Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSRTC@75Years: 'महाकार्गो' ची खासगी कंपन्यांना टक्कर; भविष्यात गोदामं उभारणार अन् पार्सल सुविधा खेडोपाड्यात पोहचवणार

Mahacargo Freight services

Mahacargo Freight service: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सेवेला जून महिन्यात 75 वर्ष पूर्ण झाले. या पंच्याहत्तर वर्षात लालपरीने अनेक आव्हाने झेलली. कोरोनाकाळात एसटी ने महाकार्गो ही मालवाहतूक सेवा राज्यभर सुरू केली. सध्या मालवाहतुकीसाठी अकराशे ट्रक्स आहे. भविष्यात महाकार्गो सेवेच्या वाढीबरोबरच गोदामे आणि पार्सल सुविधेतही ST उतरणार आहे.

MSRTC@75Years: महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपासून खेडोपाड्यात धावणारी एस. टी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काची सवारी आहे. एका अर्थाने एस. टी नागरिकांची जीवनवाहिनी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सेवेला जून 2023 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाले. या पंच्याहत्तर वर्षात लालपरीने अनेक आव्हाने झेलली आणि बदलही पाहिले. असे असूनही एसटी निर्धाराने धावत आहे.

एस.टी महामंडळ मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडले आहे. कोरोना काळात प्रवासी वाहतूक बंद असताना एस.टी महामंडळाला मोठा तोटा झाला होता. ( ST Freight services) हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने महाकार्गो सुविधा 21 मे 2020 ला सुरू केली. (Mahacargo Freight services) त्यासाठी एसटीच्या बसेसमध्ये बदल करण्यात आले. प्रवासी बसमधील आसने आणि छत काढून या गाड्याचे रुपांतर मालवाहू ट्रकमध्ये करण्यात आले. राज्यभर धावणाऱ्या मालवाहू एसटी नागरिकांच्या कुतूहलाचा विषय झाला होता.

पहिली मालवाहू गाडी कोकणातून मुंबईत आली

पहिली मालवाहू गाडी 21 मे ला रत्नागिरीहून बोरिवलीत आंब्याच्या पेट्या घेऊन आली होती. मालवाहतूक सुरू करण्याचा महामंडळाचा हा निर्णय योग्य ठरला. (Affordable freight services in Maharashtra) कारण, कोरोना काळात प्रवासी वाहतूक बंद होती. खासगी मालवाहतूकही पूर्णपणे सुरू नव्हती. अशा परिस्थितीती एस.टी ने राज्यभर मालवाहतूक पुरवठा करण्यास सुरुवात केली. सर्व विभागीय मंडळांमध्ये ही सुविधा सुरू असून भविष्यात या सेवेचा विस्तारही करण्यात येणार आहे.

performance-of-mahakargo-from-may-2020-to-march-2023.jpg

महाकार्गो सुविधेबाबत  महामनीने एस.टी चे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांच्याशी संपर्क साधला. सध्या एसटी महामंडळाकडे 1100 मालवाहू गाड्या आहेत. या ट्रक्सद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात कमर्शियल वाहतूक (Freight services for small businesses) सुरू आहे. एसटी ने मालवाहतुकीसाठी स्पर्धात्मक दर ठेवले असून खासगी ट्रान्सस्पोर्टशी एसटी स्पर्धा करत असल्याचे अभिजित भोसले म्हणाले.

सध्या एस. टी कमर्शिअल मालवाहतूक व्यवसायात नवी असली तरी भविष्यात मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित करेल. त्याचे नियोजन सरकारी पातळीवर सुरू आहे. तसेच एसटीची सेवा राज्यातील दुर्गम भागातही पोहचली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी पार्सल सुविधाही सुरू करण्याचा विचार एस.टी चा आहे. पार्सल सेवा सुरू करण्याबाबत नियोजन आखत असल्याचे अभिजित भोसले यांनी सांगितले. एसटीसारखी खासगी मालवाहतूक सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात अद्याप पोहचली नाही, त्यामुळे एसटीला वैयक्तिक पार्सल सेवा सुरू करण्यात मोठी संधी असल्याचं ते म्हणाले. 

महाकार्गोपुढील आव्हाने काय आहेत?

प्रवासी वाहतुकीत जशी एसटी सर्वात जुनी आहे तशी मालवाहतूक व्यवसायात महामंडळ नवखे आहे. सध्या मालवाहतुकीचे जे दर आहेत ते खासगी वाहतूक दरांशी स्पर्धा करणारे आहेत. मात्र, खासगी कंपन्यांचे ग्राहक ठरलेले असतात. त्यांना तोडून एसटीच्या सेवेशी जोडण्याचे काम आव्हानात्मक आहे. सध्या अकराशे गाड्या आहेत. मात्र, भविष्यात आणखी चांगले उत्पन्न मिळाल्यास गाड्यांची संख्या वाढवण्यात येईल, असे भोसले यांनी सांगितले. 

एसटीच्या एकूण उत्पन्नात महाकार्गोचा वाटा किती?

कोरोना काळात कार्गो वाहतूक सुरू होती तेव्हा प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, व्यवस्थापन, देखभाल खर्च भरुन काढण्यास महाकार्गोने मोठी मदत केली. (Mahacargo Freight services)  सध्या एसटीला जे उत्पन्न मिळत आहे त्यातील 10% उत्पन्न मालवाहतुकीतून आणि 90% उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून मिळत आहे, असे भोसले यांनी सांगितले.

एस. टी महामंडळ गोदामे उभारणार

भविष्यात सामान वाहतुकीबरोबरच एस. टी महामंडळ स्वत:च्या जागांवर मोठी गोदामे उभारणार आहे. या गोदांमांमध्ये शीतगृहांची सुविधा देखील असेल. (Mahacargo Freight services by ST) त्यामुळे भाजीपाल्यासारखा नाशवंत माल, मासे, मटन, दुधाचे पदार्थ सुद्धा महाकार्गोद्वारे संपूर्ण राज्यभर पोहचवले जातील. हा निर्णय अद्याप विचाराधीन असून एस.टी महामंडळ नव्या जोमाने पुढे जात असल्याचे यातून दिसते.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे पर्यटन आणि इतर प्रवासासाठी एसटीच्या गाड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे महाकार्गो सेवेपेक्षा प्रवासी वाहतुकीसाठी जास्त गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. (Efficient cargo transportation solutions) सुट्ट्यांचा सिझन संपल्यानंतर पुन्हा मालवाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात येईल, असे अभिजित भोसले यांनी म्हटले. 

कर्मचाऱ्यांचे पगार, विविध सवलतीच्या योजनांमुळे महामंडळाचा होणार तोटा, वाढते इंधनाचे दर, देखभाल दुरुस्तीचा खर्च असतानाही एसटी उत्पन्नाचे मार्ग उभे करत आहे. भविष्यात लालपरी इलेक्ट्रिक गाड्यांच्या रुपातही धावेल. त्याची सुरुवात सुरू झाली आहे. महाराष्ट्राची लाइफ लाइन असलेल्या एसटीला 75 वर्षपूर्तीनिमित्त शुभेच्छा.

75-yrs-logo-st-06-9.png