Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSRTC Passenger Rise: एसटीच्या प्रति दिन प्रवाशी संख्येत 3 लाखांवरून 57 लाखापर्यंत वाढ; वर्षभरात 1800 टक्के वाढ!

MSRTC Passenger Rise in 2023

MSRTC Passenger Rise: मागील वर्षभरात एसटीने दररोज 3 लाख प्रवाशी प्रवास करत होते. हा आकडा आता 57 लाखापर्यंत पोहचला आहे. एसटी महामंडळाच्या विविध योजनांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

MSRTC Passenger Rise: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या  (Maharashtra State Road Transport Corporation-MSRTC) प्रवाशी संख्येत मागील दोन महिन्यात तब्बल 1800 टक्क्यांनी वाढ झाली. या कालावधीत जवळपास एसटीने 3 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

मागील वर्षभरात एसटीने दररोज 3 लाख प्रवाशी प्रवास करत होते. हा आकडा आता  57 लाखापर्यंत पोहचला आहे. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यात 1800 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोविडच्या काळात एसटी महामंडळाला मोठा फटका बसला होता. त्यावेळी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. परिणामी एसटीच्या उत्पन्नात खूपच तोटा झाला होता. हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटीला जवळपास 1 ते 1.5 वर्षांचा कालावधी गेला.

सध्या एसटी महामंडळाच्या 14,000 बस रस्त्यावर धावत आहेत. या 14 हजार बसचे सारथ्य 34 हजार ड्रायव्हर आणि 38 हजार कंडक्टर सांभाळत आहेत. यामध्ये महिलांची संख्या 4,528 इतकी आहे. त्यातील 28 महिला या ड्रायव्हर, तर 4,500 महिला कंडक्टर आहेत.

मे महिन्यात सर्वाधिक उत्पन्न!

एसटी महामंडळाने यावर्षी मे महिन्याच्या सुट्टीत भरघोस उत्पन्न मिळवले आहे. म्हणजे साधारणत: एसटीची खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असा हिशोब असतो. पण मे महिन्यात खर्चापक्षा जास्त उत्पन्न मिळवून  दिले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न हे अकोला विभागातून मिळाले होते. एसटी महामंडळाचे राज्यात एकूण 31 विभाग आहेत. त्यातील 13 विभागांनी खर्चापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिले.

सरकारी योजनांचा लाभ

सरकारच्यावतीने एसटी महामंडळातर्फे विविध योजना राबवल्या जातात. त्याचाही लाभ नागरिक घेत असून, त्यातून एसटीला महसूल मिळत आहे.  दरम्यान मार्च महिन्यामध्ये झालेल्या अधिवेशनात सरकारने महिलांसाठी तिकिटदरात 50 टक्के सवलत दिली. याचाही सर्वाधिक लाभ महिलांनी घेतल्याचे दिसून आले. त्याचबरोबर 75 वर्षांवरील नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत मोफत प्रवास करता येत आहे. त्यांच्या सोबतीने कुंटुंबातील इतर सदस्य प्रवास करत असल्याने प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे.

मुंबई-पुणे ई-शिवनेरी उत्तम प्रतिसाद

महिन्याभरापूर्वी मुंबई-पुणे या मार्गावर सुरू झालेल्या इलेक्ट्रिक शिवनेरी सेवेचा एकूण 48,000 प्रवाशांनी लाभ घेतला आहे. या ई-शिवनेरी बसुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत जवळपास 2 कोटींची भर पडली आहे. ई-शिवनेरीच्या मुंबई-पुणे या मार्गावर दररोज 12 फेऱ्या होतात. तर काही बस ठाण्यातूनही सोडल्या जात आहेत. त्याच्या फेऱ्यांची संख्या 14 इतकी आहे. अशा दिवसभरात एकूण 26 फेऱ्या ई-शिवनेरीच्या होत आहेत.