Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market: ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी IRRA प्लॅटफॉर्म लाँच, जाणून घ्या कसा होईल फायदा

सेबीद्वारे ट्रेडर्ससाठी Investor Risk Reduction Access (IRRA) प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे. ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही तांत्रिक समस्या आल्यास ऑर्डरमधून बाहेर पडण्यासाठी याची मदत घेता येईल.

Read More

AI tool For Mutual Fund : म्युच्युअल फंडांच्या गैरव्यवहाराला आळा घालणार सेबी; एआय 'टूल' ची घेणार मदत

म्युच्युअल फंड कंपन्याचे वितरक, एजंट यांच्याकडून अशा प्रकारचे गैर व्यवहार केले जातात. मात्र, याचा शोध घेणे सहज शक्य नाही. त्यासाठीच आम्ही एआय टूल विकसित करत आहोत. ज्यामुळे अल्गोरिदमच्या माध्यामातून म्युच्युअल फंडाची विक्री करताना होणाऱ्या गैरव्यवहाराचा शोध घेणे सोपे होणार असल्याचे स्पष्टीकरण सेबीकडून देण्यात आले आहे.

Read More

SBFC Finance IPO: शेअर बाजारात दाखल होणार एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ, 3 ऑगस्टपासून अर्ज करा

SBFC Finance IPO: शेअर बाजारात एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ दाखल होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी असणार आहे. 3 ऑगस्टपासून याचं सबस्क्रिप्शन सुरू होईल. तर 7 ऑगस्टपर्यंत यात पैसे गुंतवता येणार आहेत.

Read More

SEBI on mutual funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे? सेबीनं जारी केले नवे नियम

SEBI on mutual funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बाजार नियामक सेबीनं काही अपडेट्स दिले आहेत. सेबीनं मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना (Asset management companies) पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) थीम कॅटेगरीची व्याप्ती वाढवत सहा नवीन धोरणांतर्गत फंड लॉन्च करण्याची परवानगी दिली आहे.

Read More

SEBI : आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या सात कंपन्यांच्या संपत्तीचा सेबी करणार लिलाव, 13 कोटी कमावण्याचा अंदाज

गुंतवणूकदारांची दिशाभूल करून, त्यांच्याकडून अवैधरीत्या भांडवल जमा केल्याचा आरोप या सात कंपन्यांवर करण्यात आला आहे. या सातही कंपन्यांची सखोल चौकशी केल्यानंतर सेबीने ही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 ऑगस्टला या सात कंपन्यांच्या एकूण 15 मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती स्वतः सेबीने दिली आहे.

Read More

Mutual Fund investment: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहात? सेबीनं आणले नवे नियम

Mutual Fund investment: चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं नवीन फ्रेमवर्क जारी केलं आहे. ते काय आहे आणि त्याचा कसा फायदा होईल ते जाणून घेऊ...

Read More

Upcoming IPO: कमाईसाठी तयार व्हा, सेबीनं दिली 3 आयपीओंना मंजुरी; जाणून घ्या सविस्तर

Upcoming IPO: बाजारात सध्या जोरदार घडामोडी घडत आहेत. यापुढेही ही मालिका सुरूच राहणार आहे. कारण बाजार नियामक सेबीनं 3 आयपीओंना मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर गुंतवणूकदारांना पब्लिक इश्यूमध्ये पैसे गुंतवायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.

Read More

Financial Influencers: फायनान्शिअल इन्फ्लूएन्सर्ससाठी सेबी नियमावली आणणार; ब्रोकर्स, म्युच्युअल फंड्सलाही देणार निर्देश

फायनान्शिअल इन्फ्लूएन्सर्ससाठी सेबी लवकरच नियमावली आणणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटरसह अनेक सोशल मीडिया माध्यमांवर आर्थिक सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. काही इन्फ्लूएन्सर्स नागरिकांना चुकीचा गुंतवणूक सल्ला देत असल्याचे सेबीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे याबाबत नियमावलीचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

Read More

SEBI action: सेबीची मोठी कारवाई! नवे ग्राहक तयार करण्यास 'या' कंपनीवर 2 वर्षांसाठी बंदी

SEBI action: भांडवली बाजार नियामक सेबीनं आणखी एका कंपनीवर कारवाई केली आहे. बाजारात अयोग्य पद्धतीनं आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर मागच्या काही दिवसांपासून सेबीनं कठोर पवित्रा घेतला आहे. त्यात आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे.

Read More

RBI on social media influencers : सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सवर निर्बंध नाहीत, आरबीआयची भूमिका

RBI on social media influencers : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सवर कोणतेही निर्बंध लादणार नाही, त्यांचं नियमन करणार नाही, असं आरबीआय गव्हर्नरांकडून स्पष्ट करण्यात आलंय. यासंदर्भात सेबीनं आधीच उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणते नियम लादण्याची योजना नसल्याचं सांगण्यात आलंय.

Read More

Upcoming IPO: पैशांची व्यवस्था करा, आठवडाभरात येत आहेत 'या' पाच कंपन्यांचे आयपीओ

Upcoming IPO: आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पुढच्या आठवड्यात एक दोन नाही तर पाच कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. भांडवली बाजार नियामक सेबीनं या कंपन्यांना आपले आयपीओ आणण्यास मंजुरी दिली आहे.

Read More

Sebi AMC Surveillance: म्युच्युअल फंडातील गैरप्रकार टाळण्यासाठी सेबीचा प्रस्ताव; AMC, कर्मचारी अन् ब्रोकर्सवर राहणार नजर

म्युच्युअल फंड आणि भांडवली बाजारात भारतीय नागरिकांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याचबरोबर फसवणूक, अनियमितता, गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापरही वाढत आहे. त्यामुळे आता सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने गुंतवणुकदारांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Read More