Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian startup funding: 'प्लॅन्ट मीट' बनवणाऱ्या 'या' स्टार्टअपनं उभारला तब्बल 7.30 कोटींचा निधी!

Indian startup funding: 'प्लॅन्ट मीट' बनवणाऱ्या 'या' स्टार्टअपनं उभारला तब्बल 7.30 कोटींचा निधी!

Image Source : www.zeebiz.com

Indian startup funding: शाकाहारी मांस बनवणाऱ्या एका स्टार्टअपनं तब्बल 7.30 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. शाकाहारी मांस अशी आगळीच संकल्पना या स्टार्टअपनं सुरू केली. शाकाहारी लोकांसाठी आणि अर्थातच सर्वांसाठी प्रोटीन बेस प्रॉडक्ट कंपनी तयार करते.

प्लॅन्ट मीट म्हणजेच झाडांपासून प्रोटीन तयार करणारं स्टार्टअप म्हणजे इव्हॉल्व्ह फूड्स... या स्टार्टअपनं 7.30 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. या फंडिंग राउंडचं नेतृत्व झिरोधा (Zerodha) समर्थित रेनमॅटर हेल्थ (Rainmatter Health) आणि कमला कॅपिटल (Kamala Capital) करत आहेत. या शिवाय अन्या व्हेंचर्सच्या (Anyaa Ventures) अन्विता प्रशांत (Anvitha Prashanth) आणि कू (KOO) अ‍ॅपचे फाउंडर अप्रमेया राधाकृष्ण (Aprameya Radhakrishna) यांनीही या फंडिंग राउंडमध्ये भाग घेतला होता. हे स्टार्टअप झाडांपासून मांस बनवते, यालाच शाकाहारी मांस असं कंपनीनं संबोधलं आहे. ते मांसासारखं दिसतं खरं पणे पूर्णपणे झाडांच्या म्हणजेच वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेलं प्रोटीन आहे.

एंजल इन्व्हेस्टर्सचा ग्रुपदेखील सहभागी 

या फंडिंग राउंडमध्ये एंजल इन्व्हेस्टर्सचा एक ग्रुपदेखील सहभागी झाला होता. या एंजल इन्व्हेस्टर्समध्ये गोएंका व्हेंचर्स फॅमिली ऑफिसचे (Goenka Ventures Family Office) राशेल गोएंका आणि करण खेत्रपाल, वन इंडियाचे (OneIndia) संस्थापक आणि माजी एमडी बीजी महेश, क्लीनमॅक्स सोलरचे (CleanMax Solar) सह-संस्थापक सुशांत अरोरा, प्रॉक्टर अँड गॅम्बलचे (Proctor & Gamble) माजी ब्रँड हेड स्वप्नील शाह आणि वननम व्हेंचर्स ट्रस्ट (Vananam Ventures Trust) यांचा समावेश होता.

कुठे वापरणार पैसा?

फंडिंगच्या माध्यमातून स्टार्टअपनं एक चांगला निधी उभारला आहे. या निधीचा उपयोग प्रॉडक्शन आणि सप्लाय चेन ऑपरेशनला अधिक चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी करण्याचं या स्टार्टअपचं नियोजन आहे. इव्हॉल्व्ह या स्टार्टअपनं शाकाहारी मांस ही संकल्पना आणली असली तरी या व्यतिरिक्त इतरही उत्पादन आहे. प्रोटीनयुक्त अशी ही उत्पादनं कंपनी तयार करते. झाडांमधल्या सर्वोत्तम प्रोटीनसह काही खास आणि टेस्टी असे फूड प्रॉडक्ट्स बनवले जातात.

प्रोटीन कमतरतेत उपयुक्त

ज्या लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे, अशांसाठी ही उत्पादनं उपयुक्त ठरतात, असा कंपनीचा दावा आहे. प्रामुख्यानं सोया, नारळ आणि तांदूळ अशा नैसर्गिक घटकांचा वापर करून प्रथिनांची उत्पादनं बनवली जातात. या स्टार्टअपच्या सर्व डिश लोकप्रिय रेस्टॉरंट्स आणि क्युअरफूड्स अशा ठिकाणांहून ऑर्डर करू शकता.

कुठे मिळतील प्रॉडक्ट्स?

या स्टार्टअपची उत्पादनं गो पिझ्झआ (GOPIZZA), शांग्री-ला (Shangri-La), गो (Go), नेटिव्ह (Native), रॉयल ऑर्चिड (Royal Orchid), टॉसकॅनो (Toscano) आणि ट्रिपी गोट (Trippy Goat) याठिकाणीदेखील हे प्रॉडक्ट्स मिळू शकतात. सध्या कंपनी बेंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि इतर काही ठिकाणी आपली सर्व्हिस देत आहे.

काय म्हणाल्या कंपनीच्या संस्थापक?

इव्हॉल्व्ह फूड्सच्या संस्थापक आणि सीओओ रोमा रॉय चौधरी यांनी आपली उत्पादनं आणि एकूणच निधीविषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, की सुमारे 3 वर्षांच्या संशोधन (Research) आणि विकासानंतर (Development) तयार करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर या काळात कन्झ्यूमर ट्रायलही करण्यात आल्या. त्या म्हणाल्या, की या निधीतून मिळालेल्या पैशाचा वापर करून उत्पादन आणि पुरवठा साखळीचं कामकाज कंपनी आधीपेक्षा अधिक चांगलं करून पुढे जाणार आहे.