भारतात स्मार्टफोन बाजारपेठेत अनेक वेगवगेळ्या कंपन्या आपल्या मोबाईलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. या शर्यतीत चायना स्मार्टफोन निर्माता कंपनी 'Oppo' ने ही पुढाकार घेतला आहे. Oppo कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये चायना बाजारपेठेमध्ये आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन (First Foldable Smartphone) Oppo Find N2 Flip आणि Oppo Find N2 clamshell लॉन्च केला होता. यापैकी Oppo Find N2 Flip हा फोन कंपनीने जागतिक बाजारपेठेत बुधवारी (15 फेब्रुवारी) लंडन येथे लॉन्च केला.
हा फोन लॉन्च झाल्यांनतर याचा तगडा प्रतिस्पर्धी म्हणून लोकं Samsung Galaxy Z Flip 4 बघायला लागले आहेत. या दोन्ही फोनमध्ये साम्य पाहायला मिळत असले तरीही यामध्ये फरक देखील आहे. Oppo Find N2 Flip ची सगळीकडेच क्रेज पाहायला मिळत आहे. नक्की या फोनमध्ये कोणते फीचर्स दिलेत, त्याची किंमत काय? कोणत्या रंगामध्ये उपलब्ध आहेत हे फोन आणि या दोन फोनमध्ये नेमका फरक काय? अशा अनेक गोष्टी आपण जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
Oppo Find N2 Flip मधील फीचर्स जाणून घ्या
Oppo Find N2 Flip मध्ये फुल एचडी+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8 इंच प्राइमरी फोल्डिंग OLED स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनमध्ये 3.26 इंचाचा कव्हर डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 720p आहे. हा फोन Mediatek Dimensity 9000+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 16GB पर्यंत रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.
याशिवाय फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिली आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट स्नॅपर आहे. Hasselblad ब्रँडेड रिअर कॅमेरा चांगल्या AI फोटोग्राफीसाठी MariSilicon X इमेजिंग NPU ला सपोर्ट करण्यासाठी मदत करते.
Find N2 Flip मध्ये 4300mAh बॅटरी क्षमता असल्याने जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन Android 13 OS वर आधारित ColorOS 13 कस्टम स्किनवर काम करतो.
Find N2 Flip वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS/ A-GPS आणि USB टाईप-C पोर्ट समाविष्ट करण्यात आले आहे. सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि जिओमॅट्रिक सेन्सर यांचा समावेश होतो. याशिवाय साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
Oppo Find N2 Flip ची किंमत किती?
UK मध्ये Oppo Find N2 Flip या 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 849 GBP मोजावे लागत आहेत. भारतीय चलनात ही किंमत जवळपास 84,300 रुपये इतकी आहे. या फोनचा प्रतिस्पर्धी असणारा Samsung Galaxy Z Flip 4, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या मॉडेलसाठी 80,999 रुपये मोजावे लागणार आहेत.
Oppo Find N2 Flip कोणत्या रंगामध्ये उपलब्ध आहे?
हा स्मार्टफोन सध्या दोनच रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. एस्ट्रल ब्लॅक (Astral Black) आणि मूनलिट पर्पल (Moonlit Purple) शेड्समध्ये हा फोन एकदम क्लासिक लूक देत आहे.
Oppo Find N2 Flip आणि Samsung Galaxy Z Flip 4 मध्ये फरक काय?
या दोन्ही फोनमध्ये बरीच साम्यता असली तरीही काही फीचर्स हे वेगवेगळे आहेत, ज्यामुळे त्याचा अनुभव देखील वेगवेगळा असू शकतो. दोन्ही फोनच्या फीचर्सचा अभ्यास केल्यानंतर डिझाईन, डिस्प्ले, बॅटरीची क्षमता, परफॉर्मन्स या मुद्द्यांना घेऊन आपण यामधील फरक समजून घेऊयात.
डिझाईन: Oppo Find N2 Flip ची मूलभूत रचना Galaxy Z Flip 4 शी मिळती जुळती आहे. मात्र Oppo डिव्हाईसमध्ये मोठा कव्हर डिस्प्ले देण्यात आलायं, जो Samsung Galaxy Z Flip 4 च्या तुलनेत अधिक प्रीमियम आणि आधुनिक दिसतो. असं असलं तरीही Samsung Galaxy Z Flip 4 ला Oppo डिव्हाईसच्या तुलनेत जास्त रेटिंग मिळालं आहे.
डिस्प्ले: Oppo Find N2 Flip मध्ये मोठी 6.8 इंचाची 120Hz FHD+ रिजोल्यूशन फोल्डिंग स्क्रीन आहे तर Samsung च्या Z Flip 4 मध्ये समान वैशिष्ट्यांसह थोडी कॉम्पॅक्ट 6.70 इंच स्क्रीन देण्यात आली आहे.
परफॉर्मन्स: जरी दोन्ही फोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आधारित असले, तरीही ते सारखाच परफॉर्मन्स देतात. मेमरीच्या बाबतीत बोलायचं तर, बेस मॉडेल Galaxy Z Flip 4 मध्ये 128GB स्टोरेज दिलंय तर Find N2 Flip वर 256GB स्टोरेज देण्यात आलं आहे.
बॅटरी क्षमता: दोन्ही फोनमधील बॅटरी क्षमतेचा विचार केल्यास, Galaxy Z Flip 4 मध्ये 3,700 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर Oppo Find N2 Flip मध्ये 4,300 mAh बॅटरी क्षमता आहे. दोन्ही फोन यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे जलद चार्जिंगसाठी मदत करतात.