देशांतर्गत कंपनी फायर-बोल्टने आपले नवीन स्मार्टवॉच फायर-बोल्ट अपोलो भारतात लॉन्च केले आहे. फायर-बोल्ट अपोलो1.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले सपोर्टेड आहे. ज्याचे रिझोल्यूशन 466x466 पिक्सेल आहे. फायर-बोल्ट अपोलोमध्ये ब्लूटूथ कॉलिंग देखील सपोर्टेड आहे. स्मार्टवॉचसह IP67 रेटिंग देखील उपलब्ध आहे. याचा अर्थ घड्याळ पाण्यानेही सहजपणे खराब होत नाही. चला जाणून घेऊया घड्याळाची किंमत आणि इतर फीचर्स काय आहेत.
फायर-बोल्ट अपोलो किंमत
फायर-बोल्टच्या नवीनतम स्मार्टवॉचची किंमत 2 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. फायर-बोल्ट अपोलो स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तसेच ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकते. हे काळ्या, राखाडी आणि गुलाबी रंगांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.
फायर-बोल्ट अपोलोचे डिटेल्स
फायर-बोल्टचे नवीनतम स्मार्टवॉच (466x466 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह 1.43-इंच AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये आकर्षकता दिसून येते. घड्याळात ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. कॉलिंगसाठी वॉचमध्ये डायल पॅड देखील उपलब्ध आहे. वॉचमध्ये AI व्हॉईस असिस्टंट, कॉल हिस्ट्री आणि कॉन्टॅक्ट अॅड अशी फीचर्स आहेत. स्मार्टवॉचसोबत कॉल लॉगची सुविधाही आहे. म्हणजेच घड्याळात मिस्ड कॉल्स आणि रिसिव्ह केलेले कॉल्सही बघता येतील.फायर-बोल्ट अपोलो 118 स्पोर्ट्स मोड आणि SpO2 मॉनिटरिंग, 24-तास हार्ट रेट, पीरियड ट्रॅकर आणि स्लीप मॉनिटरिंग सारखी फीचर्स ऑफर करते. फायर-बोल्ट अपोलोला पाण्याच्या प्रतिकारासाठी IP67 रेटिंग मिळाली आहे. वॅटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ एडिशन 5.2 उपलब्ध आहे. घड्याळासोबत नेहमी ऑन डिस्प्ले सुविधा देण्यात आली आहे.
फायर-बोल्ट अपोलोची बॅटरी लाईफ
मेटॅलिक चार्जिंग आणि 5 दिवसांचा बॅटरी बॅकअप घड्याळासोबत उपलब्ध आहे. दोन तासांत घड्याळ पूर्णपणे चार्ज होते. अलार्म घड्याळ, स्टॉपवॉच, टाइमर, लो पॉवर मोड, डीएनडी, फ्लॅशलाइट यांसारखी आणखी बरीच फीचर्स घड्याळात उपलब्ध आहेत.
फायरबोल्ट हा ऑडिओ आणि वेअरेबल सेगमेंटमधील अग्रगण्य भारतीय ब्रँड आहे. 2015 मध्ये सुरू झालेल्या फायर-बोल्टला भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्मार्टवॉच प्लेअरमध्ये निर्विवाद लीडर म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. नवीनतम काउंटरपॉईंट रिसर्च अहवालानुसार, ब्रँडने 394% तिमाही-दर-तिमाही वाढ नोंदवली असून ती सर्वात वेगाने वाढणारा स्मार्टवॉच ब्रँड बनला आहे. जागतिक स्तरावर, फायर-बोल्टने दिलेल्या कालावधीत Apple आणि Realme सोबत सर्वात वेगाने वाढणारे स्मार्टवॉच प्लेयर म्हणून स्थान निर्माण केल्याचे सांगण्यात येते. "आयडीसी आणि काउंटरपॉइंट रिसर्च या दोन्ही अहवालांनी पुष्टी केली की फायर-बोल्ट हे आता स्मार्टवॉचच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे नाव आहे. प्रत्येक हातात सेलफोन हे आजचे वास्तव आहे, त्याचप्रमाणे आम्हाला प्रत्येक मनगटावर स्मार्टवॉच हवे आहे, असे सांगण्यात येते. फायरबोल्ट विविध उत्पादनांच्या पोर्टफोलिओसह बजेट आणि मिड सेगमेंटला टार्गेट करून, तसेच ई-कॉमर्स प्लेयर, वित्तीय संस्था आणि सेलिब्रिटींसह मजबूत भागीदारीसह स्थानिक बाजारपेठेच्या वाढीचे नेतृत्व करते. लक्ष्यित प्रेक्षकांशी अधिक चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करण्यासाठी, ब्रँड ऑन-बोर्ड ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून विराट कोहली आणि विकी कौशल यांनी देखील आपले योगदान दिले आहे.
फायरबोल्ट कंपनीचे मुख्यालय (Headquarters) महाराष्ट्रातच मुंबई येथे आहे. कंपनीचे बिझनेस मॉडेल बिझनेस टू कस्टमर असे आहे. 2015 मध्ये या कंपनीची स्थापना झाली. 251 ते 500 च्या दरम्यान कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कोअर टीममध्ये Aayushi Kishore (Co-Founder) Arnav Kishore हे Founder आणि सोबतच कंपनीचे chief executive officer (सीईओ) म्हणून काम पाहत आहेत.