Sugar Exports: जागतिक स्थरावर उसाची शेती करणाऱ्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर ब्राझील(Brazil) असून दुसरे स्थान हे भारताचे(India) आहे. याच उसापासून साखरेची(Sugar) आणि गुळाची(Jiggery) निर्मिती केली जाते. भारतीय साखर क्षेत्रासाठी 2021-22 हे वर्ष अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचे ठरले आहे. कारण या हंगामात उसाच्या उत्पादनात (Sugarcane Production) लक्षणीय रित्या मोठी वाढ झाली आहे. साखरेचे उत्पादन, साखर निर्यात, ऊस खरेदी, उसाची देय रक्कम आणि इथेनॉल(Ethanol) उत्पादन या सर्वच क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करण्यात भारताला यश आले आहे. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतात 5000 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उसाचे उत्पादन
साखर हंगाम 2021-22 मध्ये देशात 5000 लाख मेट्रिक टनापेक्षा(LMT) जास्त उसाचे उत्पादन झाले आहे. साखर कारखान्यांनी त्यापैकी 574 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करुन जवळपास 394 लाख मेट्रिक टन साखर तयार करण्यात आली आहे. 36 लाख मेट्रिक टन साखर, इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात असून साखर कारखान्यांनी 359 लाख मेट्रिक टन साखर तयार केली आहे. साखर हंगाम ऑक्टोबर 2021ते सप्टेंबर २०२२ मध्ये भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक म्हणून नावलौकिकास आला आहे.
साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश
ब्राझीलनंतर साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. साखरेच्या किंमती पडल्यानंतर साखर कारखानदारांना होणारे रोखीचे नुकसान टाळण्यासाठी, केंद्र सरकारने 2018 मध्ये साखरेची किमान विक्री किंमत (MSP) निश्चित करण्याची संकल्पना मांडली होती. साखर हंगाम 2021-22 मध्ये साखर कारखान्यांनी केंद्र सरकारकडून कोणतेही आर्थिक अनुदान न घेता 1.18 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा ऊस खरेदी केला. साखर क्षेत्राला स्वयंपूर्ण करण्यासाठीची दीर्घकालीन उपाययोजना म्हणून केंद्र सरकार साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी सध्या प्रोत्साहन देत आहे.