Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPO: पैशांची व्यवस्था करा, आठवडाभरात येत आहेत 'या' पाच कंपन्यांचे आयपीओ

Upcoming IPO: पैशांची व्यवस्था करा, आठवडाभरात येत आहेत 'या' पाच कंपन्यांचे आयपीओ

Image Source : www.india.com

Upcoming IPO: आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पुढच्या आठवड्यात एक दोन नाही तर पाच कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. भांडवली बाजार नियामक सेबीनं या कंपन्यांना आपले आयपीओ आणण्यास मंजुरी दिली आहे.

आयपीओमध्ये (Initial Public Offering) पैसे गुंतवण्यास अनेक जण इच्छुक असतात. आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यात पाच कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, बिझोटिक कमर्शियल लिमिटेड, कॉस्मिक सीआरएफ लिमिटेड, सेल पॉइंट (इंडिया) लिमिटेड आणि एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या त्या पाच कंपन्या आहेत. या कंपन्यांविषयी थोडक्यात जाणून घेऊ...

अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड

अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट ही एक कचरा हाताळणी आणि व्यवस्थापन सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीचा आयपीओ 12 जूनला उघडणार आहे. तर 14 जूनला तो बंद होईल. इश्यूद्वारे 11.42 कोटी रुपये उभारण्याचं कंपनीनं नियोजन केलं आहे. या आयपीओचा एकूण इश्यू आकार 11.42 कोटी रुपये आहे. यासाठी 11.42 लाख इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. प्रत्येक शेअरची किंमत 100 रुपये असणार आहे. सर्व शेअर्सचं दर्शनी मूल्य 10 रुपये असणार आहे. यामध्ये 9.2 लाख इक्विटी शेअर्सच्या ताज्या इश्यूचाही समावेश आहे. 

बिझोटिक कमर्शियल लिमिटेड

बिझोटिक कमर्शियल लिमिटेड (Bizotic Commercial Limited) या कंपनीचा आयपीओ 12 जून 2023 रोजी उघडेल आणि 15 जून 2023 रोजी बंद होईल. पब्लिक ऑफर 175 रुपये प्रति शेअरच्या निश्चित किंमत बँडवर सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असणार आहे. एका लॉट पब्लिक इश्यूमध्ये 800 शेअर्स असणार आहेत. या एसएमई कंपनीनं 2,412,000 नवे शेअर्स जारी करून 42.21 कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सेबीनंही नुकतीच मान्यता दिली आहे.

कॉस्मिक सीआरएफ लिमिटेड

कॉस्मिक सीआरएफ (Cosmic CRF IPO) या कंपनीचा आयपीओ 14 जून रोजी पूर्णपणे उघडण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर 16 जून रोजी बंद होईल. या इश्यूद्वारे 60 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याचं कंपनीचं लक्ष्य असणार आहे. एक एक निश्चित किंमत बँड आहे. त्याचा आकार 60.13 कोटी रुपये आहे. यात 18.22 लाख इक्विटी शेअर्स प्रत्येकी 314 ते 330 रुपयांच्या प्राइस बँडवर विकले जाणार आहेत. शेअर्सचं दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर असणार आहे.

सेल पॉइंट (इंडिया) लिमिटेड

सेल पॉइंट (इंडिया) लिमिटेड ही कंपनी आपला आयपीओ आणण्यास सज्ज झाली आहे. 15 जून रोजी कंपनी आपला आयपीओ सादर करेल. तर 20 जून रोजी तो बंद होईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 50.34 कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य घेऊन चालत आहे. कंपनीनं या इश्यूची किंमत 100 रुपये प्रति शेअर एवढी निश्चित केली आहे. 50 कोटी रुपयांच्या 50,34,000 शेअर्ससाठी सार्वजनिक ऑफर दिली जाणार आहे.

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज 20 जून रोजी आपला आयपीओ लाँच करेल. प्राथमिक बाजारातून 480 कोटी रुपये उभारण्याचं कंपनीचं उद्दिष्ट असणार आहे. कंपनीनं इश्यूसाठी प्रति शेअर 555-585 रुपये किंमत बँड निश्चित केला आहे. 480 कोटी रुपयांच्या एचएमए अ‍ॅग्रो आयपीओमध्ये 150 कोटी रुपयांच्या शेअर्सचा आणि 330 कोटी रुपयांच्या ओएफएसचा समावेश आहे. पब्लिक इश्यूसाठी अँकर गुंतवणूकदारांची बोली 19 जूनपासून सुरू होणार आहे.