बाजार नियामक सेबीनं (Securities and Exchange Board of India) सध्या म्युच्युअल फंडांना इक्विटी योजनांसाठी थीम श्रेणी अंतर्गत ईएसजी गुंतवणुकीसह फक्त एक योजना सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तर ग्रीन फायनान्सिंगची वाढती गरज लक्षात घेऊन भांडवली बाजार नियामकानं आता म्युच्युअल फंडांना विविध रणनीतींसह एकाधिक ईएसजी योजना सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ईएसजी फॅक्टर बेस्ड इन्व्हेस्टिंग जगाच्या सर्वच भागांमध्ये जोर धरताना दिसत आहे आणि भारतीय पॉलिसीमेकर्सही स्थायी गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहेत.
नवीन कॅटेगरी काय?
सेबीच्या 20 जुलैच्या परिपत्रकानुसार, ईएसजी कॅटेगरीअंतर्गत कोणतीही योजना यापैकी एका धोरणासह सुरू केली जाऊ शकते - एक्सक्लूशन, इंटिग्रेशन, बेस्ट इन क्लास अँड पॉझिटिव्ह स्क्रिनिंग, इम्पॅक्ट इन्व्हेस्टिंग, सस्टेनेबल ऑब्जेक्टिव्ह्स आणि ट्रान्झिशन किंवा ट्रान्झिशन संबंधित इन्व्हेस्टमेंट
एक्सक्लूशन:
सेबीनं म्हटलं आहे, की एक्सक्लुड सिक्युरिटीज काही ईएसजी संबंधित अॅक्टिव्हिटीज, बिझनेस प्रॅक्टिसेस किंवा बिझनेस सेगमेंट्सवर आधारित असतील.
इंटिग्रेशन:
इंटिग्रेशन थीम असलेले फंड गुंतवणुकीचे निर्णय घेताना पारंपरिक आर्थिक घटक तसंच ईएसजी संबंधित घटकांचा विचार करतील. गुंतवणुकीचे निर्णय घेताना जोखीम आणि गुंतवणुकीचा परतावा यासाठी ते महत्त्वपूर्ण आहेत.
बेस्ट इन क्लास अँड पॉझिटिव्ह स्क्रिनिंग:
बेस्ट इन क्लास अँड पॉझिटिव्ह स्क्रिनिंग स्ट्रॅटेजीचं उद्दिष्ट त्या कंपन्या आणि जारीकर्त्यांमध्ये गुंतवणूक करण्याचं असेल ज्या ईएसजी बाबींशी संबंधित एक किंवा अधिक परफॉर्मन्स मॅट्रिक्सवर सोबतच्या कंपन्यांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करतात.
इम्पॅक्ट इन्व्हेस्टिंग:
गुंतवणूक आर्थिक परतावा तसंच सकारात्मक, मोजता येण्याजोगा सामाजिक किंवा एन्व्हायर्नमेंटल प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. हे सर्व फंड व्यवस्थापकांवर अवलंबून आहे, की ते या प्रभावासह त्यांचं उद्दिष्ट कसं साध्य करू इच्छितात.
सस्टेनेबल ऑब्जेक्टिव्ह्स:
सस्टेनेबल ऑब्जेक्टिव्ह फंड्स त्या सेक्टर्स, इंडस्ट्रीज अथवा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल ज्यांना लॉन्ग टर्म मॅक्रो किंवा स्ट्रक्चरल ईएसजी संबंधित ट्रेंडचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
ट्रान्झिशन किंवा ट्रान्झिशन संबंधित इन्व्हेस्टमेंट:
ट्रान्झिशन किंवा ट्रान्झिशन संबंधित इन्व्हेस्टमेंट कंपन्या आणि जारीकर्त्यांवर लक्ष केंद्रित करतील जे एन्व्हायर्नमेंटल ट्रान्झिशन किंवा फक्त ट्रान्झिशनला समर्थन देतात किंवा सुविधा देतात.
गुंतवणूक कशी करावी?
सेबीनुसार, ईएसजी स्कीम्सना योजनेच्या त्या विशिष्ट धोरणाच्या इक्विटी साधनांमध्ये व्यवस्थापनाखालच्या एकूण मालमत्तेच्या (AUM) किमान 80 टक्के गुंतवणूक करावी लागणार आहे. सध्या, ईएसजी योजनांसाठी केवळ अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक अनिवार्य आहे, ज्यांच्याजवळ मोठी बिझनेस जबाबदारी आणि सस्टेनेबल रिपोर्टिंग (BRSR) डिसक्लोजर्स आहे.