Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नवीन पेन्शन योजनेचा केंद्रीय समिती आढावा घेणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची लोकसभेत घोषणा

New Pension Scheme

Image Source : www.businessinsider.in.com

New Pension Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 24 मार्च) लोकसभेत वित्त विधेयक 2023 मांडताना नवीन पेन्शन योजनेबाबत (New Pension Scheme) मोठी घोषणा केली. त्यांनी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एनपीएसचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

New Pension Scheme: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू व्हावी, अशी इच्छा असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार नव्या पेन्शन योजनेचा (एनपीएस) आढावा घेणार आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 24 मार्च) संसदेत वित्त विधेयक मांडताना ही माहिती दिली. वित्त सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात येईल, असे यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले. स्थापन केलेली ही समिती नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेणार आहे.  विरोधकांची  प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर वित्त विधेयका 2023 (Finance Bill 2023)वर मतदान घेऊन ते लोकसभेत मंजूर करण्यात आले.

नवीन पेन्शन योजना कधी लागू करण्यात आली?

2004 पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत (OPS) निवृत्तीनंतर (After Retirement)  निश्चित पेन्शन मिळत असे. ही पेन्शन कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी जो पगार दिला जात होता, त्यावर आधारित होती. या योजनेचा नियम असा होता की, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबियांना पेन्शन दिली जाईल. पण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने एप्रिल 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली आणि त्या जागी नवीन पेन्शन योजना लागू केली.  त्यानंतर सर्व राज्यांनी नवीन पेन्शन योजना लागू केली.

नवीन पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये

  1. एनपीएसमध्ये, कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या 10 टक्के + महागाई भत्ता (DA) कापला जातो.
  2. नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित आहे. त्यामुळे ती फार सुरक्षित अशी नाही.
  3. नवीन पेन्शन योजनेमध्ये निवृत्तीनंतर पेन्शन मिळविण्यासाठी NPS फंडातील जमा पैसे  40 टक्के गुंतवणूक करावे लागते.
  4. NPS मध्ये निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची कोणतीही हमी नाही.
  5. नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित आहे. त्यामुळे येथे टॅक्सची तरतूद आहे.
  6. नवीन पेन्शन योजनेत 6 महिन्यानंतर मिळणार्‍या महागाई भत्त्याची (DA) कोणतीही तरतूद नाही.

जुन्या पेन्शन योजनेची (OPS) वैशिष्ट्ये

  1. ओपीएसमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या निम्मा पगार निवृत्तीच्या वेळी पेन्शन म्हणून दिला जातो.
  2. या योजनेत सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजेच GPF (General Provident Fund) ची तरतूद आहे.
  3. ओपीएसमध्ये  20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी रक्कम उपलब्ध आहे.
  4. जुन्या पेन्शन योजनेतील पेमेंट सरकारच्या तिजोरीतून केले जाते.
  5. निवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना पेन्शनची रक्कम मिळण्याचीही तरतूद आहे.
  6. ओपीएसमध्ये पेन्शनसाठी कर्मचाऱ्याच्या पगारातून एकही पैसा कापला जात नाही.
  7. OPS मध्ये 6 महिन्यानंतर महागाई भत्ता (DA) मिळण्याची तरतूद आहे.