Meta broadcast Channel: मेटा कंपनीने इन्स्टाग्राम युझर्स आणि क्रिएटर्ससाठी आणखी एक नवे फिचर आणले आहे. इन्स्टाग्रामवर इन्फ्ल्यूएन्सर्सला ब्रॉडकास्ट चॅनल तयार करता येणार आहे. वन-टू-मेनी (One to many broadcasts Channel) ब्रॉडकास्ट चॅनलद्वारे इन्फ्ल्यूएन्सर्स आपल्या फॅन्सला एकाचवेळी मेसेज करता येणार आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी स्वत:चा ब्रॉडकास्ट चॅनल तयार करत हे फिचर लाँच केले.
इन्स्टाग्रामवर अनेक इन्फ्ल्यूएन्सर्सला लाखो आणि कोटींमध्ये फॉलोवर्स आहेत. या फॅन्सशी एकाचवेळी संपर्क साधण्यासाठी तसेच कनेक्टेड राहण्यासाठी मेटाने हे फिचर लाँच केले आहे. याद्वारे टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ,GIF, व्हाईस नोट शेअर करता येणार आहे. सुरुवातीला काही ठराविक क्रिएटर्सला हे फिचरचा अॅक्सेस देण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर हे फिचर सगळ्यांसाठी उपलब्ध केले जाईल, असे मेटाने म्हटले आहे.
सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर्स अनेक प्रकारचा कंटेट तयार करत असतात. मात्र, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या इतर गोष्टी, व्हिडिओ शूट करतानाच्या पडद्यामागील गोष्टी शेअर करण्यााठी क्रिएटर्स कम्युनिटीला याचा फायदा होणार आहे. फॅन्सला या ब्रॉडकास्ट चॅनलवर केलेल्या मेसेजेसवर प्रतिक्रिया देता येईल. भविष्यात ब्रॉडकास्ट फिचर्समध्ये आणखी गोष्टी अॅड करण्यात येणार असल्याचे झुकेरबर्ग यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनल कसे काम करेल? (How Meta broadcast Channel works?)
क्रिएटर्सला ब्रॉडकास्ट चॅनलद्वारे फॅन्सला संदेश पाठवता येईल. हा चॅनल इनबॉक्समध्ये तयार करता येऊ शकतो. पहिल्यांदाच मेसेज केल्यावर सर्व फॉलोवर्सला एक नोटिफिकेशन जाईल. त्याद्वारे फॉलोवर्स चॅनल जॉइन करू शकतात. हे ब्रॉडकास्ट चॅनल इन्स्ट्राग्रामवर सर्वांना दिसू शकतात. मात्र, फक्त चॅनल जॉइन केल्यानंतरच अपडेट मिळतील. फॉलोवर हा चॅनल कधीही सोडू शकतो, किंवा म्युट करू शकतो. फक्त क्रिएटरच चॅनेलवर मेजेस करू शकतो, फॉलोवर्स मेसेज करू शकत नाही.
भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर पुढे आले आहेत. काहींना तर कोटींमध्ये फॉलोवर्स आहेत. अनेकांना यातून स्टारडम आणि पैसे मिळत आहेत. फॉलोवर्ससाठी कशा प्रकराचा कंटेट तयार करायचा आहे, याबाबत ब्रॉडकास्ट चॅनलद्वारे क्रिएटर मतदानही घेऊ शकेल.