वच यूपीआय पेमेंट सोल्युशन्सप्रमाणेच गुगल पेसाठी सुद्धा मर्यादा आहे. प्रत्येक बँकेने यूपीआयवरुन पैसे हस्तांतर करण्यासाठी मर्यादा घातली आहे.

यूपीआय पेमेंटमध्ये एक सुरक्षित आणि  लोकप्रिय डिजिटल पेमेंट सोल्यूशन म्हणून 'गुगल पे'ची ओळख आहे. मात्र अनेकदा काही तांत्रिक कारणास्तव 'गुगल पे'च्या माध्यमातून पैसे हस्तांतर होत नाही. बँक खात्यात पुरेशी शिल्लक असताना देखील पैसे ट्रान्सफर न झाल्याने आपला हिरोमोड होतो. 'गुगल पे' वरुन दररोज किती रुपये पाठवले जाऊ शकतात ते आपण आज समजून घेऊया.

'गुगल पे' हे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला सपोर्ट करणारे पेमेंट सोल्युशन आहे. इतर सर्वच यूपीआय पेमेंट सोल्युशन्सप्रमाणेच ‘गुगल पे’साठी सुद्धा मर्यादा आहे. प्रत्येक बँकेने यूपीआयवरुन पैसे हस्तांतर करण्यासाठी मर्यादा घातली आहे.  

'गुगल पे' वर एक दिवसात 100000 रुपये ट्रान्सफर करण्यास परवानगी आहे. मात्र ‘गुगल पे’चा वापर करुन एकाच दिवसात जास्तीत जास्त 10 वेळा पैसे हस्तांतर करता येतात.  

गुगल पे वापरणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय स्टेट बँकेने दिवसाला 1 लाख रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. एचडीएफसी बँकेने 1 लाख रुपयांचा व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. नव्याने यूपीआय वापरणाऱ्यासाठी पहिली व्यवहार मर्यादा 5000 रुपये इतकी आहे.

पंजाब नॅशनल बँकेची गुगलपेसाठीची दैनंदिन मर्यादा 25000 असून कमाल 50000 रुपयांचा व्यवहार करता येऊ शकतो. बँक बडोदाची दैनंदिन व्यवहार मर्यादा 25000 रुपये आहे. बँक ऑफ इंडियाची किमान मर्यादा 10000 रुपये असून दैनंदिन मर्यादा कमाल 1 लाख रुपये इतकी आहे. आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, बंधन बँक या  बँकांची दैनंदिन यूपीआय व्यवहार मर्यादा 1 लाख रुपये इतकी आहे.

‘गुगल पे’वरुन मिळेल कर्ज

सुरक्षितपणे पैशाची ऑनलाईन देवान-घेवान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या Google Pay वर  सहजपणे वैयक्तिक कर्ज  (Personal Loan) मिळवण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुम्हाला कर्जाची गरज असेल तर यापुढे बँकेत जायची गरज नाही. तुम्ही गुगल-पे या अ‍ॅपच्या माध्यमातून देखील कर्जासाठी अर्ज करू शकता आणि कर्जास पात्र ठरल्यास कर्जही मिळवू शकता. याशिवाय Google Pay वर विविध वित्तीय संस्थाकडून कर्जाची सोय उपलब्ध आहे. ज्यात फेडरल बँक, आयडीएफसी बँक, DMI फायनान्स या वित्तीय संस्थांकडून पर्सनल लोन दिले जाते.