Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Noise TWS: 50 तासांपर्यंत चार्जिंगचं टेंशन नाही! Noise घेऊन आलेय VS404 एअरबड्स, किंमतही अगदी कमी

Noise TWS

Image Source : www.pricebaba.com

एअरबड्स वापरताना सर्वात मोठी अडचण म्हणजे चार्जिंग. एअरबड्सला चार्जिंग टिकत नाही, अशी अनेकांची ओरड असते. मात्र, यावर Noise कंपनीने अफलातून सोल्यूशन आणलं आहे. कंपनीने VS404 हे एअरबड्स लाँच केले असून याला तब्बल 50 तासांपर्यंत चार्जिंग करण्याची गरज नाही. किंमतीही तुमच्या खिशाला झेपेल इतकी आहे. तसेच अनेक नवे फिचर्स यात देण्यात आले आहेत.

वायरलेस एअरफोन्सची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. जुने वायर्ड हेडफोन्सची जागा आता हायटेक एअरबड्सने घेतली आहे. मात्र, हे एअरबड्स वापरताना सर्वात मोठी अडचण म्हणजे चार्जिंग. एअरबड्सला चार्जिंग टिकत नाही, अशी अनेकांची ओरड असते. मात्र, यावर Noise कंपनीने अफलातून सोल्यूशन आणलं आहे. कंपनीने VS404 हे एअरबड्स लाँच केले असून त्यांना तब्बल 50 तासांपर्यंत चार्जिंग करण्याची गरज नाही. त्यामुळे आता लाँग लास्टिंग म्युझिक आणि कॉलिंगचा अनुभव ग्राहकांना घेता येणार आहे.

नॉइज कंपनीने truly wireless earphones (TWS) श्रेणीमध्ये वाढ करत VS404 हेडफोन्स लाँच केले आहेत. मागील आठवड्यात कंपनीने हे एअरबड्स लाँच केले असून याची किंमतही अत्यंत परवडणाऱ्या दरात ठेवण्यात आली आहे. या एअरबड्सची  (Noise TWS VS404 Price) किंमत 1,299 रुपये असून जेट ब्लॅक, फॉरेस्ट ग्रीन आणि स्नो व्हाईट या तीन कलरमध्ये हे एअरबड्स उपलब्ध आहेत. Noise कंपनीच्या वेबसाइटवर आणि फ्लिपकार्ट साइटवर जाऊन तुम्ही हे एअरबड्स खरेदी करू शकता.

नॉइज बड्स VS404 फिचर्स अँड स्पेसिफिकेशन्स (Noise Buds VS404 Specifications)

VS404 ची चार्जिंग 50 तासांपर्यंत टिकू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 10mm ऑडिओ ड्राइव्हर देण्यात आले आहेत. घाम आणि पाण्यामुळे एअरबड् खराब होणार नाहीत, तसेच IPX5 रेटेड हे हेडफोन्स आहेत. एनव्हायरमेंटल नॉइज कॅन्सलेशन (ENC) हे फिचर यामध्ये देण्यात आले आहे. एअरबड्स घातल्यानंतर आजूबाजूच्या आवाजाचा त्रास फोनवर बोलताना किंवा मिटिंगमध्ये असताना होणार नाही.

10 मिनिटांच्या चार्जिंग चालेल 200 मिनिटे (Noise VS404 playtime)

USB Type-C port चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. चार्जिंग केसमध्ये असताना 50 तास प्लेटाइम तर सिंगल एअरबडचा प्लेटाइम 10 तासांपर्यंत असेल, असा दावा कंपनीने केला आहे. या एअरबड्सला इन्स्टाचार्ज फिचरही देण्यात आले आहे. म्हणजे काही मिनिटांत चार्ज होऊ शकते. तसेच 10 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये 200 मिनिटे प्लेटाइम मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.

गुगल अस्टिस्टंट आणि तीन म्युझिक मोड (Noise VS404 has google assistance)

प्रत्येकाच्या म्युझिकच्या आवडीनुसार यामध्ये तीन मोड देण्यात आले आहेत. बास, गेमिंग आणि नॉर्मल मोड असणार आहे. या एअरबड्समध्ये 5.3 वायरलेस ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी आहे. अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइसशी कम्पॅटिबल आहेत. तसेच गुगल आणि सिरी व्हाइस असिस्टंटही यामध्ये आहे. आवाज कमी जास्त करण्यासाठी, गुगल असिस्टंट, कॉल रिसिव्ह/रिजेक्ट करण्यासाठी बटन्स देण्यात आले आहेत.

"आम्ही ग्राहकांना कायम सर्वोत्तम आणि नाविन्यपूर्ण आणि उत्तम क्वालिटीची वस्तू देण्याचा प्रयत्न करतो. Noise VS404 ची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे.. आम्हाला खात्री आहे, की आमच्या ग्राहकांना हे नवे VS404 एअरबड्स आवडती, असे कंपनीने सहसंस्थापक अमित खत्री यांनी म्हटले.