Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sugarcane Price : ऊस उत्पादकांना यावर्षी मिळणार जास्त भाव, इथेनॉलच्याही दरात वाढ होण्याची शक्यता

केंद्र सरकारने जून 2023 मध्ये उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ यंदाच्या म्हणजे 2023-24 च्या गाळप हंगामापासून लागू होणार आहे. त्यामुळे यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 315 रुपये प्रति क्विंटल एफआरपी प्राप्त होणार आहे. याचा फायदा राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

Read More

Sugarcane export : राज्यातील ऊस परराज्यात निर्यातीला बंदी; साखर कारखान्यांचे अर्थकारण बिघडणार?

राज्य सरकारने 13 सप्टेंबर रोजी राज्यातील ऊस पर राज्यात निर्यात बंद करण्या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. ही निर्यात बंदी या गाळप हंगामासाठी म्हणजे 30 एप्रिल 2024 पर्यंत लागू राहणार आहे. ऊस (नियंत्रण) आदेश 1966 नुसार ही अधिसूचना काढण्यात आली आहे.

Read More

Sugarcane farmers : उसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची मागणी; शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

साखर कारखान्यांचा 2022-23 या वर्षीच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना 3050 प्रतिटन या प्रमाणे एफआरपी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सद्य स्थितीत खतांच्या किमती, मजुरांचे रोजगार, इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात आलेला उसाचा दर परवडत नाही.

Read More

राज्यात उसाचा तुटवडा; गाळप हंगाम लांबण्याची शक्यता, शेतकऱ्यांना फटका बसणार?

या हंगामात राज्यात सुमारे 940 लाख मेट्रिक टन उस गाळपासाठी उपलब्ध आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे यंदा साखर उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या गाळप हंगाममध्ये राज्यात 2653 लाख टन उसाचे गाळप झाले होते.

Read More

Subsidy For Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी मिळणार 35 लाखांचे अनुदान; शेतकऱ्यांनाही होणार फायदा

यंदाच्या गाळप हंगामापासून ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी 35 लाख रुपयांपर्यतचे अनुदान दिले जाणार आहे. यासाठी कोणकोणते निकष आहेत याबाबतची माहिती जाणून घेऊया

Read More

Sugarcane FRP : चार साखर कारखान्यांविरोधात आरआरसी दाखल, एफआरपी थकवल्याने वसुलीचे आदेश जारी

राज्यात सध्या अहमदनगर जिल्ह्यातील साजन शुगर, सोलापूर जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर, हिंगोली येथील टोकाई सहकारी साखर कारखाना आणि पुणे जिल्ह्यातील घोडगंगा या चार साखर कारखान्यांना आरआरसी दाखल करण्यात आला आहे.

Read More

साखर कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामात डिजिटल काटे अनिवार्य; काटामारी थांबल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपी (FRP) प्रमाणे प्रति टनास दर मिळतो. मात्र, साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन करताना काटा मारला जात असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनांकडून सर्व कारखान्यांचे काटे ऑनलाईन करण्याची मागणी करण्यात येते. त्यावर साखर आयुक्त कार्यालयाकडून सकारात्मक पाऊले उचलण्यात आली आहेत.

Read More

Sugar Price : उसाची एफआरपी वाढली; कारखानदारांच्या आग्रही भूमिकेने साखर महागणार?

साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन वर्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही. नव्या वाढीव एफआरपीमुळे साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे एफआरपीसोबत ताळमेळ घालण्यासाठी साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉलच्या दरामध्ये वाढ करण्याबाबतही सरकारने विचार करावा असे मत इस्माचे अध्यक्ष झुनझुनवाला यांनी व्यक्त आहे.

Read More

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल चांगला भाव, FRP मध्ये वाढ!

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने साखर हंगाम 2023-24 साठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी 315 रुपये प्रति क्विंटल या आतापर्यंतच्या ऊसाच्या सर्वोच्च रास्त आणि लाभदायक किंमतीला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना फायदा होणार आहे.

Read More

Sugarcane FRP उसाची एफआरपी म्हणजे काय? जाणून घ्या फायदे आणि तोटे

साखर कारखान्याला गाळप हंगामामध्ये कच्चा माल पुरवठा करण्याचे काम ऊस उत्पादक शेतकरी (Sugarcane farmers) करतो. यासाठी त्याला योग्य मोबदला म्हणजेच एफआरपी (FRP) दिला जातो. मात्र या FRP चे नेमके स्वरुप काय आहे? ती कशाच्या आधारवर निश्चित केली जाते. शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर (sugarcane rate) परवडणारा असतो का? साखर उद्योगात एफआरपीचे महत्व काय आहे, याबाबतची विश्लेषणात्मक माहिती जाणून घेऊ

Read More

Sugar Price: येत्या काळात साखर देखील महागणार, यावर्षी उत्पादनात होणार घट!

मागील साखर विपणन वर्ष 2021-22 (ऑक्टोबर-सप्टेंबर) दरम्यान 358 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. साखरेचे उत्पादन कमी झाल्याने इथेनॉल (Ethanol) निर्मितीसाठी उसाचा मोलॅसिस, म्हणजेच मळी मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) आपल्या ताज्या अंदाजपत्रकात ही माहिती दिली आहे.

Read More

Sugar Exports: जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश 'भारत'

Sugar Exports: ब्राझीलनंतर साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. साखर हंगाम 2021-22 मध्ये देशात 5000 लाख मेट्रिक टनापेक्षा(LMT) जास्त उसाचे उत्पादन झाले आहे.

Read More