Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI SCAM: यूपीआयच्या माध्यमातून होतेय लाखो रुपयांची फसवणूक, सुरक्षेसाठी फॉलो करा या टिप्स

UPI SCAM

Image Source : https://www.freepik.com/

यूपीआयमुळे अवघ्या काही सेकंदात इतरांच्या बँक खात्यात पैसे जमा करता येतात. मात्र, यूपीआयच्या वाढत्या वापरासोबतच फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत.

यूपीआयमुळे ऑनलाइन पेमेंट करणे खूपच सोपे झाले आहे. केवळ क्यूआर कोड स्कॅन करून व मोबाइल नंबरच्या माध्यमातून देशभरात कोणालाही, कोणत्याही वेळी सहज पैसे पाठवणे शक्य झाले आहे. यूपीआयमुळे अवघ्या काही सेकंदात इतरांच्या बँक खात्यात पैसे जमा करता येतात. मात्र, यूपीआयच्या वाढत्या वापरासोबतच फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळे मार्ग वापरून सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. अशा आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करायला हवे? त्याबाबत जाणून घेऊयात.

कोट्यावधी रुपयांची फसवणूक

आरबीआयने दिलेली माहितीनुसार यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचा आकडा प्रचंड वाढला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये यूपीआयच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या घटनांची संख्या 9046 होती. तर 2023-24 मध्ये हाच आकडा 36075 वर पोहचला आहे. 
पैशांचा विचार केल्यास 2022-23 मध्ये तब्बल 45,358 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. 2023-24 मध्ये हा आकडा कमी झाला असून, या आर्थिक वर्षात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांकडून 13,930 रुपये उकळले आहेत.

कशाप्रकारे होते फसवणूक?

बनावट एसएमएस, ईमेल, लिंक, वेबसाइट, बनावट कस्टमर केअर नंबरच्या माध्यमातून सर्वाधिक ऑनलाइन फसवणुकीच्या घटना घडलेल्या पाहायला मिळतात. सायबर गुन्हेगारांकडून बनावट एसएमएस व ईमेलच्या माध्यमातून खासगी माहिती चोरी केली जाते.

याशिवाय, अनेकजण गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधतात. अशावेळी बनावट कस्टमर नंबरशी संपर्क साधला जातो. सायबर गुन्हेगार मदतीच्या नावाखाली बँक खाते, डेबिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर व इतर माहिती जाणून घेतात. 

क्यूआर कोडच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. सायबर गुन्हेगारांकडून हॉस्पिटलच्या नावाखाली पैसे उकळले जातात. समजा, तुम्ही कामात आहात व अचानक फोनवर तुम्हाला चुकून 20 हजार रुपये पाठवल्याचे सांगितले जाते व त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे असल्याने त्वरित ते पैसे परत पाठविण्याची विनंती केली जाते. 

अनेकजण घाईगडबडीत समोरील व्यक्तीकडून पैशांची मागणी करणाऱ्या क्यूआर कोडच्या मदतीने पैसे पाठवतात.  मात्र, जेव्हा तुम्ही नंतर पाहता, त्यावेळी समोरील व्यक्तीने केवळ 200.00 रुपये पाठवलेले असतात व त्याऐवजी तुम्ही त्याला 20,000 रुपये पाठवता. अनेकदा कामात असताना अशा चुका होतात व नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय उपाय कराल?

ओटीपीऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी ओटीपी शेअर करणे टाळावे. आर्थिक व्यवहारांसंबधीचे ओटीपी कोणाला सांगू नये.
क्यूआर कोड क्यूआर कोडचा वापर नेहमी पैसे पाठविण्यासाठी करावा. कोणी जर क्यूआर कोडच्या माध्यमातून पैशांची मागणी करत असेल तर आधी सर्व पडताळणी करा.
व्यक्तीचे नाव तपासापैसे पाठवताना योग्य व्यक्तीलाच पाठवत आहात ना, याची खात्री करा. यूपीआय आयडी, व्यक्तीचे नाव तपासूनच पैसे पाठवा.
बनावट अ‍ॅप्स पासून सावधान यूपीआयच्या नावाखाली कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करणे टाळावे.
मेसेजकडे द्या लक्षबँकेशी संबंधित सर्व एसएमएसकडे लक्ष द्यायला हवे. अचानक बँक खात्यातून पैसे वजा झाल्यास त्वरित याबाबत बँकेला माहिती द्यावी.