Bard Chatbot Error: गुगलच्या bard चॅटबॉटने एक चुकीचं उत्तर दिलं आणि कंपनीला 100 बिलियन डॉलर रुपये बाजारमूल्य क्षणात गमवावे लागले. तसेच कंपनीचे शेअर्सही 9% खाली आले. मायक्रोसॉफ्टच्या Chat GPT ला टक्कर देण्यासाठी नुकतेच गुगलने स्वत:चा बार्ड Bard चॅटबॉट लाँच केला आहे. मात्र, या चॅटबॉटने एका प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले. त्याचा परिणाम कंपनीच्या मार्केट शेअरवर झाला. थोडक्यात गुगलने बनवलेला चॅटबॉट योग्य नसल्याची भावना लोकांमधून व्यक्त करण्यात आली.
Bard कडून चुकीचं उत्तर (Bard made factual error)
मागील आठवड्यात गुगलने ट्विटरवर प्रमोशनल जाहिरातीचे एक पोस्टर शेअर केले होते. या जाहिरातीमध्ये एक GIF इमेज शेअर करण्यात आली होती. त्यात Bard AI chatbot कसे काम करतो हे दाखवण्यात आले होते. या शॉर्ट इमेजमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्याचे उत्तर चॅटबॉटकडून चुकीचे देण्यात आले होते.
अंतराळासंबंधित प्रश्नाच्या उत्तरात चूक
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने (JWST) अंतराळात कोणत्या गोष्टींचा शोध घेतला अशा आशयाचा प्रश्न चॅटबॉटला विचारण्यात आला होता. सोलार सिस्टिमच्या बाहेर एखाद्या ग्रहाचा फोटो सर्वप्रथम JWST टेलिस्कोपने घेतला, असे उत्तर कृत्रिम चॅटबॉटने दिले. मात्र, हे उत्तर चुकीचे असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. युरोपातील Very Large Telescope (VLT) ने 2004 साली पहिला फोटो घेतला होता. हे खरे उत्तर असल्याचे अनेक ट्विटर युझर्सने निदर्शनास आणून दिले. गुगलच्या या एका चुकीमुळे कंपनीचे बाजारमूल्य कोसळले.
Bard chatbot मध्ये चुका असल्याचे यातून दिसून आले. गुगलने बनवलेल्या या प्रमोशनल इमेजमधून ही चुकीची माहिती पुढे आली. कर्मचाऱ्यांच्याही ही चूक लक्षात आली नाही. बार्ड चॅटबॉटचा हा डेमोचा हा प्रयोग फसल्याने गुगलची पंचाईत झाली. गुगलने केलेली ही चूक अनेक खगोलशास्त्रज्ञांनीही ट्विटरवर निदर्शनास आणून दिली.
ग्राहकांना नवनवीन फिचर्स देण्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि गुगलमध्ये स्पर्धा सुरू आहे. दोन्ही कंपन्यांनी AI तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. AI द्वारे दिल्या जाणाऱ्या उत्तरांवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. पक्षपातीपणा, खोटी माहिती किंवा दिशाभूल करणारी माहिती चॅटबॉटकडून दिली जाऊ शकते. त्यामुळे युझर्सच्या जीवनावरही परिणाम होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा विकास होत असला तरी याचे नियमन करण्याची तसेच धोरण आखण्याची मागणी होत आहे.