Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ST Bus Reservation : ‘आयआरसीटीसी’वरुनही करता येणार एसटी बसचे आरक्षण

आता एसटी महामंडळ आणि भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षणासंदर्भात एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार आता एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) या संकेतस्थळावरून देखील एसटीचे तिकीट बुक करता येणार आहे.

Read More

Shivneri Bus: शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त; राज्यात धावणार 'जन-शिवनेरी' बस

राज्य परिवहन महामंडळाकडून लवकरच 'ई-शिवनेरी' बसची सेवा सुरु करण्यात येणार आहे. तसेच या बस राज्यात जन शिवनेरी म्हणून ओळखल्या जातील. सध्या जन-शिवनेरी बस ही प्रायोगिक तत्वावर 10 जुलैपासून नाशिक-पुणे या महामार्गावर सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात तब्बल 100 ई-शिवनेरी (जन शिवनेरी) राज्यातील विविध रस्त्यांवर धावताना दिसतील.

Read More

E-Bus Manufacturing Tender : एसटी महामंडळाचे Olectra कंपनीला 10,000 कोटींचे कंत्राट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या(MSRTC) तब्बल 5,150 इलेक्ट्रिक एसी बसेसचे(Electric AC BUS) टेंडर Olectra या E-Bus Manufacturing कंपनीला मिळाले आहे. महामंडळाने या कंपनीसोबत केलेल्या कराराचा कालावधी 12 वर्षांचा आहे. Olectra Greentech द्वारे संपूर्ण करार कालावधीसाठी बसेसची देखभाल सेवा प्रदान केली जाणार आहे.

Read More

MSRTC Reservation App : एसटी महामंडळाकडून तिकीटांच्या आरक्षणासाठी येणार नवीन अ‍ॅप

एसटीच्या प्रवाशांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून ऑनलाईन तिकीट आरक्षणाची सेवा (Ticket Reservation service) उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महामंडळाकडून प्रवासी सुविधा हे मोबाईल अ‍ॅप तयार केले जात आहे.

Read More

MSRTC in Profit: सरकारच्या योजनांमुळे एसटीला अच्छे दिन; मे महिन्यात 913 कोटींचे उत्पन्न

MSRTC in Profit: 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना आणि सरसकट महिलांना तिकिटामध्ये दिलेली 50 टक्के सवलत योजनेमुळे एसटीच्या प्रवाशी संख्येत तर वाढ झालीच आहे. पण त्याचबरोबर एसटीच्या उत्पन्नात वाढ देखील होऊ लागली आहे.

Read More

MSRTC Passenger Rise: एसटीच्या प्रति दिन प्रवाशी संख्येत 3 लाखांवरून 57 लाखापर्यंत वाढ; वर्षभरात 1800 टक्के वाढ!

MSRTC Passenger Rise: मागील वर्षभरात एसटीने दररोज 3 लाख प्रवाशी प्रवास करत होते. हा आकडा आता 57 लाखापर्यंत पोहचला आहे. एसटी महामंडळाच्या विविध योजनांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Read More

MSRTC @75 : 'एसटीच्या सवलत पासमुळेच आज आयुष्य वेगळ्या वळणावर...' नागपुरातला विद्यार्थी सांगतोय एसटीचं महत्त्व

MSRTC @75 : 1 जूनला आपल्या लालपरीला 75 वर्ष पूर्ण झालेत. या 75 वर्षात लालपरीने प्रत्येकाच्या आयुष्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात तर एसटीला फार महत्त्वाचे स्थान आहे. नागपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने एसटी बसच्या सहकार्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. जाणून घेऊया त्याच्या शिक्षणाच्या प्रवासात एसटीचे महत्त्व...

Read More

MSRTC @75: मोफत प्रवासाची सोय होती म्हणून शिकल्या डोंगरदऱ्यातील विद्यार्थिनी…

डोंगर दऱ्यात, रानावनात राहणाऱ्या विद्यार्थिनींना मात्र शहरांत शिकण्यासाठी जायचं ठरल्यास खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यांचे पालक देखील सुरक्षिततेचं कारण देत मुलींचे शिक्षण बंद करतात. गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात शाळाबाह्य विद्यार्थिनींचे प्रमाण वाढले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे शाळा गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी 2018 साली महाराष्ट्र सरकारने ही योजना अंमलात आणली.

Read More

MSRTC@75Years: एसटीच्या 50% सवलतीत आतापर्यंत 10 कोटी महिलांनी केला प्रवास, 300 कोटींची झाली बचत

MSRTC@75Years: एसटी महामंडळाच्या दररोजच्या प्रवाशी संख्येत देखील वाढ झाली असून दररोज 55 लाख महिला प्रवासी योजनेचा लाभ घेत असल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने महामनीशी बोलताना सांगितले."बहुजन हिताय बहुजन सुखाय" या ब्रिद वाक्याला अनुसरुन एसटी महामंडळाने मागील 75 वर्षात खेडोपाडी सेवा दिली आहे. महामंडळाकडून समाजातील विविध घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलती दिल्या जातात.

Read More

MSRTC@75Years: एसटींची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या नागपूरच्या गणेशपेठ आगारातील दोन महिला मॅकेनिक

MSRTC@75Years: आज महिला प्रत्येक क्षेत्राला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आजवर मोठ्या गाड्या दुरुस्त करण्यामध्ये असलेली पुरुष मॅकेनिकच्या कार्यक्षेत्रात चैताली पित्तुले या महिला मॅकेनिकने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकातील एसटींची काळजी घेणाऱ्या चैताली पित्तुले आणि रुपाली पोहाणे या दोन मॅकेनिकचा प्रवास जाणून घेऊया.

Read More

MSRTC@75Years: 'महाकार्गो' ची खासगी कंपन्यांना टक्कर; भविष्यात गोदामं उभारणार अन् पार्सल सुविधा खेडोपाड्यात पोहचवणार

Mahacargo Freight service: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सेवेला जून महिन्यात 75 वर्ष पूर्ण झाले. या पंच्याहत्तर वर्षात लालपरीने अनेक आव्हाने झेलली. कोरोनाकाळात एसटी ने महाकार्गो ही मालवाहतूक सेवा राज्यभर सुरू केली. सध्या मालवाहतुकीसाठी अकराशे ट्रक्स आहे. भविष्यात महाकार्गो सेवेच्या वाढीबरोबरच गोदामे आणि पार्सल सुविधेतही ST उतरणार आहे.

Read More

MSRTC@75Years : एसटी स्थानकांचं रुपडं पालटणार, अमृत महोत्सवानिमित्त काय खास?

MSRTC@75Years : सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बस स्थानकांचं रूप आता पालटणार आहे. गावोगावी पोहोचलेली एसटी सर्वच बाबतीत आता नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. यंदा एसटी आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करीत आहे. त्यानिमित्त या वृ्त्तात एसटी बसस्थानकांची स्थिती आणि होणारे बदल याचा आढावा घेऊ...

Read More