Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBFC Finance IPO: शेअर बाजारात दाखल होणार एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ, 3 ऑगस्टपासून अर्ज करा

SBFC Finance IPO: शेअर बाजारात दाखल होणार एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ, 3 ऑगस्टपासून अर्ज करा

SBFC Finance IPO: शेअर बाजारात एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ दाखल होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी असणार आहे. 3 ऑगस्टपासून याचं सबस्क्रिप्शन सुरू होईल. तर 7 ऑगस्टपर्यंत यात पैसे गुंतवता येणार आहेत.

एसबीएफसी ही एक नॉन बँकिंग फायनान्स (SBFC Finance) कंपनी आहे. कंपनीनं अद्याप यासाठी प्राइज बँडची घोषणा केलेली नाही. पण या आयपीओच्या (Initial public offering) माध्यमातून एकूण 1025 कोटी रुपये कंपनी उभारणार आहे. एसबीएफसीला यातून जवळपास 600 कोटी रुपये मिळतील. याचा वापर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी केला जाणार आहे. 10.25 कोटी रुपयांचे शेअर्स कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवले आहेत. सुरुवातीला कंपनीनं आयपीओसाठी 1,600 कोटी रुपयांचा ड्राफ्ट पेपर तयार केला होता. नंतर मात्र रक्कम कमी करून ती 1,200 कोटींपर्यंत खाली आणण्यात आली.

सेबीची मंजुरी

नोव्हेंबर 2022मध्ये सुरुवातीला कंपनीनं आयपीओसाठीची वाढवलेली रक्कम नंतर कमी केली. मार्च 2023मधल्या ड्राफ्ट पेपरमध्ये ती नमूद करण्यात आली होती. मागच्या महिन्यात म्हणजेच जून 2023मध्ये सेबीनं एसबीएफसीच्या आयपीओला मंजुरी दिली. त्यामुळे 1,025 कोटी रुपयांचा हा आयपीओ असणार आहे. एसबीएफसी फायनान्स कंपनी ही छोट्या उद्योगांना त्याचबरोबर एमएसएमईना कर्जपुरवठा करण्याचं काम करते. त्यासोबतच नोकरदार आणि ज्यांना बँकेकडून सहजासहजी कर्ज मिळत नाही, अशांना एसबीएफसीकडून कर्जपुरवठा होतो.

sbfc d


आयपीओचे डिटेल्स

एसबीएफसी फायनान्स कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 1,025 कोटी रुपयांपैकी 600 कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहे. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 425 कोटी रुपयांचे शेअर्स जारी केले जाणार आहेत. कंपनीचे प्रवर्तक हे शेअर विकणार आहेत. यात अर्पवूड कॅपिटल (Arpwood Capital), अर्पवूड पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर्स (Arpwood Partners Investment Advisors) या प्रवर्तकांचा समावेश आहे.

16 ऑगस्टला होणार लिस्ट

ऑफरसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, अ‍ॅक्सिस कॅपिटल आणि कोटक महिंद्रा कॅपिटल हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर केफिन टेक्नॉलॉजीज हे रजिस्ट्रार असणार आहेत. एसबीएफसी फायनान्स आयपीओच्या शेअरचं अलॉटमेंट 10 ऑगस्टपर्यंत अंतिम केलं जाईल. 11 ऑगस्टला कंपनीतर्फे रिफंड प्रक्रिया सुरू होईल. तर 14 ऑगस्टला अलॉट झालेल्यांच्या डीमॅट खात्यात जमा करण्यात येतील. 16 ऑगस्टला बीएसई आणि एनएसईवर एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ लिस्ट होण्याची शक्यता आहे.