Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Startup Funding: गुंतवणुकदारांनी फिरवली पाठ! सात महिन्यात स्टार्टअप फंडिंग 77% टक्क्यांनी घटली

Startup Funding

2022 मधील जानेवारी-जुलै या सात महिन्यात व्हेंचर कॅपिटल कंपन्यांनी स्टार्टअपमध्ये 19.3 बिलियन डॉलर एवढी रक्कम गुंतवली होती. मात्र, चालू वर्षी पहिल्या सात महिन्यांत फक्त 4.4 बिलियन डॉलर रक्कम गुंतवण्यात आली.

Startup Funding: स्टार्टअप कंपन्यांमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात खाली आल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. कोरोना काळात स्टार्टअप कंपन्यांवर गुंतवणुकदारांनी विश्वास टाकला होता. मात्र, आता त्यांच्यापासून गुंतवणुकदार लांब पळत आहेत. जानेवारी -जुलै या 7 महिन्यांची मागील वर्षातील (2022) याच कालवधीशी तुलना केल्यास 77% फंडिग कमी झाल्याचे समोर आले आहे.

अनेक स्टार्टअप कंपन्या फंडिग राऊंडमध्ये सहभागी होतात. मात्र, त्यांच्या हाताला काहीही लागत नाही. मोठ्या डीलची संख्या कमालीची रोडावली आहे. तसेच एकूण स्टार्टअपमधील गुंतवणुकीचा आकडा खाली आला आहे.

मागच्या वर्षीची आकडेवारी काय सांगते?

2022 साली जानेवारी-जुलै या 7 महिन्यात व्हेंचर कॅपिटल कंपन्यांनी स्टार्टअपमध्ये 19.3 बिलियन डॉलर एवढी रक्कम गुंतवली होती. मात्र, चालू वर्षी पहिल्या सात महिन्यांत फक्त 4.4 बिलियन डॉलर रक्कम गुंतवण्यात आली. 2022 साली गुंतवणुकीच्या 821 मोठ्या डील झाल्या होत्या. मात्र, हे प्रमाण चालू वर्षी 344 वर आले आहे. गुंतवणुकदारांनी स्टार्टअप कंपन्यांकडे पाठ फिरवल्याचे यातून दिसून येत आहे.

venture-capital-investment-1-1.jpg

नव्याने सुरू होणाऱ्या स्टार्टअपला निधी मिळेना

जानेवारीपासून येणाऱ्या प्रत्येक नवीन महिन्यात स्टार्टअपमधील गुंतवणूक कमी होत आहे. पहिल्या टप्प्यातील स्टार्टअप कंपन्या म्हणजे ज्या कंपन्या नुकत्याच सुरू झाल्या आहेत त्यांना निधीची अत्यंत गरज असते. मात्र, या कंपन्यांना होणारी गुंतवणूक कमालीची रोडावली आहे.

मागील वर्षी जानेवारी-जुलैमध्ये 442 अर्ली स्टेज स्टार्टअप कंपन्यांना निधी मिळाला होता. चालू वर्षी हे प्रमाण 198 वर आला आहे. निधीसुद्धा 1.8 बिलियन डॉलरवरून 722 मिलियन डॉलरवर आला. म्हणजेच 59% कमी निधी मिळाला.

चालू वर्षातील टॉप इनव्हेस्टर

Peak XV Partners या व्हेंचर कॅपिटल कंपनीने 2023 मध्ये 21 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. त्यानंतर ब्लूम व्हेंचर्स कंपनीने 16, Accel India कंपनीने 12 स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. तर रेनमॅटर कॅपिटल आणि लाइटस्पीड व्हेंचरने प्रत्येकी 10 स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली.