Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

AI Washing: एआय वॉशिंग म्हणजे काय? याचा ग्राहकांवर कसा परिणाम होऊ शकतो?

AI Washing

Image Source : https://www.freepik.com/

कंपन्यांकडून स्वतःला प्रगत दाखविण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलेजन्सचा वापर करत असल्याचा दावा केला जातो. या मार्केटिंगद्वारे स्वतःचे उत्पादन हे सर्वोत्तम असल्याचे दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शब्द सध्या विशेष चर्चेत आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित प्रत्येक बाबींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात असल्याचा दाबा कंपन्यांकडून केला जातो. अगदी स्मार्टफोनपासून ते शॉपिंगपर्यंत प्रत्येक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ग्राहकांना चांगली व जलद सुविधा दिली जात असल्याचा दावा कंपन्या करत आहेत. परंतु, कंपन्यांकडून एआयच्या वापराबाबत करण्यात येणारा दावा खरा आहे का? याबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, वर्ष 2022 मध्ये 10 टक्के स्टार्टअप्सकडून गुंतवणुकीसंदर्भातील प्रस्ताव मांडताना एआयचा वापर केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, 2023 मध्ये हा आकडा 25 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. परंतु, कंपन्यांकडून एआयच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.

एआय वॉशिंग म्हणजे नक्की काय?

कंपन्यांकडून स्वतःला प्रगत दाखविण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलेजन्सचा वापर करत असल्याचा दावा केला जातो. या मार्केटिंगद्वारे स्वतःचे उत्पादन हे सर्वोत्तम असल्याचे दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते.

आर्टिफिशियल इंटिलेजन्सच्या लोकप्रियतेचा घेऊन चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध केल्या जात असल्याचा दावा या कंपन्या करतात. परंतु, प्रत्यक्षात कमी गुणवत्तेच्या व प्रगत नसलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे एआय वॉशिंग होय.

एआय वॉशिंग चर्चेत येण्यामागचे कारण काय?

‘एआय वॉशिंग’ ही संकल्पा ग्रीनवॉशिंग या संकल्पनेवरून घेण्यात आली आहे. यानुसार, अनेक कंपन्या त्यांचे उत्पादन पर्यावरणपूरक असल्याचे भासवून ग्राहकांना आकर्षित करतात.

अ‍ॅमेझॉनने काही महिन्यांपूर्वी ग्राहकांना वस्तू खरेदी करणे सोपे जावे यासाठी Just Walk Out या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला होता. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यावर काउंटरवर दाखवणे अथवा बिल करण्याची गरज नाही. थेट सेन्सर्सच्या मदतीने आपोआप बिल तयार होईल, असा दावा कंपनीने केला होता. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांच्या खरेदीवर कंपनीचे कर्मचारीच सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवत असल्याचे समोर आले. या घटनेनंतर एआय वॉशिंग हा शब्द चर्चेत आला.

एआय वॉशिंगचे काय परिणाम होऊ शकतात?

कंपन्यांच्या फसव्या आर्टिफिशियल इंटिलेजन्स वापराच्या मार्केटिंगचा सर्वाधिक फटका ग्राहकांना बसू शकतो. कंपन्यांद्वारे पसरवण्यात आलेल्या चुकीच्या माहितीमुळे ग्राहक ती सेवा अथवा वस्तू खरेदी करून स्वतःचे नुकसान करू शकतात. 

एआयचा दावा करून कंपन्यांकडून अशा सेवांसाठी अतिरिक्त पैसे घेतले जातात. ग्राहकांकडून देखील स्मार्ट तंत्रज्ञानाच्या नावाखाली अशा वस्तू व सेवांसाठी गुंतवणूक केली जाते. परंतु, या वस्तूंमध्ये कोणत्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला नसल्याने ग्राहकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरांतींवर नेहमीच विश्वास ठेवू नये. प्रत्येकवेळी वस्तू खरेदी करताना विविध कंपन्या, त्याची वैशिष्ट्ये, दावे व किंमती याची पडताळणी नक्की करावी.