Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जुनी पेन्शन योजना vs नवीन पेन्शन योजना: आगामी लोकसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार?

जुनी पेन्शन योजना vs नवीन पेन्शन योजनचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी योजना लागू करण्यासाठी संप पुकारला जात आहे. तर केंद्र सरकार नवीन योजनेवर ठाम आहे. या दोन्ही योजना काय आहेत? केंद्र सरकारचे योजनेवर मत काय? याविषयी जाणून घ्या.

Read More

Old Pension Scheme Update: जुन्या पेन्शन योजनेचे लाभ आता नवीन कर्मचाऱ्यांनासुद्धा! राज्य सरकारचा निर्णय

सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी संपादरम्यान केली होती. परंतु यावर तेव्हा देखील थेट भाष्य करणे मुख्यमंत्र्यांनी टाळले होते. आता जुन्या पेन्शन योजनेतील काही लाभ नव्या कर्मचाऱ्यांना देण्याची घोषणा केली गेली असली तरी सर्वांना जुनी पेन्शन लागू होणार किंवा नाही यावर मात्र अजूनही काही भाष्य केले गेले नाही.

Read More

Old Pension Scheme: जुन्या पेंशन योजनेसाठी अर्थमंत्री नवा फॉर्म्युला आणण्याच्या तयारीत

National Pension Scheme आणि Old Pension Scheme शी निगडित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याद्वारे NPS आणि OPS संबंधी प्रश्नांवर सुवर्णमध्य काढण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Read More

नवीन पेन्शन योजनेचा केंद्रीय समिती आढावा घेणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची लोकसभेत घोषणा

New Pension Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 24 मार्च) लोकसभेत वित्त विधेयक 2023 मांडताना नवीन पेन्शन योजनेबाबत (New Pension Scheme) मोठी घोषणा केली. त्यांनी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एनपीएसचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

Read More

Old Pension Scheme: संप मिटला, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना तत्वतः मंजुरी!

Old Pension Scheme: येत्या 3 महिन्यात जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल असे लेखी आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. आज (दि. 20 मार्च) दुपारी 2 वाजता सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान संपकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून, उद्यापासून सर्व कर्मचारी कामावर हजर राहतील असे सुकाणू समितीने जाहीर केले.

Read More

Old Pension Scheme: जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले, सरकारी कामकाज ठप्प

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना (OPS) जोवर पूर्वरत केली जात नाही तोवर आंदोलन, संप मागे घेतला जाणार नाही यावर संपकरी कर्मचारी ठाम आहेत. रोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठमोठी आंदोलने होत आहेत. आमदार-खासदारांना जर निवृत्तिवेतन दिले जात असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना का नाही? असा सवाल केला जातो आहे.

Read More

Old Pension Scheme: कर्मचारी संपावर ठाम! सचिवांशी झालेली बैठक निष्फळ

जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. याआधी मुख्य सचिवांशी संपकऱ्यांची एक बैठक पार पडली. ही बैठक निष्फळ ठरली असून आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुढील बैठक होणार आहे.

Read More

Old Pension Scheme: जुन्या पेन्शनवर परत जाणे हे चुकीचे पाऊल, माजी RBI गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सविस्तर केले विश्लेषण

Old Pension Scheme: सुब्बाराव यांच्या म्हणण्यानुसार, जर राज्य सरकारे जुन्या पेन्शन योजनांकडे परत वळली तर पेन्शनचा बोजा सध्याच्या महसुलावर पडेल. ज्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, सरकारांना शाळा, रुग्णालये, रस्ते आणि सिंचन योजनांवर होणारा खर्च कमी करावा लागेल.

Read More

भावनिक निर्णय न घेता कर्मचाऱ्यांशी चर्चा करूनच Old Pension Scheme वर निर्णय घेणार- उपमुख्यमंत्री फडणवीस

सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार एकूण खर्चाच्या 58% रक्कम खर्च करते.येणाऱ्या काळात ही रक्कम 68% पर्यंत पोहोचणार आहे. याबाबत हिशोब केला तर 2028 पर्यंत 2.5 लाख सरकारी कर्मचारी निवृत्त होणार आहेत.जुनी पेंशन योजना पूर्वरत केली तर 2028 नंतर सरकार चालवणे कठीण होईल, अशा शब्दांत OPS आणली तर काय घडू शकते याचा पाढाच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचला.

Read More

Old Pension Scheme : अर्थमंत्री सीतारामन यांचा जुनी पेन्शन योजना असलेल्या राज्यांना धक्का, या निधीची रक्कम देण्यास नकार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी नवीन पेन्शन योजनेसाठी (NPS) ठेवलेली रक्कम राज्य सरकारांना जुन्या पेन्शन योजनेसाठी (OPS – Old Pension Scheme) देण्यास नकार दिला आहे.

Read More

Old Pension Scheme: लवकरच जुन्या पेंशन योजनेवर निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

CM Eknath Shinde on Old Pension Scheme: कुठलाही निर्णय घेताना त्याचे दूरगामी परिणाम वाईट होता कामा नये यासाठी आम्ही सजग असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या काळात जर आपल्याला चांगले परिणाम हवे असतील तर विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे असते, त्यामुळे जुन्या पेंशन योजनेबाबत आम्ही देखील सर्वांगीण विचार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Read More

Old Pension Scheme: राज्य अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संपावर जाणार, जुन्या पेंशन योजनेची मागणी

जुन्या पेंशन योजनेच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सुमारे 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे. महाराष्ट्र सरकारला Old Pension Scheme आणणे सहज शक्य आहे असे सरकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read More