Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Artificial Intelligence: ChatGPT मुळे मार्केटमधील बडे खिलाडी झाले सक्रीय, अमेरिका-चीनमध्ये स्पर्धा झाली आणखी तीव्र

ChatGPT

Image Source : www.atriainnovation.com

Artificial Intelligence: ChatGPT ने गेल्या काही दिवसांत खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेसह जगातील अनेक भागात आघाडीवर असणारी गुगलही या शर्यतीत उतरली आहे. त्यांनी Bard AI चॅटबॉट सादर केला आहे. दुसरीकडे चिनी कंपन्याही मागे नाहीत. गेल्या आठवड्यातच अलीबाबा ग्रुप होल्डिंग्स, टेनसेंट होल्डिंग्स, Baidu, NetEase आणि JD.Com ने घोषणा केली की ते लवकरच त्यांचे चॅटबॉट्स बाजारात आणणार आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा आता नव्या उंचीवर पोहोचली आहे. आता दोघेही या नव्या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर करून पुढे जाण्याच्या धडपडीत गुंतले आहेत. तज्ज्ञांच्या मते गेल्या दशकात चीनने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासात अमेरिकेला खूप मागे टाकले आहे. विशेषतः मूलभूत संशोधनात ते पुढे गेले आहेत. पण ज्या वेगाने अमेरिकन स्टार्टअप OpenAI ने ChatGPT बाजारात आणले त्यामुळे चीनला आश्चर्याचा धक्का बसला आहे. ChatGPT हे लेखन आणि चाचणी तयारी चॅटबॉट आहे ज्याने टेक स्पेसमध्ये मोठी  चर्चा घडवून आणली आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित गुंतवणूक निधी वेबबश सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक डॅन इव्हस म्हणाले, 'चीनमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अमेरिकेपेक्षा अधिक प्रगत आहे. पण ChatGBT सह हे बदलू शकते आणि या तंत्रज्ञानाचे नेतृत्व मायक्रोसॉफ्टकडे येऊ शकते. यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अल्गोरिदम अपग्रेड करण्यासाठी चिनी कंपन्यांवर दबाव वाढेल.
मायक्रोसॉफ्टने गेल्या आठवड्यात जाहीर केले की, ते आपले शोध इंजिन बिंग सुधारण्यासाठी ओपनएआय सोबत काम करेल, जेणेकरुन ते शोध इंजिन मागील वर्षांमध्ये Google च्या मागे राहिलेले अंतर पार करू शकेल. गेल्या महिन्यात, मायक्रोसॉफ्टने सांगितले की ते OpenAI मध्ये अब्ज डॉलर्स इतकी  गुंतवणूक करणार आहेत.इव्हस म्हणाले, 'हे खरं आहे की ओपनएआयला कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी एक सूत्र सापडले आहे. आता मायक्रोसॉफ्टने त्यातील 50 टक्के विकत घेतले आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेची स्पर्धा तीव्र झाली आहे. हे अमेरिकेत होईल, चीनमध्येही होईल आणि संपूर्ण जगातही होईल.

सर्च इंजिनच्या क्षेत्रात अमेरिकेसह जगातील अनेक भागातील आघाडीची कंपनी गुगलही या शर्यतीत उतरली आहे. याने Bard AI चॅटबॉट सादर केला आहे. दुसरीकडे चिनी कंपन्याही मागे नाहीत. गेल्या आठवड्यात, अलीबाबा ग्रुप होल्डिंग्स, टेनसेंट होल्डिंग्स, Baidu, NetEase आणि JD.Com ने लवकरच त्यांचे चॅटबॉट्स लॉन्च करण्याची योजना जाहीर केली आहे. हाँगकाँगस्थित सिटीबँक विश्लेषक अ‍ॅलिसिया याप यांच्या मते, चिनी कंपन्यांमधील चॅटजीपीटी स्पर्धेमुळे बाजारात फारसा गोंधळ होणार नाही. तिथे प्रत्येक कंपनीची व्याप्ती वेगळी असते. बिंग अमेरिकेत गुगलला आव्हान देऊ शकते, परंतु चीनमध्ये बायडूला आव्हान नाही. या कंपनीने मार्चमध्ये आपला 'एर्नी बॉट' बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शर्यतीत बड्या कंपन्यांच्या प्रवेशामुळे गुंतवणूकदारांचेही लक्ष या दिशेला गेले असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र सध्या त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. व्हेंचर फंड DCM मधील गुंतवणूक व्यवस्थापक ग्लोरिया झांग यांनी NikkeiAsia.com ला सांगितले की, तंत्रज्ञान अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. लोक अजूनही त्याचे वेगवेगळे उपयोग समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यामुळे उत्पादकता वाढून उद्योगांचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, 'माझ्या समजुतीनुसार, या तंत्रज्ञानामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक उद्योगांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यामध्ये वाणिज्य आणि सोशल मीडियाचा समावेश आहे.