शार्क टँक इंडियाचे आतापर्यंत दोन सीझन झाले. आता तिसरा सीझन लवकरच येणार आहे. निर्मात्यांनी त्याचा प्रोमो (Promo) रिलीज केला आहे. जर तुम्हालादेखील यात सहभागी व्हायचं असेल आणि आपल्या व्यवसायासाठी निधी मिळवायचा असेल, तर त्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रोसिजर (Registration procedure) फॉलो करावी लागेल.
शार्क टँक इंडियाचा दुसरा सीझन 3 मार्चरोजी झाला. आता तिसऱ्या पर्वासाठई तुम्ही सोनी लिव्ह (Sony Liv) अॅप आणि अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून नोंदणी करता येईल.
- 3 जूनपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. नोंदणी करण्यासाठी आधी तुम्हाला सोनी लिव्ह अॅप डाउनलोड करावं लागेल. याठिकाणी तुम्ही लॉग इन करा आणि मोबाइल नंबर टाकावा. त्यानंतर 6 अंकी ओटीपी (OTP) टाका.
- आता शार्क टँक इंडियाच्या अटी आणि शर्ती (Terms and Conditions) मान्य कराव्या लागतील. त्यानंतर ही प्रक्रिया झाल्यवर सबमिट करावं. ऑनलाइन प्रोफाइलसाठी नाव, ई-मेल आणि इतर आवश्यक माहिती भरावी.
- प्रोफाइल तयार झाल्यावर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती यठिकाणी द्यावी लागणार आहे. विशेषतः व्यवसायाची सद्यस्थिती, मार्केट कॅटेगरी, उत्पादन, गुंतवणुकीची आवश्यकता इत्यादी सर्वच माहिती देणं गरजेचं आहे.
- रजिस्ट्रेशनच्या पुढच्या टप्प्यात कायदेशीर आणि आर्थिक माहिती, व्यवसाय प्रशासन यासारखी व्यवसायाची संबंधित माहिती भरावी लागणार आहे. आता तुम्हाला वैयक्तिक माहिती शेअर करावी लागेल. शेवटी, तुम्हाला डिक्लेरेशनला काळजीपूर्वक वाचावं लागेल.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर ऑडिशनसाठी बोलावलं जाईल. त्या ठिकाणाहून पास झाल्यानंतर पिचिंगसाठी शार्कला पाठवलं जाईल.
शार्क टँक इंडिया सीझन दोनचं यश
शार्क टँक इंडिया सीझन दोननं अनेक व्यावसायिकांना निधीसाठी मदत केली. जवळपास 103 व्यवसायांमध्ये तब्बल 80 कोटींची गुंतवणूक या माध्यमातून करण्यात आली. त्यामुळे होतकरू आणि नवीन व्यावसायिकांची वाट अत्यंत सोपी झाली. अनेक स्टार्टअप्स केवळ निधीअभावी मागे राहतात. फायद्यापेक्षा तोटा अधिक वाढत जातो आणि व्यवसाय करणं अवघड होऊन बसतं. कर्जाचा डोंगरही वाढतो. अशावेळी योग्य वाट दाखवणाऱ्या शार्क टँकची मदत अनेक व्यावसायिक मागील दोन सीझनपासून घेत आहेत.
If you have a great business idea and are looking for investments, Shark Tank India is the place for you!
— Sony LIV (@SonyLIV) June 3, 2023
Register for Shark Tank India Season 3 now on https://t.co/U7fnJMzHtl #SharkTankIndia season 3 streaming soon on Sony LIV.#SharkTankIndiaOnSonyLIV pic.twitter.com/FeWErYuDc9
काही स्टार्टअप्सची भरारी
- स्टेज (STAGE) या प्रादेशिक बोलींना पुरविणारा एक नाविन्यपूर्ण ओटीटी प्लॅटफॉर्म, शार्कला भाषा विभागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनानं प्रभावित केलं. त्यांच्यासोबत 1.5 कोटी कर्जासह 0.6 टक्के इक्विटीसाठी 1.5 कोटींचा करार करण्यात आला.
- पॅडकेअर (Padcare) या माध्यमातून मासिक पाळीतल्या कचरा व्यवस्थापन सेवेनं, महिलांचं आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न केला. या बाबतीत स्वच्छता राहावी, यासाठी पॅडकेअर काम करतं.
- स्निच (Snitch) या पुरुषांच्या वाढत जाणाऱ्या फॅशन ब्रँडनं आपल्या ट्रेंडी आणि परवडणाऱ्या कपड्यांच्या रेंजसाठी पाचही शार्क्सची डील जिंकली.
- पुण्यातल्या स्टार्टअप डेली डंपनं कचरा व्यवस्थापनावर एक उपाय काढला. भारतात होम कंपोस्टिंगची सवय लावण्याच्या हेतूने काम केलं जातं. त्यांच्या या कामानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
- पाटील काकींनी आपल्या उत्कृष्ट घरगुती स्नॅक्सनं सर्वच शार्क्सना प्रभावित केलं.