Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Startup Funding: गुंतवणुकदारांनी फिरवली पाठ! सात महिन्यात स्टार्टअप फंडिंग 77% टक्क्यांनी घटली

2022 मधील जानेवारी-जुलै या सात महिन्यात व्हेंचर कॅपिटल कंपन्यांनी स्टार्टअपमध्ये 19.3 बिलियन डॉलर एवढी रक्कम गुंतवली होती. मात्र, चालू वर्षी पहिल्या सात महिन्यांत फक्त 4.4 बिलियन डॉलर रक्कम गुंतवण्यात आली.

Read More

Shark Tank India: शार्क टँकमधून खरंच मिळतो का निधी? आश्वासन 40 कोटींचं पण प्रत्यक्षात किती?

Shark Tank India: स्टार्टअप्सना निधी मिळवण्याचं एक प्लॅटफॉर्म असलेलं शार्क टँक इंडिया हा एक प्रसिद्ध शो आहे. या माध्यमातून देशभरात काहीतरी नवं करू इच्छिणाऱ्यांसाठी निधीची व्यवस्था आहे. मात्र या स्टार्टअप्सना खरंच आश्वासन दिलेला निधी मिळतो का, यावर आता चर्चा होऊ लागल्या आहेत.

Read More

Bank of Maharashtra: पुण्यात महाराष्ट्र बँकेची खास शाखा! फक्त स्टार्टअप उद्योगांना देते कर्ज

महाराष्ट्र बँकेने खास नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी स्टार्टअप शाखा सुरू केली आहे. पुण्यातील फर्ग्युसन रोडवर ही बँक आहे. जर तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल आणि पैशांची अडचण असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क साधू शकता. व्यवसाय वृद्धीसाठीही कर्ज मिळू शकते. ही शाखा स्टार्टअप उद्योगांना बाजारात IPO आणि FPO आणण्यासही मदत करते.

Read More

Byju’s Crisis: कोरोना काळात घराघरात पोहचलेली बायजू आर्थिक संकटात; गुंतवणुकदारांनीही साथ सोडली

सध्या बायजूवर 1.2 बिलियन डॉलरचे टर्म लोन आहे. मात्र, हे कर्ज फेडण्याची कंपनीची क्षमता नाही. कर्जाचे हप्ते थकल्याने कर्जदारांनी बायजूविरोधात खटला दाखल केला आहे. दरम्यान, बायजूनेही कर्जदारांच्या अटी अवास्तव असल्याचे म्हणत उलट गुन्हा दाखल केला आहे. संचालक मंडळातील तीन महत्त्वाच्या व्यक्तींनी काल (शुक्रवार) राजीनामा दिला.

Read More

Start-Up Governance: लक्झरी वाहनं अन् कोट्यवधींच्या पगारावर लगाम, स्टार्टअप मालकांना आधी स्वत:ला सिद्ध करावं लागणार

Start-Up Governance: स्टार्टअप फाउंडर्सच्या लक्झरी वाहन आणि कोट्यवधीच्या पगारावर आता लगाम बसणार आहे. कारण व्हेंचर कॅपिटलिस्टच्या पैशांवर मौज करणाऱ्या स्टार्टअप फाउंडर्सचे दिवस आता गेले आहेत. स्टार्टअप मालकांना आता आधी स्वत:ला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे.

Read More

Indian startup funding: 'प्लॅन्ट मीट' बनवणाऱ्या 'या' स्टार्टअपनं उभारला तब्बल 7.30 कोटींचा निधी!

Indian startup funding: शाकाहारी मांस बनवणाऱ्या एका स्टार्टअपनं तब्बल 7.30 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. शाकाहारी मांस अशी आगळीच संकल्पना या स्टार्टअपनं सुरू केली. शाकाहारी लोकांसाठी आणि अर्थातच सर्वांसाठी प्रोटीन बेस प्रॉडक्ट कंपनी तयार करते.

Read More

Startups Funding : कसा उभारला जातो स्टार्टअप्ससाठी निधी? प्री-सीड आणि सिरीज एबीसीडी राऊंड फंडिंग काय?

Startups Funding : स्टार्टअप ही झपाट्यानं वाढत जाणारी संकल्पना आहे. अलिकडच्या काळात नोकऱ्यांचं कमी होणारं प्रमाण आणि प्रत्येकाला वेगळं काहीतरी करण्याची इच्छा यामुळे या स्टार्टअप्समध्ये वाढ होताना दिसतेय. मात्र यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निधी. काय आहे याचं एकूण गणित? पाहू...

Read More

Shark Tank India Season 3 : व्यवसायासाठी निधी हवाय? लवकरच भेटीला येतोय शार्क टँकचा सीझन 3, पाहा अर्जाची पूर्ण प्रक्रिया

Shark Tank India Season 3 : व्यवसायासाठी फंडिंग हवं असेल तर अशा नवीन व्यावसायिकांसाठी मदतीला येतो शार्क टँक. होय... पहिल्या दोन सीझनच्या यशस्वीतेनंतर आता तिसरा सीझन लवकरच भेटीला येणार आहे. तुम्हालाही यामाध्यमातून आपल्या व्यवसायासाठी निधी हवा असेल, तर संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

Read More

Tax Relief for Startup: 21 देशातून आलेल्या गुंतवणुकीवर सरकार Angel Tax लावणार नाही; स्टार्टअपला दिलासा

Tax Relief for Startup: केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एंजेल टॅक्सच्या नियमांमध्ये बदल करून जवळपास 21 देशांमधून येणाऱ्या गुंतवणुकीवर एंजेल टॅक्स न लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे स्टार्टअप कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Read More

Indian startups : भारतातले स्टार्टअप्स व्हेंटिलेटरवर! 9 वर्षात यंदा मिळाला सर्वात कमी निधी

Indian startups : उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठीची स्टार्टअपची संकल्पना भारतात व्हेंटिलेटरवर असल्याचं पाहायला मिळतंय. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक सुविधा त्यातही निधीचा पुरवठा योग्यप्रकारे होत नसल्यानं स्टार्टअपची स्थिती फारशी चांगली नसल्याचं दिसून येतंय.

Read More

Startups India : स्टार्टअप सीड फंड योजनेअंतर्गत इनक्यूबेटर्सना 611 कोटी रुपयांचं वाटप

Startups India : स्टार्टअप सीड फंड योजनेच्या अंतर्गत सरकारतर्फे इनक्यूबेटर्सना निधीचं वाटप करण्यात आलंय. जवळपास 611 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यापैकी 61 कोटी रुपये आतापर्यंत सीड फंड योजनेच्या अंतर्गत स्टार्टअप्सना जारीदेखील करण्यात आलेत.

Read More

Shark Tank : नमिता थापर यांनी गुंतवणूक केलेल्या स्टार्ट-अपच्या विक्रीत वाढ

Shark Tank : शार्क टँकमधील हेल्थकेअर क्षेत्रातल्या शार्क नमिता थापर यांनी दोन हेल्थ केअर सेक्टरमधल्या स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली होती. या दोन्ही कंपनीच्या विक्रीमध्ये एम्याक्योरच्या मदतीने चांगलीच वाढ होत आहे. नमिता थापर यांनी लिंक्ड इन पोस्टच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे.

Read More