Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank of Maharashtra: पुण्यात महाराष्ट्र बँकेची खास शाखा! फक्त स्टार्टअप उद्योगांना देते कर्ज

Startup Funding

Image Source : www.thehindubusinessline.com

महाराष्ट्र बँकेने खास नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी स्टार्टअप शाखा सुरू केली आहे. पुण्यातील फर्ग्युसन रोडवर ही बँक आहे. जर तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल आणि पैशांची अडचण असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क साधू शकता. व्यवसाय वृद्धीसाठीही कर्ज मिळू शकते. ही शाखा स्टार्टअप उद्योगांना बाजारात IPO आणि FPO आणण्यासही मदत करते.

Bank of Maharashtra startup Branch: कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगळीवेगळी संकल्पना असावी लागते. मात्र, ही आयडिया सत्यात उतरवण्यासाठी गरज पडते ती पैशांची. स्टार्टअप्सला सहजासहजी कोणी कर्ज देत नाही. उद्योजकाकडेही एवढे पैसे नसतात ज्याने संपूर्ण व्यवसाय उभा राहील. (Bank of Maharashtra startup bank Pune) ही गरज ओळखून बँक ऑफ महाराष्ट्राने खास स्टार्टअप कंपन्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुण्यात शाखा सुरू केली आहे.

फर्ग्युसन रोडवर स्टार्टअप ब्राँच

महाराष्ट्र बँकेची ही स्टार्टअप ब्राँच पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील यशोमंगल येथे आहे. या स्टार्टअप शाखेबद्दल अनेकांना माहिती नाही. 31 मार्च 2023 ला ही शाखा सुरू करण्यात आली. (Bank of Maharashtra startup bank Pune) तुम्ही जर व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर या शाखेला भेट देऊ शकता. तसेच उद्योग सुरू केला असेल आणि विस्तारासाठी, मशिनरी खरेदी करण्यासाठी पैसा हवा असेल तरीही बँकेशी संपर्क करू शकता.

IPO, FPO उभारण्यासही करणार मदत 

ही शाखा स्टार्टअप उद्योगांना पैसे उभारण्यासोबतच IPO आणि FPO बाजारात आणण्यास मदत करेल. Small Industries Development Bank of India -SIDBI व्हेंचर कॅपिटलसोबत महाराष्ट्र बँकेने सहकार्य करार केला आहे. स्टार्टअपला फंड उभारणीसाठी SIDBI देखील मदत करणार आहे.  आयटी हब असण्याबरोबरच पुण्यात ऑटो क्लस्टरही आहे. अनेक नामांकित कंपन्या पुण्यामध्ये आहेत. (Bank of Maharashtra startup bank Pune) या कंपन्यांना स्पेअर पार्ट्स आणि विविध सेवा पुरवणाऱ्या छोट्या मोठ्या हजारो कंपन्या आहेत. पुण्याचा विकास वेगाने होत असल्याने उद्योगांना मदत करण्याच्या हेतूने ही खास स्टार्टअप शाखा बँकेने सुरू केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रने देशभरात वेगवेगळ्या गरजांसाठी खास शाखा सुरू केल्या आहेत. यामध्ये हाऊसिंग फायनान्स शाखा, MSME शाखा, फॉरेक्स, मीड कॉर्पोरेट, कॉर्पोरेट फायनान्स शाखाही सुरू केल्या आहेत.

MSME प्रोजेक्ट लोन योजना

महाराष्ट्र बँकेकडून लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना आर्थिक मदत करण्यासाठी MSME प्रोजेक्ट लोन योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत टर्म लोन (निश्चित कालावधी कर्ज) उपलब्ध करून दिले जाते. 2 कोटी पर्यंतच्या कर्जाला CGTMSE द्वारे गॅरंटी सुद्धा दिला जाते. 10 वर्षापर्यंत कर्जफेड कालावधी मिळतो. या योजनेंतर्गत 25% रक्कम व्यावसायिकाला स्वत:च्या खिशातून टाकावी लागते. कंपनी काही तारण ठेवणार असेल तर व्याजदरावर सूटही मिळते. याशिवाय बँकेच्या इतर सर्वसामान्य शाखेतही व्यावसायिक कर्ज मिळते.