Twitter ने भारतातील तीन कार्यालयांपैकी दोन कार्यालये काल बंद करण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही कार्यालयातील आपल्या कर्मचार्यांना घरून काम करण्यास सांगितले गेले आहे,कंपनीचा एकूण खर्च कमी करण्यासाठी आणि उत्तम क्रियाशील सोशल मीडिया सेवा देण्यासाठी एलन मस्क यांच्या मिशनला अधोरेखित करणारा हा निर्णय असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात भारतातील सुमारे 200 पेक्षा जास्त कर्मचार्यांपैकी 90% हून अधिक कर्मचार्यांना काढून टाकणार्या Twitter ने भारताची राजधानी आणि राजकीय केंद्र नवी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कार्यालये बंद केली आहेत, Twitter मध्ये कार्यरत असेलेल्या कर्मचाऱ्यांनी या निर्णयाची पुष्टी दिली आहे.
कंपनी सध्या बंगळुरूच्या टेक हबमध्ये कार्यालय चालवत आहे ज्यात बहुतेक अभियंते आहेत. दिल्ली आणि मुंबईतील कार्यालये बंद झाल्यामुळे ट्विटरचे बंगळुरूस्थित केवळ एकच कार्यालय सध्या सुरु राहणार आहे. भारतात ट्विटरचे करोडो वापरकर्ते आहेत, हा सोशल मिडिया मोठ्या प्रमाणात वापरला जातो, तरीही असा निर्णय का घेतला गेला असेल यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. अब्जाधीश मुख्य कार्यकारी अधिकारी मस्क यांनी 2023 च्या उत्तरार्धात Twitter आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून वेगवगेळ्या देशातील अनेक कर्मचार्यांना काढून टाकले आहे आणि कार्यालये बंद केली आहेत. भारतातील कार्यालये बंद करताना कर्मचारी कपातीचा कुठलाही निर्णय अजून तरी घेण्यात आलेला नाही असे सूत्रांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
Twitter, which fired more than 90% of its roughly 200 staff in India, shut down offices in New Delhi and Mumbai, leaving only 1 in Bengaluru that mostly houses engineers https://t.co/0LUV1qTfAu pic.twitter.com/bwpyyOtS0T
— Bloomberg Quicktake (@Quicktake) February 18, 2023
असे असले तरी Meta Platforms, Google ते Alphabet पर्यंत जगातील नामांकित टेक कंपन्यांसाठी भारत देश हा एक प्रमुख वाढीव बाजारपेठ आहे. या सर्व कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी आणि आपला व्यवसाय वाढीसाठी शर्तीचे प्रयत्न चालवले आहेत. अशातच ट्विटरचा हा निर्णय भारतीय बाजारपेठेला विशेष महत्व देत नाही असे मानणारा आहे असे जाणकारांचे मत आहे.
Twitter हे गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील सर्वात महत्त्वाच्या सार्वजनिक मंचांपैकी एक बनले. येथे अनेक गरमागरम राजकीय चर्चा पाहायला मिळतात. तरीही मस्कच्या कंपनीसाठी महसूल लक्षणीय नाही, ज्याला कठोर माध्यम नियम आणि वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागतो आहे. ट्विटरसारख्या सुविधा देणारे अनेक लोकल अप्लिकेशन सध्या उपलब्ध आहेत. ‘मेड इन इंडिया’ ची भारतात घोषणा झाल्यानंतर अनेक स्टार्टअप उभे राहिले आहेत आणि भारतातील स्थानिक बाजारपेठेत आपले ग्राहक बनवत आहेत.याचा परिणाम ट्विटरवर झालेला पाहायला मिळतो आहे.
कर्मचारी कपात - एलन मस्क यांनी ट्विटर चे अधिग्रहण केल्यानंतर वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला असून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर ते लक्ष ठेऊन आहेत. अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर आम्हाला पैसा खर्च करायचा नाहीये अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले होते. वाढती स्पर्धा लक्षात घेता ट्विटरने देखील स्वतःमध्ये बदल केले पाहिजे असे मस्क यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ट्विटरच्या जगभरातील कार्यालयांमध्ये ते जातीने लक्ष घालत आहेत. मुंबई आणि दिल्लीतील कार्यालये बंद करण्याचा निर्णय पूर्णतः मस्क यांचाच आहे असे बोलले जात आहे. या वर्षाअखेर ट्विटरला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि महसूल वाढवणे हे लक्ष असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. कंपनीने जगभरातून 7000 पेक्षा अधिक लोकांना आतापर्यंत कामावरून काढून टाकले आहे. सध्या ट्विटरची कर्मचारी संख्या 2300 इतकी आहे. भारतातील 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना याआधीच कामावरून काढून टाकले आहे. या कर्मचारी कपातीत अभियांत्रिकी, मार्केटिंग आणि पब्लिक रिलेशन विभागातील कमर्चारी आपली नोकरू वाचवू शकले आहेत.
$44 अब्ज देऊन ट्विटरची खरेदी केल्यापासून, Twitter त्याच्या सॅन फ्रान्सिस्को स्थित मुख्यालय आणि लंडन कार्यालयांसाठी लाखो डॉलर भाड्याने देण्यास अयशस्वी ठरले आहे, नियमित भाडे न भरल्यामुळे कार्यालय मालकांनी ट्विटरविरोधात खटले दाखल केले आहेत. त्यामुळे ट्विटर आर्थिक संकटांचा सामना करता असताना मस्क यांनी त्याची खरेदी केली आहे. आलेले आर्थिक संकट या वर्षात दूर करणे हे मोठे आव्हान मस्क यांच्यासमोर आहे.