वाढत्या इंधनाच्या दरामुळे एसटी महामंडळाला डिझेलवर प्रवासी वाहतूक करणे तोट्याचे झाले आहे. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी महामंडाळाकडून सुमारे 5150 इलेक्ट्रिक बसची निविदा काढण्यात आली होती. या इलेक्ट्रिक बस (Electric AC BUS) शिवाई या नावाने राज्यभरात धावणार आहेत. त्यासाठीचे कंत्राट इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील अव्वल समजल्या जाणाऱ्या ऑलेक्ट्रा ग्रीनेटक कंपनीला(Olectra Greentech) मिळाले आहे.
भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या(MSRTC) तब्बल 5,150 इलेक्ट्रिक एसी बसेसचे(Electric AC BUS) टेंडर Olectra या E-Bus Manufacturing कंपनीला मिळाले आहे. कंपनीने शुक्रवारी माहिती देताना स्पष्ट केले आहे की हे टेंडर ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड (Evey) च्या या संयुक्त कंपनीला देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)कडून याची ऑर्डर आम्हाला प्राप्त झाली आहे. त्यात एकूण 5,150 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा, संचालन आणि देखभाल यांचा समावेश आहे. महामंडळाने या कंपनीसोबत केलेल्या कराराचा कालावधी 12 वर्षांचा आहे.
महामंडळाच्या इंधन खर्चात बचत होणार-
सध्याचे इंधनाचे वाढलेल्या भावामुळे एसटी महामंडळाचा डिझेलवरील खर्च हा उत्पंनापेक्षा अधिक होता. त्यामुळे अनेक डेपो स्तरावर डिझेलसाठी पैसे राहत नसल्याने अधिक फेऱ्या रद्द करण्याची वेळ येत होती. आता या इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यानंतर महामंडळाच्या इंधनावरील खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे उत्पन्नात जास्तीची भर पडून महामंडळाची आर्थिकी स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
आरामदायी वातानुकूलित प्रवास-
राज्य परिवहन महामंडळ आपल्या प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी महमंडळाकडून हिरकणी, विठाई, शिवनेरी, शिवशाही,अश्वमेध या सारख्या बसेस उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर आता राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक धोरणांतर्गत महामंडळाच्या ताफ्यात शिवाई या इलेक्ट्रिक बसचा समावेश होईल. या बसेस वातानुकूलित असून संपूर्ण राज्यभरात या बसची सेवा उपलब्ध होणार आहे.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे शेअर वधारले-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) कडून कंपनीला 10,000 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाल्यानंतर इलेक्ट्रिक-बस उत्पादक ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्सने शुक्रवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर 15 टक्क्यांहून अधिक वाढ करून प्रति शेअर 1,209 रुपयांचा उच्चांक गाठला.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            